आज दिनांक 30 जून 2022 वार गुरूवार. आषाढ शुक्ल प्रतिपदा. आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करेल. तिथून तो गुरुशी नव पंचम योग करेल. आज गुरू पुष्यामृत आहे. सुवर्णखरेदी आणि अनेक शुभकार्यासाठी हा मुहूर्त महत्त्वाचा मानला जातो. काही विशेष पूजा, धार्मिक कार्य देखील आज केली जातात. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
राशीतील राहू-मंगळ जोडीदाराची चिंता वाढवेल. चंद्र आज चतुर्थ स्थानात आहे. शुभ घटना घडतील. दिवस आनंदात जाईल. शारीरिक ताण घेऊ नका. दिवस उत्तम.
वृषभ
आज तृतीय चंद्राचे भ्रमण शुभ फळ देईल. कुटुंबात महत्त्वाचे निर्णय होतील. आर्थिक लाभ होतील. व्यय राहू सावधगिरीचा इशारा देत आहे. बंधुभेट होईल. दिवस शुभ आहे.
मिथुन
राशी स्वामी बुध वृषभ राशीत सूर्यासोबत आहे. सरकारी काम, लिखाण यात यश मिळेल. धन स्थानातील चंद्र आर्थिक लाभ घडवेल. शुभकार्य होतील. दिवस चांगला.
कर्क
आज राशी स्थानात चंद्र असून दैवी संकेत मिळतील. भाग्य स्थानात गुरू धार्मिक आस्था वाढवेलं. अष्टम शनी जपून रहा असं सुचवत आहे. खंबीर रहा. दिवस शुभ आहे.
सिंह
आज चंद्र भ्रमण व्यय स्थानात असून प्रकृती नाजूक राहिल. मन थोडं चिंतित राहिल. पण काळजी नको. गुरूची उपासना करत रहा. लवकरच शुभ घटना घडणार आहेत. दिवस मध्यम.
कन्या
आज दिवस कार्यालयीन जीवनात काही विशेष घडेल असा आहे. दोघं मिळून खरेदी कराल. हाताने शुभ काम होईल. आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम.
तूळ
चंद्राचं भ्रमण दशम स्थानात आहे. खूप काम येईल असे संकेत आहेत. कुटुंबाशी मतभेद होऊ शकतात. आर्थिक व्यवहार होतील. मातृ सुख लाभेल. शांततेत दिवस घालवा.
वृश्चिक
जोडीदाराला काही लाभ होण्याची शक्यता आहे. मन आनंदी राहिल. आर्थिक लाभ होईल पण खर्च जपून करा. दिवस उत्तम आहे.
धनु
आज दिवस घरातल्या विशेष कामांसाठी खर्च होईल. काही जबाबदाऱ्या येतील तरी चांगला दिवस आहे. आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस. रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं वाटेल. दिवस शुभ.
मकर
वक्री शनी तुम्हाला नैराश्याला समोर जायला लावेल. खर्चाचे, सामाजिक जबाबदारी घेण्याचे योग आणेल. सप्तम चंद्र अतिशय आनंदी वैवाहिक जीवन असेल. दिवस शुभ.
कुंभ
आज आर्थिक घडामोडीचा दिवस आहे. अचानक होणारे लाभ प्रसन्न करतील. कायदा मोडू नका. अन्यथा कारवाईला समोर जावं लागेल. दिवस शुभ.
मीन
राशीच्या पंचम स्थानातील चंद्र संतती करता जास्तीचे खर्च करावे लागतील. भटकंतीचे योग येतील. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रकृती नरम राहिल. दिवस उत्तम आहे.
शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.