Home /News /astrology /

Numerology : नेत्यांच्या जन्मतारखेनुसार काय असेल त्यांचं भवितव्य; पाहा आजचं अंकशास्त्र

Numerology : नेत्यांच्या जन्मतारखेनुसार काय असेल त्यांचं भवितव्य; पाहा आजचं अंकशास्त्र

Numerology 30 June 2022 : अंकशास्त्रात जन्मतारखेवरून भविष्य वर्तवलं जातं. उद्धव ठाकरेंसह इतर नेते आणि तुमच्यासाठीही आजचा दिवस कसा ते पाहा.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 30 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची ज्ञानाची शक्ती तुमच्या व्यक्तिमत्त्वात प्रतिबिंबित होते. आज ही शक्ती विनाविलंब वापरून विजयी व्हा. आज नव्या ऑफर्सच्या स्वागतासह तुम्ही घरी येताना काही पुरस्कारांसह याल. कामाच्या ठिकाणच्या व्यक्ती, तसंच नातेसंबंधातल्या व्यक्तींना तुमच्याबद्दल अपार आदर आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा राजकीय भाग दाखवण्याचा आजचा दिवस आहे. स्पर्धा, संगीत मैफली, कौटुंबिक सोहळे आदींना उपस्थित राहण्याचा, इंटरव्ह्यूसाठी अर्ज करण्याचा, सोहळा आयोजित करण्याचा आजचा दिवस आहे. आज प्रॉपर्टी खरेदी करणं, मालमत्तेची विक्री करणं टाळावं. आज तुमच्या आवडीचा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स, पुस्तकं, शाळा, रेस्तराँ, कौन्सेलिंगची पुस्तकं, डिजिटल मार्केटिंग, धातू, क्रिएटिव्ह क्लासेस, क्रीडा संस्था आदी उद्योगांना आज मोठा फायदा होईल. मुलांना आज अभ्यासाचा खूप ताण असेल. शुभ रंग : Orange & Blue शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 दान : महिलांना केशरी रंगाचं कापड दान करावं. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं व्यक्तिमत्त्व केअरिंग आहे. तरीही त्याचा अतिरेक झाला, तर तुमच्या आयुष्यात अडथळे येऊ शकतात. तुम्हाला बिझनेस किंवा जॉबमध्ये लकी वाटेल. जोखमीसह पुढे चला. लीगल कमिटमेंट्स कोणत्याही तडजोडीशिवाय पूर्ण होतील. प्रेमसंबंधांत तुम्हाला जोडीदाराकडून वर्चस्व गाजवलं जात असल्यासारखं, नियंत्रित केलं जात असल्यासारखं वाटेल. महिला, मुलं यांनी आज वरिष्ठांकडून झालेल्या टीकेकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. जबाबदाऱ्या वाटून देण्यासाठी आज पैशांचा उपयोग केला पाहिजे. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, लिक्विड, औषधं, लॉ फर्म्स, हिरे उद्योग, राजकीय नेते आदी नवी उंची गाठतील. विद्यार्थी, उत्पादक, रिटेलर्स, ब्रोकर्स, क्रीडापटू आदींनी फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. नव्या संधींचा शोध घ्यावा आणि कामगिरीमध्ये उच्च रेटिंग मिळवावं. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : अनाथाश्रमात दूध दान करावं. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमचं क्रिएटिव्ह इमॅजिनेशन उच्च पातळीवर असेल. त्यामुळे संगीतकार आणि लेखकांसाठी उत्तम दिवस. कलाकारांना कामाच्या ठिकाणी नवी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यातून नवी सुरुवात करता येईल. तुमच्या कृतीने आणि भाषणामुळे लोक आश्चर्यचकित होतील. आज घेतलेले सर्व निर्णय नजीकच्या भविष्यात अनुकूल ठरतील. तुमचे आर्थिक प्लॅन्स अन्य व्यक्तींशी शेअर करणं टाळा. प्रॉपर्टी आणि स्टॉकशी संबंधित गुंतवणुकीतून संथ गतीने परतावा मिळण्याची शक्यता आहे. प्रेमात असलेल्यांनी आपल्या भावना परस्परांना भेटवस्तू देऊन व्यक्त केल्या पाहिजेत. सरकारी अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगून राहिलं पाहिजे. दिवसाची सुरुवात करताना तुमच्या गुरूचं नामस्मरण करायला विसरू नका. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : मंदिरात पिवळ्या मोहरीच्या बिया दान कराव्यात. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) एखाद्या सुलभ स्रोतातून आणि सोशल नेटवर्किंगच्या साह्याने तुम्हाला बरंच आर्थिक उत्पन्न मिळेल. स्पर्धेसाठी किंवा परदेशी जाण्यासाठी अभ्यास करत असलात, तर पूर्ण समर्पण भावनेने कष्ट करण्याची गरज आहे. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रात असलेल्यांना प्रवासासाठी आजचा दिवस चांगला आहे. बांधकाम, मशिनरी, शिक्षण, प्रशिक्षण, सॉफ्टवेअर बिझनेस आणि मेडिकल क्षेत्रात वेगाने प्रगती होईल; स्टॉक्समधल्या गुंतवणुकीत संथ गतीने सकारात्मक बदल होतील. विद्यार्थ्यांनी ताण हलका होण्यासाठी ध्यानधारणा करावी. मार्केटिंगमधल्या व्यक्तींनी हे लक्षात घ्यावं, की जेवढा तुम्ही जास्त संवाद साधाल, तेवढं जास्त यश मिळेल आणि महिनाअखेरीचं टार्गेट पूर्ण करण्यात यश मिळेल. आज मांसाहार करणं आणि मद्यपान करणं टाळा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : भिकाऱ्यांना हिरवे किंवा लाल कपडे दान करावेत. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचा जोडीदार किंवा जवळच्या मित्राशी विचार आणि भावना शेअर करण्याचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी नफा मिळवण्याइतकं शहाणपण तुमच्याकडे नक्कीच आहे. कर्जासारख्या जबाबदारीच्या जाळ्यात अडकू नका. दुपारच्या जेवणानंतरच्या काळात नशीब आपलं काम करील. त्यामुळे त्या वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सेल्स, जाहिरात, माध्यम, ट्रॅव्हल एजन्सी, स्पोर्ट्स या क्षेत्रांत वेगाने हालचाली अनुकूल आहेत. आज विद्यार्थी त्यांचं शैक्षणिक यश साजरं करतील. प्रेमात असलेल्या व्यक्तींचं लक्ष इकडे-तिकडे विचलित होण्याचे प्रकार घडतील. त्यामुळे त्यांनी निष्ठेला प्राधान्य द्यावं. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : मंदिरात कच्ची केळी दान करावीत. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आरामदायी, समृद्ध जीवन जगण्याचा आणि संधी मिळण्याचा दिवस. आज कौटुंबिक सोहळा, तसंच पार्टीज होण्याची शक्यता. जोडीदार आणि मुलांसोबत चांगला वेळ व्यतीत करण्याचा दिवस. विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांनी नवी संधी विचारपूर्वक निवडावी. कारण ती अनुकूल ठरणार आहे. वैयक्तिक नात्यांत तुम्हाला सुरक्षित आणि चांगलं वाटेल. नव्या फॅक्टरीसाठी जागेच्या शोधात असलेल्यांना आज चांगला पर्याय निवडता येईल. प्रेझेंटेशन्ससाठी बाहेर जा किंवा खेळा आणि भूतकाळ विसरा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : आश्रमांना पांढरी मिठाई दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचा हायपरअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅटिट्यूड आज हुकमाचं पान ठरेल. पब्लिक फिगर्स, राजकीय नेते, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनीअर्स, बिल्डर्स, भविष्यवेत्ते, मेकअप आर्टिस्ट्स, क्रीडापटू आदी व्यक्ती हिरोप्रमाणे विजय प्राप्त करतील. कायदेविषयक प्रकरणांत विजय मिळेल. प्रेयसी किंवा प्रियकरासोबत वाद घालू नका. ब्रेक-अपची स्थिती उद्धवू शकते. वादविवादाशिवाय नातेसंबंध पूर्ववत होतील. गुरूमंत्राचं पठण आवर्जून केलंच पाहिजे. क्रीडापटूंची दखल घेतली जाईल. पुरस्कार मिळतील. राजकीय नेत्यांसाठी चांगला दिवस. सार्वजनिक बैठकांना उपस्थित राहून पक्षश्रेष्ठींना इम्प्रेस करण्यासाठी चांगला दिवस. पैसे कर्जाऊ देणाऱ्या व्यक्ती, बँकर्स आदींनी आज सावधगिरी बाळगावी. शुभ रंग : Teal शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कोणत्याही स्वरूपात कासे किंवा तांबं या धातूचा तुकडा दान करावा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रवासाचं नियोजन करत असलात, तर आजचा दिवस अनुकूल आहे; पण स्वतः ड्रायव्हिंग करणं टाळा. तुम्हाला ज्याच्यामुळे पैसे, प्रसिद्धी, हुशारी, आदर आणि कुटुंबीयांचं प्रेम या गोष्टी मिळाल्या, त्या देवाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जा. आरामदायी वाटचाल करून अनेक उद्दिष्टं पूर्ण कराल. डॉक्टर्स आणि फायनान्सर्सना बक्षिसं मिळतील. रोमँटिक भावना सत्यात उतरवण्याचा दिवस. शुभ रंग : Sea Blue & Peach शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : भिकाऱ्यांना कलिंगड दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) अभिनेते, कलाकार, डॉक्टर्स, प्रॉपर्टी डीलर्स, गायक, रिटेलर्स, गृहिणी, सेल्स, मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्ती आदींसाठी आजचा दिवस खूप चांगला, कौतुक करून घेण्याचा असेल. लग्न, टेंडर्स, प्रॉपर्टी आदींसाठी मध्यस्थाकडे जाण्याकरिता उत्तम दिवस. क्रीडापटू, व्यावसायिक, शिक्षक, बँकर्स, संगीतकार, विद्यार्थी आदींनी डॉक्युमेंटेशनसाठी पुढाकार घ्यावा. स्टॉक मार्केटमध्ये असलात, तर घाऊक प्रमाणात स्टॉक्स खरेदी करणं भविष्यासाठी चांगलं ठरेल. रेड आणि पर्पल या रंगांच्या कॉम्बिनेशनचे कपडे घातल्यास नशीब आणि स्थैर्य आदींच्या दृष्टीने चांगलं असतं. आज डोळ्यांची काळजी घ्या. आज प्रवास टाळा आणि ऑनलाइन काम करण्याचा प्रयत्न करा. शुभ रंग : Purple शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 दान : भिकाऱ्यांना संत्री दान करावीत. 30 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : अरविंद स्वामी, हरिवंश नारायण सिंह, अल्लारी नरेश, अविका गौर, मुख्तार अन्सारी
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या