मेष (Aries) : कामातील अडथळे आपोआप दूर होतील. धैर्य वाढेल. अधिक सक्रियपणे काम कराल. सर्व क्षेत्रांमध्ये प्रभाव राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. पद, प्रतिष्ठा आणि संधी वाढण्याची शक्यता आहे. कामाची गती कायम ठेवाल. कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. एखादी छोटीशी सहल आयोजित करता येईल.
उपाय : दुर्गा चालिसाचं पठण करा.
वृषभ (Taurus) : महत्त्वाचे प्रस्ताव चालून येतील. ठरवलेल्या योजना सुरळीतपणे पार पडतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. विरोधक कमी होतील, तसेच अडथळे दूर होतील. आकर्षक ऑफर्स मिळतील. चर्चा फायदेशीर ठरतील. आत्मविश्वास वाढेल.
उपाय : श्री गणेश मंत्राचा 108 वेळा जप करा.
मिथुन (Gemini) : ठरवलेल्या योजना पुढे न्याल. कामात अनुकूलता राहील. व्यावसायिक प्रगती होईल. सर्वांचा सहभाग लाभेल. सिस्टीम मजबूत कराल. व्यावसायिक कामांना गती मिळेल. ठरवलेली कामं वेळेत पूर्ण करण्याच्या विचारात रहाल.
उपाय : भगवान शंकराला पाच प्रकारचा सुका मेवा दान करा.
कर्क (Cancer) : नोकरी-व्यवसायासाठी अनावश्यक असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. अफवांकडे दुर्लक्ष करा, तसेच त्यात सहभागी होऊ नका. कामाच्या ठिकाणी विरोधक अधिक सक्रिय होतील. करिअर आणि ट्रेडिंगमध्ये अधिक समर्पणाने काम करा. आजूबाजूच्या घडामोडींवर लक्ष ठेवा. बजेट नियंत्रणात ठेवा. फसवणुकीला बळी पडू नका.
उपाय : एखाद्या काळ्या श्वानाला मोहरीचे तेल लावलेला पाव द्या.
सिंह (Leo) : सर्व प्रकारचे निर्णय अगदी आरामात घेऊ शकाल. आर्थिक बाजू भक्कम राहील. अपेक्षेपेक्षा चांगले काम होईल. ठरवलेल्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे पुढे जातील. करिअर-व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळतील. कामात सुधारणा होईल. नोकरी-धंद्यात चढ-उतार दिसतील. समंजसपणे वागाल, व्यवहारात सावध रहाल.
उपाय : बजरंगबाणाचं पठण करा.
कन्या (Virgo) : व्यावसायिक संपर्क वाढेल. करिअर-व्यवसायात वृद्धी होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी भेटीगाठी होतील. संपत्तीत मोठी वाढ होईल. सहिष्णुता वाढेल. व्यावसायिक गोष्टींमध्ये रस वाढेल. संधीचा योग्य फायदा घ्याल. कौटुंबिक कामे पुढे न्याल.
उपाय : वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.
तूळ (Libra) : नफ्याची वाढ चांगल्याप्रकारे होईल. अपेक्षित लाभ होईल. ठरवलेल्या योजनेनुसार पुढे जात रहा. कामाच्या ठिकाणी अधिक वेळ द्याल. नोकरीतील संबंध सुधारतील. प्रवासाची शक्यता आहे. प्रयत्नांना यश मिळेल. विश्वास वाढेल. व्यावसायिक कामांना गती येईल.
उपाय : हनुमान चालिसाचं सात वेळा पठण करा.
वृश्चिक (Scorpio) : हट्टीपणा, अहंकार आणि भावनिक होणं टाळा. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी बजेटचा अंदाज घ्या. नियोजनपूर्वक काम करा. व्यवसायात शुभता राहील. वातावरणाशी योग्य प्रकारे जुळवून घ्याल. वैयक्तिक विषयात गती राहील, तसेच वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित कराल. व्यवस्थापन उत्तम राहील.
उपाय : पिंजऱ्यातील पक्ष्यांची मुक्तता करा.
धनू (Sagittarius) : आर्थिक गोष्टींवर लक्ष केंद्रित कराल. करिअरमध्ये संधी वाढतील. आत्मविश्वास कायम राहील. समजूतदारपणा आणि सुरळीतपणे पुढे जाल. व्यवस्थापन सुधारेल. हार्ड वर्कपेक्षा जास्त स्मार्ट वर्क करण्याकडे कल असेलल. व्यावसायिक बाबी अनुकूल होतील.
उपाय : भैरवनाथाच्या मंदिरात मिठाई अर्पण करा.
मकर (Capricorn) : सामान्य लाभाच्या संधी उपलब्ध होतील. व्यवहारात स्पष्टता ठेवा. आर्थिक गोष्टींमध्ये सक्रियता दर्शवा. बजेटवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. करिअर व्यवसायात वाढ होईल. अनुभवींचा सल्ला ऐकून त्यानुसार वागणे फायद्याचे ठरेल. गुंतवणुकीत खबरदारी घ्या, अन्यथा फसवणूक होऊ शकते. व्यवसाय सावधपणे करा.
उपाय : भगवान हनुमानासमोर तुपाचा दिवा लावा.
कुंभ (Aquarius) : आज होणारे आर्थिक व्यवहार प्रभावी ठरतील. नवीन करारांमुळे आर्थिक प्रगती शक्य आहे. मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकाल. खर्चाकडे लक्ष द्या. यशाचा मार्ग खुला होईल. एकत्रितपणे करण्याच्या कामावर भर दिला जाईल. जमीन-बांधकामांची प्रकरणे सुरळीत राहतील.
हे वाचा - आनंददायी, मोहक, प्रभावशाली असतात R आद्याक्षराच्या व्यक्ती; भावतो त्यांचा हा गुण
उपाय : रामरक्षा स्तोत्राचं पठण करा.
मीन (Pisces) : ऑफिसमध्ये काम करताना संयम आणि सावधगिरी बाळगणं गरजेचे आहे. इतरांच्या कामात ढवळाढवळ करणे टाळा. निष्काळजीपणा दाखवू नका. व्यवहारात सावध रहाल. जवळच्या व्यक्तीने दिलेला सल्ला पाळा. काम सामान्य राहील.
उपाय : ॐ नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.