मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /व्यवहारात समजूतदारपणा वाढेल, वाद-विवाद टाळा; 29 जानेवारीचं आर्थिक राशीभविष्य

व्यवहारात समजूतदारपणा वाढेल, वाद-विवाद टाळा; 29 जानेवारीचं आर्थिक राशीभविष्य

आर्थिक राशीभविष्य

आर्थिक राशीभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (29 जानेवारी 2023) राशिभविष्य...

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मेष (Aries) : कामाच्या ठिकाणी सहकार्याच्या भावनेमुळे गती मिळेल. गुंतवणुकीच्या बाबतीत सतर्क राहाल. संधीची वाट पाहणं गरजेचं आहे. विविध गोष्टींमध्ये तयारीने आणि समजूतदारपणे पुढे जाल. बिझनेसमध्ये सुलभता वाढवा. कोणत्याही कामात घाई टाळा.

उपाय : पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ दान करा.

वृषभ (Taurus) : व्यवसाय उत्तम राहील. विवेकबुद्धी आणि कृतिशीलता दाखवल्याने सर्वांवर चांगली छाप पडेल. कामाच्या बाबतीत सावधगिरी बाळगाल. उद्योगांना चालना मिळेल. सर्जनशील विचार कराल. कामाच्या प्रयत्नांना सहकार्य लाभेल.

उपाय : गायींना हिरवा चारा खाऊ घाला.

मिथुन (Gemini) : आर्थिक बाबतीत पुढे जाल. बिझनेसमध्ये आकर्षक ऑफर्स चालून येतील. नोकरीमध्ये शुभ काळ राहील. व्यावसायिक कामात रस दाखवाल. नोकरीमध्ये सहजतेने प्रगती होईल. बिझनेस वृद्धीच्या कामांना गती येईल.

उपाय : भगवान भैरवाच्या मंदिरात नारळ अर्पण करा.

कर्क (Cancer) : व्यावसायिकांशी सहकार्य कायम राहील. व्यावसायिक प्रस्तावांना सहकार्य लाभेल. नफ्याची टक्केवारी चांगली राहील. प्रलंबित कामं तुम्हाला अनुकूल होतील. व्यावसायिक बाबींची पूर्तता होईल. बिझनेस प्रभावी राहील. आत्मविश्वास वाढेल. भागीदारदेखील चांगलं काम करतील.

उपाय : सरस्वती देवीला पुष्पहार अर्पण करा.

सिंह (Leo) : महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कराल. नफा अधिक चांगला होईल. व्यवहारात समजूतदारपणा वाढेल. वाद-विवाद टाळा. समानतेची भावना कायम ठेवा. व्यावसायिक गोष्टींवरचा फोकस वाढेल. प्रशासकीय व्यवस्थापन प्रभावी राहील. नोकरी-धंद्यामध्ये संधी वाढतील.

उपाय : लाल रंगाच्या गायीला गूळ खाऊ घाला.

कन्या (Virgo) : कॉमर्सशी संबंधित व्यवसायात वृद्धी होईल. विजयाची आणि यशाची टक्केवारी वाढेल. इतरांचं सहकार्य कायम राहील. करिअर विकासाच्या संधी चालून येतील. व्यक्तिसापेक्ष समज वाढेल. गती कायम ठेवाल. उत्पन्न चांगले राहील. तसंच कामात सुधारणा करू शकाल.

उपाय : पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.

तूळ (Libra) : नोकरी-धंद्यामध्ये हालचाली होतील. परिश्रम कायम राहतील. कष्टाच्या क्षेत्रात मोठं यश मिळेल. आर्थिक बाबींमध्ये संयम बाळगाल. जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. धूर्त व्यक्तींपासून दूर राहल. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात चांगली वाढ होईल.

उपाय : साखर मिसळलेलं पीठ मुंग्यांसाठी ठेवा.

वृश्चिक (Scorpio) : कामाला सर्वाधिक वेळ द्याल. व्यवसायातल्या नफ्यावर पूर्ण लक्ष केंद्रित कराल. ऑफिसमध्ये मिळालेल्या नवीन जबाबदाऱ्या पार पाडाल. कामात व्यावसायिक बळ मिळेल. अतिउत्साह टाळाल. सुलभता वाढेल. जमीन व्यवहार फायद्याचे ठरतील.

उपाय : एखाद्या दिव्यांग व्यक्तीची सेवा करा.

धनू (Sagittarius) : ऑफिसच्या कामामध्ये संयम बाळगा. समंजसपणे काम पुढे न्याल. संकुचित विचारसरणी सोडा. तसंच वाद-विवाद टाळा. आर्थिक बाबींमध्ये स्पष्टता वाढेल. जवळच्या व्यक्तींचा सल्ला स्वीकाराल. नोकरीमध्ये फारसा बदल होणार नाही. सातत्य कायम ठेवाल. नियंत्रण वाढवणं गरजेचं आहे.

उपाय : सूर्यदेवाला अर्घ्य द्या.

मकर (Capricorn) : व्यापारी व्यक्तींसाठी आर्थिक बाबी सकारात्मक राहतील. नोकरदार व्यक्ती ऑफिसमध्ये गतिशील राहतील. नोकरी बदलण्याच्या विचारात असलेल्या व्यक्तींना संबंधित बातमी मिळेल. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी अधिक वेळ द्या, ज्यामुळे आर्थिक फायदा होईल. व्यवसायवृद्धीमध्ये यश मिळेल.

हे वाचा - जुळून आलाय गजकेसरी राजयोग! या राशीच्या लोकांना बसतील आनंदाचे धक्क्यावर-धक्के

उपाय : भगवान गणेशाला दूर्वा वाहा.

कुंभ (Aquarius) : व्यवसायातल्या प्रगतीमुळे उत्साह राहील. कामाच्या ठिकाणी अधिक वेळ व्यतीत कराल. ऑफिसमध्ये पात्रता आणि अनुभवाच्या मदतीने लक्ष्य साध्य कराल. कामाच्या ठिकाणी जबाबदार व्यक्तींसोबत बैठक होईल. नवीन प्रोजेक्टला गती मिळेल. बिझनेस ऑपरेशन्स चांगले परिणाम दाखवतील. चांगल्या पद्धतीने बोलत राहाल. आर्थिक बाबी सुधारतील.

उपाय : भगवान हनुमानासमोर तुपाचा दिवा लावा.

मीन (Pisces) : व्यवसायात आर्थिक यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी कराल. गुंतवणुकीबाबत कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. विनम्र व्हा. उद्योग-धंद्यात मोठं यश मिळेल. ध्येयावर लक्ष केंद्रित कराल. जवळच्या व्यक्तींचं सहकार्य लाभेल.

उपाय : श्रीसूक्ताचं पठण करा.

First published:

Tags: Money, Rashibhavishya, Rashichark