मेष (Aries) : कामाच्या निमित्ताने केलेला एखादा जवळचा प्रवास तुमच्या चांगल्या भविष्यासाठीची दारं उघडेल. या वेळी काही नव्या अचीव्हमेंट्स साध्य होण्याचीही शक्यता आहे; मात्र नफ्याचा मार्ग संथ राहील. नोकरदार व्यक्तींनी त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करू नये.
उपाय : शिवलिंगावर जलाभिषेक करा.
वृषभ (Taurus) : आजचा दिवस व्यावसायिकदृष्ट्या चांगला आहे. काही वेळा काही समस्या उद्भवतील; मात्र तुम्ही बुद्धिमत्तेने समस्यांवरचं उत्तर शोधून काढाल. नोकरदार व्यक्तींनी त्यांच्या ऑफिसच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण भविष्यात त्यांच्या प्रगतीच्या शक्यता खूप आहेत.
उपाय : भगवान विष्णूची आराधना/पूजा करा.
मिथुन (Gemini) : या वेळी जनसंपर्क बिझनेस वाढवण्याच्या दृष्टीने खूपच फायद्याचा ठरेल. मीडिया आणि फोनच्या माध्यमातून महत्त्वाची काँट्रॅक्ट्स मिळू शकतात. नोकरीत प्रमोशनचीही शक्यता आहे. त्यामुळे कामाप्रति समर्पण भावना असू दे.
उपाय : योगासनं, प्राणायाम करा.
कर्क (Cancer) : बिझनेसमध्ये जागेत बदल होण्याची शक्यता आहे. टॅक्स, कर्ज आदी प्रकरणांत गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे आज या संदर्भातली कामं करू नका. ऑफिसमध्ये बॉस आणि अधिकाऱ्यांशी नातेसंबंध चांगले राहतील.
उपाय : हनुमानाची पूजा/आराधना करा.
सिंह (Leo) : सध्या तुमच्या बिझनेस अॅक्टिव्हिटीजकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण काही प्रकारचा तोटा होण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांच्या अॅक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवा. ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा आणि रेप्युटेशन यांमध्ये वाढ होईल. तुम्हाला काही महत्त्वाचे अधिकार/जबाबदारीही मिळेल.
उपाय : भगवान कृष्णाची पूजा/आराधना करा.
कन्या (Virgo) : बिझनेसच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं कामाप्रति पूर्ण समर्पण असेल आणि तुमचा डॉमिनन्सही राहील. काही काळासाठी सुरू असलेले चढ-उतार थांबतील. नोकरदार व्यक्तींना नोकरी बदलण्याची काही संधी आली, तर ती त्यांनी तातडीने स्वीकारावी.
उपाय : गोमातेला हिरवा चारा खाऊ घाला.
तूळ (Libra) : बिझनेसच्या कामामधली गती संथ असेल. तुमच्या कामाच्या दर्जात सुधारणेची गरज आहे. नोकरदार व्यक्तींनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की काहीही चुकीचं काम केलं, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राग ओढवून घ्यावा लागेल.
उपाय : हनुमानाला शेंदूर अर्पण करा.
वृश्चिक (Scorpio) : कामाच्या ठिकाणी अॅक्टिव्हिटीज काहीशा संथ असतील. वसुली आणि मार्केटिंग यासाठी दिवस व्यतीत करा. त्यामुळे आर्थिक परिस्थितीही सुधारेल. नोकरदार व्यक्तींना बदलांविषयीची माहिती मिळेल.
उपाय : श्री गणेशाला लाडूंचा नैवेद्य दाखवा.
धनू (Sagittarius) : सध्या बिझनेसमध्ये खूप नफ्याची अपेक्षा धरू नका. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे कामाच्या ठिकाणी खूप वेळ व्यतीत करणं शक्य होणार नाही. नोकरदार व्यक्तींना त्यांचं टार्गेट पूर्ण करण्यापासून दिलासा मिळेल.
उपाय : श्री गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखवा.
मकर (Capricorn) : बिझनेस अॅक्टिव्हिटीज नॉर्मल असतील. तुमची बरीचशी कामं फोनच्या माध्यमातूनच होतील. सध्या शेअर्स आणि स्टॉक मार्केटशी संबंधित बिझनेसना नफा मिळेल. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणं गरजेचं आहे.
उपाय : शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करा.
कुंभ (Aquarius) पार्टनरशिपशी निगडित कामांमध्ये नफ्याची परिस्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही कामात तुमच्या पार्टनरची मदत घ्या. ती फायद्याची ठरेल. मार्केटिंगशी संबंधित कामं हाताळणं तुमच्यासाठी योग्य ठरेल. नोकरदार व्यक्तींना ऑफिसच्या धोरणांमध्ये काही बदल घडवण्याची गरज वाटेल.
हे वाचा - अंकशास्त्रानुसार #नंबर 7 साठी 2023 हे वर्ष कसं असेल? जाणून घ्या भविष्य
उपाय : शिवलिंगावर जलाभिषेक करा.
मीन (Pisces) : आज तुमची पूर्ण क्षमता कामाच्या प्रमोशनमध्ये लावा. निश्चित धोरणाने काम केल्याने यशाची शक्यता वाढेल. बिझनेसच्या विस्तारीकरणाचे प्लॅन्स गांभीर्याने घ्या. नोकरीत काही किरकोळ समस्या असतील; मात्र विवेक आणि समजून घेण्यामुळे तुम्हाला उपाय सापडेल.
उपाय : योगासनं आणि प्राणायाम करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Horoscope, Rashibhavishya, Rashichark