मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra - आर्थिक लाभ होणार पण महत्त्वाचे निर्णय घेताना मात्र सावध राहा

Money Mantra - आर्थिक लाभ होणार पण महत्त्वाचे निर्णय घेताना मात्र सावध राहा

27 नोव्हेंबर, 2022 रोजीचं आर्थिक राशिभविष्य.

27 नोव्हेंबर, 2022 रोजीचं आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं 27 नोव्हेंबर, 2022 राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (27 नोव्हेंबर 2022) राशिभविष्य

मेष (Aries) : आर्थिक प्रगतीसाठीच्या संधी वाढतील. वेगवेगळ्या क्षेत्रांत चांगलं काम कराल. प्रोफेशनॅलिझम कायम राखाल. कोणतंही नवं काम सुरू करू शकता. काही महत्त्वाच्या चर्चेमध्ये सहभागी व्हाल. बिझनेसमध्ये गती राखाल.

उपाय : घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडा.

वृषभ (Taurus) : आज सिस्टमिक गोंधळाची शक्यता आहे. वैयक्तिक प्रकरणांत सुलभता जाणवेल. आर्थिक बाबी संमिश्र राहतील. कर्जव्यवहार टाळा. संशोधनात सहभागी व्हा. कामातला संयम वाढवाल. गरजेचे निर्णय घेण्यास उशीर करू नका.

उपाय : श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा.

मिथुन (Gemini) : बिझनेस पार्टनशिपमधली प्रकरणं तुमच्या बाजूने होतील. प्रोफेशनल अचीव्हमेंट्स वाढतील. तुमचे बॉस तुमच्यासोबत आनंदी असतील. मोठं नियोजन कराल. तुमच्या बिझनेसमध्ये मोठे उद्योग सहभागी होतील. नेतृत्वगुणाची जाणीव होईल. आर्थिक लाभ उत्तम असतील. कामात स्पष्टता राखाल.

उपाय : भगवान शिवशंकरांवर पंचामृताचा अभिषेक करा.

कर्क (Cancer) : गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या घोटाळ्यात अडकण्यापासून स्वतःचा बचाव करा. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका. मीटिंगच्या वेळी सावधगिरी बाळगा. महत्त्वाच्या डील्समुळे करारामधला संयम वाढेल. गोंधळून जाऊ नका, दिशाभूल करून घेऊ नका. निर्णय घेताना काळजी घ्या. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांचा विश्वास जिंका.

उपाय : हनुमान चालिसा पठण करा.

सिंह (Leo) : आयुष्यातल्या महत्त्वाच्या कामांचा वेग जास्त राखाल. आत्मविश्वास वाटेल. आर्थिक मजबुती कायम राहील. चांगल्या ऑफर्स मिळतील. वेगवेगळी प्रकरणं सोडवली जातील. बिझनेसवर लक्ष केंद्रित कराल. नफ्याची टक्केवारी उत्तम असेल.

उपाय : श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा.

कन्या (Virgo) : ऑफिसच्या कामाबाबत गंभीर राहा. सहकारी मदत करतील. गुंतवणुकीच्या मोहाला बळी पडणं टाळा. तुमच्या बिझनेसमध्ये नफा प्राप्त कराल. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. सक्रियपणे काम कराल. पूर्वजांच्या बिझनेसमध्ये प्रभावी राहाल.

उपाय : पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ दान करा.

तूळ (Libra) : बिझनेसमध्ये संकोच कमी असेल. हवं असलेलं यश मिळेल. बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीजना गती मिळेल. साहित्य आणि कल्पनांची देवाणघेवाण वाढेल. कामात दुर्लक्ष करणं टाळा.

उपाय : गायींना हिरवा चारा खाऊ घाला.

वृश्चिक (Scorpio) : पैशांशी निगडित बाबी उत्तम असतील. बचत होईल. बिझनेससाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. संपत्तीत वाढ होईल. बिझनेस उत्तम असेल. कामाच्या परिस्थितीत सकारात्मकता वाढेल. निश्चितपणे पुढे जाल. नफ्याची टक्केवारी चांगली असेल.

उपाय : भैरव मंदिरात नारळ अर्पण करा.

धनू (Sagittarius) : प्रोफेशनल अचीव्हमेंट्समध्ये वाढ होईल. बिझनेसमध्ये पावित्र्य वाढेल. सिस्टीम मॅनेजमेंट मजबूत असेल. आर्थिक बाबी सोडवल्या जातील. योग्य दिशेने पुढे जाल. धैर्य वाढेल. उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल कराल. नव्या कामांमध्ये रस घ्याल इंडस्ट्री बिझनेसमध्ये सुधारणा होईल.

उपाय : भगवान शिवशंकरांना जल अर्पण करा.

मकर (Capricorn) : कर्जाऊ घेणं किंवा देणं टाळा. अन्यथा तोट्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी बडबड करणं टाळा. प्रोफेशनॅलिझम राखा. जुनी प्रकरणं उफाळून वर येतील. गुंतवणुकीबाबत रस घ्याल. बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये जागरूकता कायम राखली जाईल. बिझनेसच्या विस्तारीकरणावर लक्ष केंद्रित कराल.

उपाय : हनुमानाच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा.

कुंभ (Aquarius) : ऑफिसमध्ये अपेक्षित रिझल्ट्स मिळतील. पर्सनल परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. प्रत्येकाचा पाठिंबा मिळेल. आज महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होईल. प्रोफेशनल उद्दिष्टं साध्य होतील. जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडाल. बिझनेस मजबूत होईल.

उपाय : रामाच्या मंदिरात ध्वज अर्पण करा.

मीन (Pisces) : कामाच्या ठिकाणी प्रगतीसाठीचे प्रयत्न वाढवायला हवेत. पदामुळे प्रतिष्ठेत वाढ होईल. बिझनेसमध्ये कमर्शियल कामाला पाठिंबा मिळेल. सक्रिय राहाल. बिझनेसमध्ये वातावरण सकारात्मक राहील. प्रत्येकाला सपोर्ट मिळेल. अडथळे आपोआप दूर होतील.

उपाय : सरस्वती मातेला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya