मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /व्यावसायिक कामात गती दाखवाल, योजनांना वेग मिळेल; 28 जानेवारीचं आर्थिक राशीभविष्य काय

व्यावसायिक कामात गती दाखवाल, योजनांना वेग मिळेल; 28 जानेवारीचं आर्थिक राशीभविष्य काय

आर्थिक राशीभविष्य

आर्थिक राशीभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (28 जानेवारी 2023) राशिभविष्य..

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मेष (Aries) : सध्या आनंद आणि समाधान वाढण्याचे संकेत आहेत. आयुष्यात नक्कीच प्रगती कराल. संपत्तीमध्ये वाढ होईल. प्रॉपर्टी संबंधित प्रकरणांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. करिअर आणि बिझनेस दोन्ही गोष्टींमध्ये फायदा होईल. बँकिंगमध्ये रस वाढेल. कामाच्या चर्चांमध्ये मोठे व्यावसायिक सहभागी होतील.

उपाय : भगवान कृष्णाला शुगर कँडीचा नैवेद्य दाखवा.

वृषभ (Taurus) : व्यवसायात महत्त्वाचे यश साध्य होईल. प्रोफेशनल प्रॉमिस पूर्ण कराल. एखादी मोठी बैठक यशस्वी होईल. करिअरमध्ये सुखद परिणाम दिसून येतील. परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रातील व्यक्तींना चांगल्या संधी उपलब्ध होतील. कामावर लक्ष केंद्रित राहील. अपेक्षित नफा होईल.

उपाय : एखाद्या काळ्या श्वानाला मोहरीचं तेल लावलेला पाव द्या.

मिथुन (Gemini) : जबाबदार आणि वरिष्ठ व्यक्तींचे म्हणणे ऐकाल. व्यावसायिक कामात गती दाखवाल. योजनांना वेग मिळेल. नियमात राहून काम कराल. तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. टॅलेंट परफॉर्मन्स अधिक सुधारेल. भावनांवर आवर घाला. स्वतःच्या प्रयत्नांनी मोठा नफा मिळवाल.

उपाय : हनुमान चालिसाचं पठण करा.

कर्क (Cancer) : आर्थिक बाजू मजबूत राहील. करिअर बिझनेसमधील कल कायम राहील. दिनचर्येत सुधारणा होईल. व्यावसायिकांचे सहकार्य लाभेल. प्रशासकीय व्यवस्थापन अधिक मजबूत होईल. करिअरमध्ये गती दिसेल. गोष्टी प्रलंबित ठेवणे टाळा. भावनांवर नियंत्रण राहील.

उपाय : वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.

सिंह (Leo) : कामाच्या ठिकाणी अडचणी कमी होतील. नोकरदार व्यक्तींसाठी चांगला काळ. कार्यक्षमता वाढेल. कामाशी निगडीत संबंध सुधारता येतील. तुमच्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. वस्तुस्थितीवर ठाम रहाल. आर्थिक बाबतीत स्पष्टता ठेवा.

उपाय : हनुमान चालिसाचं सात वेळा पठण करा.

कन्या (Virgo) : एखादी नवीन पार्टनरशिप सुरू होऊ शकते. भागीदारीच्या बाबतीत स्थैर्य येईल. व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होतील. उद्योगांचा व्यवसाय चांगला होईल. समतोल साधल्याने सामंजस्य वाढेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल.

उपाय : पिंजऱ्यातील पक्षांना मुक्त करा.

तूळ (Libra) : समजूतदारपणा आणि संवेदनशीलतेने पुढे जात रहा. दुपारपर्यंत परिणाम अनपेक्षित राहतील. तातडीच्या विषयांवर लक्ष केंद्रित करा. आर्थिक बाजू चांगली राहील. घाई टाळा. काम सामान्य राहील. वैयक्तिक खर्चांवर नियंत्रण ठेवाल.

उपाय : वाहत्या पाण्यात चांदीचे नाणं टाका.

वृश्चिक (Scorpio) : व्यवसायात धैर्याने पुढे जात रहाल. उत्पन्न अपेक्षेपेक्षा जास्त राहील. व्यावसायिक बाबींची पूर्तता होईल. नफा आणि व्यवसाय वृद्धी कायम राहील. नोकरदार व्यक्ती आपले संकल्प पूर्ण करू शकतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडतील.

उपाय : भगवान हनुमानाला नारळ अर्पण करा.

धनू (Sagittarius) : कामाच्या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्थापनाच्या क्षेत्रात चांगले परिणाम दिसून येतील. कामकाजात कार्यक्षमता आणि पात्रता वाढेल. ठरवलेल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित कराल. व्यावसायिकतेचा लाभ मिळेल. समंजसपणे काम कराल. अचानक नफ्याची शक्यता राहील.

उपाय : गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा.

मकर (Capricorn) : व्यवसायात चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या तर्कशुद्ध विचारसरणीचे कौतुक होईल. एकाहून अधिक स्त्रोतांमधून उत्पन्न मिळेल. व्यवसायात नवीन करार करण्यासाठी चांगली वेळ आहे. विविध बाबींमध्ये सामंजस्य वाढेल.

उपाय : गणेशाला दुर्वा वाहा.

कुंभ (Aquarius) : व्यवसायातील आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. विदेशात नोकरी करू इच्छिणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. ऑफिसमध्ये विरोधकांपासून सावध रहा. कोणालाही कर्ज वा उसने पैसे देणे टाळा. आर्थिक कामात व्यग्र रहाल.

हे वाचा - मकर राशीत येतोय बुध! या 8 राशीच्या लोकांना पैसा, नोकरी-करिअरमध्ये गुड न्यूज

उपाय : आईला काहीतरी गोड पदार्थ द्या.

मीन (Pisces) : आज सर्वच क्षेत्रांमध्येच चांगली कामगिरी कराल. वेगाने पुढे जाण्यास अडचण येणार नाही. कामाच्या ठिकाणी विश्वासार्हता आणि सन्मान वाढेल. करिअर व्यवसायाला चालना मिळेल. ठरवलेले ध्येय साध्य कराल. शुभ कार्याला गती मिळेल. घरामध्ये भव्यता वाढेल. आवश्यक गोष्टींवर खर्च करावा लागेल.

उपाय : गणेशाला लाडूंचा नैवेद्य दाखवा.

First published:

Tags: Money, Rashibhavishya, Rashichark