मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra - बिझनेस करत असाल तर होईल भरभराट; नोकरी करणाऱ्यांनी मात्र आज जपूनच राहा

Money Mantra - बिझनेस करत असाल तर होईल भरभराट; नोकरी करणाऱ्यांनी मात्र आज जपूनच राहा

24 नोव्हेंबर, 2022 रोजीचं आर्थिक राशिभविष्य.

24 नोव्हेंबर, 2022 रोजीचं आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं 24 नोव्हेंबर, 2022 राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (24 नोव्हेंबर 2022) राशिभविष्य

मेष (Aries) : ऑफिसमधल्या व्यक्तींशी चांगली वर्तणूक ठेवल्यास करिअर आणि बिझनेसमध्ये सुधारणा होईल. उत्पन्न आणि खर्चाचं संतुलन राहील. नोकरी शोधणाऱ्यांसाठी नव्या संधी तयार होतील. आज तुमच्या बिझनेसमध्ये विकासाची शक्यता आहे.

उपाय : आईला काही तरी गोड खाऊ घाला.

वृषभ (Taurus) : प्रोफेशनल बाबी वेळेवर पूर्ण करा. कामाचा वेग उत्तम असेल. कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांकडून सल्ला घ्या. खर्च आणि बजेटकडे लक्ष द्या. अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा. तुमच्या बिझनेसच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्या.

उपाय : भगवान विष्णूला पिवळ्या वस्तू अर्पण करा.

मिथुन (Gemini) : आज तुमच्या बिझनेसमध्ये तुमचं काम अपेक्षित रिझल्ट्स देईल. अडथळे आपोआप दूर होतील. ऑफिसमध्ये टीमवर्क वाढीला लागेल. आज तुम्हाला नव्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी काम करण्याची परिस्थिती सुधारेल. चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांकडून सहकार्य मिळेल.

उपाय : श्री गणेशाला लाडू अर्पण करा.

कर्क (Cancer) : आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला बिझनेसमध्ये नफा मिळेल. तुमच्या नियोजनामधला आत्मविश्वास उच्च असेल. तुम्हाला नोकरीमध्ये संधी मिळेल. तुम्हाला प्रसिद्धी आणि इतरांकडून आदर मिळेल. तुमचं नियोजन आणि त्याची अंमलबजावणी तुम्हाला नफा देईल.

उपाय : पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्ष्यांना सोडून द्या.

सिंह (Leo) : नोकरदार व्यक्तींना आकर्षक ऑफर्स मिळतील. कामाला जास्तीत जास्त वेळ द्या. व्यावसायिकांसाठी संधींमध्ये वाढ होईल. गुंतवणुकीमध्ये नफा मिळेल. आर्थिक कृतींना बळ मिळेल.

उपाय : हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडाचं सात वेळा पठण करा.

कन्या (Virgo) : आज तुम्हाला नफा मिळेल; मात्र संयम बाळगा. निर्णय अति घाईत घेऊ नका. अन्यथा तोटा होऊ शकेल. अन्य देशांमधून तुम्हाला संधी प्राप्त होतील. व्यवहारांमधली पारदर्शकता वाढवा. प्रोफेशनल बाबींमध्ये नम्र राहा.

उपाय : वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.

तूळ (Libra) : आर्थिक आणि बिझनेसच्या क्षेत्रात बिझनेसमन्स उत्तम प्रयत्न करतील. जोखमीच्या कृतींमध्ये रस घेऊ नका. स्टॉक मार्केट आणि स्पेक्युलेशनमध्ये तोटा होऊ शकतो. कला-कौशल्यांमध्ये वाढ होऊ शकेल. बिझनेसमध्ये मोठं नियोजन करा. लवकरच तुम्हाला मोठं यश प्राप्त होईल.

उपाय : हनुमान चालिसा पठण करा.

वृश्चिक (Scorpio) : आज तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. गुंतवणुकीमुळे तोटा होऊ शकतो. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा.

उपाय : मोहरीचं तेल लावलेला ब्रेड काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.

धनू (Sagittarius) : कामाच्या ठिकाणी तुम्हाला यशप्राप्ती होईल. उपलब्ध रिसोर्सेसकडे लक्ष द्या. संपत्तीत वाढ होईल. कर्ज घेणं टाळा. अन्यथा परतफेड करणं मुश्कील होईल. तुमच्या पाठीमागे रचल्या जाणाऱ्या कटाविषयी महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल. बिझनेसमध्ये नशीब चांगली साथ देईल.

उपाय : श्रीकृष्णाला साखर अर्पण करा.

मकर (Capricorn) : आज तुम्ही गरजेच्या नसलेल्या वस्तूंवर खर्च करू शकता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. तुमचं रखडलेलं काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या बिझनेसमधल्या नियोजनावर लक्ष केंद्रित करा.

उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा आणि 108 वेळा गणेश मंत्र म्हणा.

कुंभ (Aquarius) : बिझनेसमन्सना आज बिझनेसमध्ये नफा मिळेल. ऑफिसमधल्या कामाची गती चांगली राहील. वरिष्ठ आणि ऑफिसर्स यांच्यासोबत मीटिंग होईल. मित्रांकडून सपोर्ट मिळेल. कामाच्या ठिकाणी आज काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. क्रिएटिव्ह राहा.

उपाय : दुर्गा मंदिरात जाऊन दुर्गा चालिसा म्हणा.

मीन (Pisces) : आज स्टॉक मार्केट किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करू नका. कर्ज घेऊ नका, कर्जाचे व्यवहार करू नका. आज ज्येष्ठांशी समन्वय साधाल. तुमचा बिझनेस नॉर्मल असेल आणि तार्किक कृतींमध्ये वाढ होईल. ऑफिसमध्ये वाद टाळा. बिझनेससाठीच्या तुमच्या प्रयत्नांमध्ये वाढ होईल.

उपाय : भैरव मंदिरात मिठाई अर्पण करा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Money, Rashibhavishya