मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra - वाढत्या गरजांना आताच आवर घाला नाहीतर...; वाचा आजचं आर्थिक राशिभविष्य

Money Mantra - वाढत्या गरजांना आताच आवर घाला नाहीतर...; वाचा आजचं आर्थिक राशिभविष्य

23 नोव्हेंबर 2022 रोजीचं 
आर्थिक राशिभविष्य.

23 नोव्हेंबर 2022 रोजीचं आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं 23 नोव्हेंबर, 2022 राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (23 नोव्हेंबर 2022) राशिभविष्य

मेष (Aries) : कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत संवाद वाढेल. बदल सहजतेने स्वीकारा. संपत्ती आणि नफा मिळेल. बिझनेसमध्ये प्रगती होईल.

उपाय : श्री गणेशाची पूजा करा.

वृषभ (Taurus) : ऑफिसमध्ये कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला चिंता सतावेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. गरजा नियंत्रित करा. अन्यथा खर्चाचं प्रमाण खूप जास्त होईल. एका वेळी दोन प्रोजेक्ट्सवर काम करू नका.

उपाय : हनुमानाच्या मंदिरात जाऊन बजरंग बाण स्तोत्राचं पठण करा.

मिथुन (Gemini) : बिझनेसमध्ये समस्या असू शकतात. ऑफिसमध्ये कोणतंही काम सूडाच्या भावनेने करू नका. प्रिय व्यक्तींसोबत वाद वाढतील. दिसण्यावर केलेल्या खर्चामुळे कर्ज होऊ शकेल.

उपाय : सूर्याची पूजा करा.

कर्क (Cancer) : दीर्घ काळ प्रलंबित राहिलेल्या प्रोजेक्ट्समुळे मानसिक ताण वाढू शकेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकेल. भावनेच्या भरात वाहून जाऊन कोणालाही कसलंही वचन देऊ नका. त्याचा भविष्यात पश्चात्ताप करावा लागू शकतो.

उपाय : श्री गणेशाला शेंदूर अर्पण करा.

सिंह (Leo) : आर्थिक समस्या टाळू इच्छित असलात, तर कोणाशीही कोणतंही डील करू नका. अन्यथा तोटा होण्याची शक्यता आहे. सातत्याने समस्या उद्भवत असल्याने तुमचा उत्साह कमी असेल. बिझनेसमन्ससाठी दिवस सर्वसाधारण असेल.

उपाय : गोशाळेकरिता दान करा.

कन्या (Virgo) : ऑफिसमध्ये जबाबदारी वाढेल. कोणत्याही नव्या व्यक्तींवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांच्याविषयी सखोल माहिती घ्या. अन्यथा कोणत्या तरी कायदेविषयक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे; मात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

उपाय : बुध ग्रहाशी निगडित वस्तूंचं दान करा.

तूळ (Libra) : सातत्याने वाढत असलेल्या गरजा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणतील. तुम्हाला कर्जही घ्यावं लागू शकतं. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. बिझनेसमन्सना फायदा मिळेल, फक्त तुमचे शब्द योग्य प्रकारे मांडा.

उपाय : मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

वृश्चिक (Scorpio) : कौटुंबिक समस्या वाढू शकतील. त्याचा परिणाम ऑफिसच्या कामावर होऊ शकेल. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवणं उत्तम. निर्णय वेळेवर घेण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी एखादी नवी शक्यता तयार होत आहे.

उपाय : प्राण्यांची सेवा करा.

धनू (Sagittarius) : आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला गुंतवणुकीच्या चांगली संधी मिळतील. प्रिय व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील. व्यापाऱ्यांनी शहाणपणाने निर्णय घेतले पाहिजेत.

उपाय : सरस्वतीमातेची पूजा करा.

मकर (Capricorn) : पैशांशी निगडित समस्या कायम राहतील. आर्थिक परिस्थितीशी निगडित काळजी मनात राहील. गरजेच्या नसलेल्या खर्चांसाठी कर्ज घेण्याची गरज भासेल. जमिनीत केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळेल.

उपाय : शिवलिंगावर अभिषेक करा.

कुंभ (Aquarius) : ऑफिसच्या कामाबद्दल विनाकारण चिंता वाटेल. मनात अस्वस्थता असेल. कौटुंबिक जीवनातही उलथापालथ होईल. बिझनेसमन्ससाठी आजचा दिवस पूर्णतः निराशाजनक असेल.

उपाय : भैरव मंदिरात ध्वज अर्पण करा.

मीन (Pisces) : थांबलेल्या कामांबद्दल काळजी वाटेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणेनंतर नव्या गुंतवणूक संधी उपलब्ध होतील. नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

उपाय : श्रीसूक्ताचं पठण करा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya