मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra - तुमची एक छोटीशी चूक आर्थिक प्रगतीत ठरेल अडथळा; आर्थिक राशिभविष्य वाचून सतर्क व्हा

Money Mantra - तुमची एक छोटीशी चूक आर्थिक प्रगतीत ठरेल अडथळा; आर्थिक राशिभविष्य वाचून सतर्क व्हा

22 नोव्हेंबर 2022 रोजीचं आर्थिक राशिभविष्य.

22 नोव्हेंबर 2022 रोजीचं आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं 22 नोव्हेंबर, 2022 राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (22 नोव्हेंबर 2022) राशिभविष्य

मेष (Aries) : आज नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. प्रमोशन मिळेल. कामाला उशीर करू नका. अन्यथा आर्थिक प्रगतीत अडथळा निर्माण होईल. सावधगिरीने पुढे जात राहा. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

उपाय : माशांना खाऊ घाला.

वृषभ (Taurus) : कामाच्या ठिकाणी संयम बाळगा. तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील. बिझनेसमध्ये तुम्हाला नफा मिळेल. नोकरीची संधी मिळेल. गुंतवणुकीतही नफा मिळेल.

उपाय : पिठात साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घाला.

मिथुन (Gemini) : ऑफिसमधलं वातावरण सकारात्मक असेल. गरजेच्या कामांना उशीर करू नका. नियोजन आणि त्याची अंमलबजावणी यातून बिझनेसमध्ये चांगला नफा मिळेल. गुंतवणुकीची चांगली संधी मिळेल. अनोळखी व्यक्तींपासून अंतर राखा. अफवांमुळे विचलित होऊ नका.

उपाय : अपंग व्यक्तीची सेवा करा.

कर्क (Cancer) : कमर्शियल कामांमध्ये भावनिकता आणि बेफिकिरी टाळा. बिझनेसमध्ये सकारात्मक वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी आत्मविश्वासाच्या पातळीत वाढ होईल. आज स्टार्टअपसाठी काही कल्पना मिळतील. त्यातून तुम्हाला चांगलं यश मिळेल. बिझनेसमध्ये आज तुमच्यावरचा कामाचा ताण वाढेल.

उपाय : तेलात बनवलेली इम्रती काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.

सिंह (Leo) : कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास कायम राखाल. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. आज नफ्यात वाढ होईल. बिझनेसमध्ये मोठी उद्दिष्टं पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी अचीव्हमेंट्समध्ये वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी कामाकरिताच्या सोयीसुविधांमध्ये वाढ होईल.

उपाय : श्री लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करा.

कन्या (Virgo) : बिझनेसशी संबंधित प्रकरणांमध्ये हवे असलेले रिझल्ट्स मिळतील. आज तुमच्या टॅलेंटचं कौतुक होईल. तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल. मोठं नियोजन करणं गरजेचं आहे. बिझनेसमध्ये चांगला नफा मिळेल.

उपाय : सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या.

तूळ (Libra) : आज तुमची गुंतवणूक आणि बिझनेसमध्ये तोटा होण्याची शक्यता आहे. नोकरीत तुमचं क्रिएटिव्ह काम वाढेल. परदेशी काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल. आर्थिक प्रकरणांमध्ये व्यग्रता वाढेल.

उपाय : केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.

वृश्चिक (Scorpio) : कामाच्या ठिकाणी क्रिएटिव्हिटी वाढेल. नफ्याची टक्केवारी चांगली असेल. फ्री-लान्स कामामध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये गरजेची उद्दिष्टं गाठली जातील. नोकरदार व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारेल.

उपाय : छोट्या मुलींना खीर खाऊ घाला.

धनू (Sagittarius) : कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने पुढे जाल. मेहनतीने काम कराल. भविष्यासाठी केलेल्या नियोजनातून चांगले रिझल्ट्स मिळतील. नोकरीत तुम्हाला आकर्षक ऑफर्स मिळतील. आयुष्यात नव्या अचीव्हमेंट्स साध्य होतील. बिझनेसमध्ये प्रगती होईल.

उपाय : दुर्गामातेला लाल ओढणी अर्पण करा.

मकर (Capricorn) : उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला कुटुंबीयांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुम्हाला बिझनेसच्या कारणास्तव प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक बाबी तुम्हाला अनुकूल पद्धतीने घडतील. आज बिझनेसमध्ये नफा वाढेल.

उपाय : श्री हनुमानाला नारळ अर्पण करा.

कुंभ (Aquarius) : करिअरबद्दल निर्णय घेताना वरिष्ठ व्यक्तींकडून सल्ला घ्या. कोणालाही पैसे कर्जाऊ देऊ नका. पैसे अडकून पडू शकतात. गुंतवणुकीच्या नावाखाली घोटाळा घडू शकतो. महत्त्वाचं काम वेळेवर पूर्ण करा.

उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा.

मीन (Pisces) : बिझनेसमधल्या करिअरची कोणत्याही संकोचाविना प्रगती होईल. आज बिझनेसशी संबंधित चांगली बातमी मिळेल. बिझनेससाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. बिझनेसमध्ये अपेक्षित असलेल्यापेक्षा जास्त नफा मिळेल. बिझनेससंदर्भात अनुभवी व्यक्तींकडून सल्ला घ्या.

उपाय : गायत्री मंत्राचं 108 वेळा पठण करा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya