मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra : संपत्तीच्या बाबतीत आजचा दिवस चांगला, पण सांभाळून करा गुंतवणूक

Money Mantra : संपत्तीच्या बाबतीत आजचा दिवस चांगला, पण सांभाळून करा गुंतवणूक

Money Mantra : संपत्तीच्या बाबतीत आजचा दिवस चांगला, पण सांभाळून करा गुंतवणूक

Money Mantra : संपत्तीच्या बाबतीत आजचा दिवस चांगला, पण सांभाळून करा गुंतवणूक

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं 21 नोव्हेंबर, 2022 राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (21 नोव्हेंबर 2022) राशिभविष्य.

मेष (Aries): आजचा दिवस काहीतरी असाधारण आणि विशेष करण्यात घालवला जाईल. सकारात्मक गोष्टींचा विचार करा आणि तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळेल. कर्ज घेणं किंवा देणं टाळा.

उपाय: गायीला ताजा हिरवा चारा खाऊ घाला.

वृषभ (Taurus): संपत्तीच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्ही तुमच्या आरामासाठी पैसे खर्च कराल. बिझनेसमध्ये आज नवीन मित्र आणि भागीदार तयार होतील. योग्य विचार न करता गुंतवणूक करू नका.

उपाय: घराबाहेर पडण्यापूर्वी कपाळावर केशरी टिळा लावा.

मिथुन (Gemini): आजचा दिवस थोडा तणावपूर्ण आणि व्यस्त असेल. याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. कोणतंही काम प्रलंबित ठेवणं टाळा. तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज तुमच्याकडे काही पाहुणे येण्याची शक्यता आहे.

उपाय: गरजूंना पिवळ्या रंगाचे कपडे दान करा.

कर्क (Cancer): संपत्तीच्या बाबतीत आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. आज तुम्हाला मालमत्तेच्या बाबतीत चांगले लाभ मिळू शकतात. मात्र, या काळात तुम्हाला काही खर्चही करावा लागेल. अनेक दिवसांपासून रखडलेलं काम आज पूर्ण होऊ शकतं.

उपाय: घराजवळ काही झाडं लावा.

सिंह (Leo): सिंह राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. दिवसभर तुम्हाला तुम्ही खूप नशीबवान असल्याचं जाणवेल. आज कामाच्या ठिकाणी बदल करणं तुमच्यासाठी चांगलं ठरू शकतं. निष्ठा ठेवून तुम्ही लोकांची मनं जिंकू शकता. बिझनेसमध्ये तुमच्या जवळच्या सहकाऱ्यांशी नम्रपणे वागा.

उपाय: एका भांड्यात मीठ घालून ते घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा.

कन्या (Virgo): आजचा दिवस तुमच्यासाठी अगदी सामान्य असेल. आज तुम्हाला अनेक लोकांना मदत करण्याची संधी मिळेल. त्यासाठी आवश्यक ती कृती करा. शांत राहा आणि सर्वांशी आदरानं वागा. कामाच्या ठिकाणी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं फायदेशीर ठरेल.

उपाय: उंबराच्या (औंदुबर) झाडाची मूळी एका लहान कापडात गुंडाळा आणि आपल्या मनगटाला बांधा.

तूळ (Libra): तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक राहील. आजचा दिवस आनंदात घालवाल. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मित्र पुढे येतील. तुमची चांगली वेळ सुरू आहे आणि नशीब तुमच्या बाजूने आहे. उशीर न करता त्याचा फायदा घ्या.

उपाय: आपल्या कामाच्या ठिकाणी एक पिरॅमिड ठेवा.

वृश्चिक (Scorpio): स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष असेल. एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आजचा दिवस आनंदाचे क्षण आणि आर्थिक समाधानाने भरलेला असेल. आज कर्ज घेऊ नका किंवा देऊ नका.

उपाय: हनुमान चालिसाचं पठण करा.

धनू (Sagittarius): धनु राशीच्या लोकांना आज भरपूर आर्थिक कमाई होईल आणि त्यामुळे तुमच्या निधीमध्ये वाढ होईल. कुटुंबामुळे तुम्हाला संपत्ती आणि आनंद दोन्ही मिळेल. येणाऱ्या अडचणी स्वतःहून हाताळण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर विश्वास ठेवा.

उपाय: घराच्या दक्षिण दिशेला एक शंख ठेवा.

मकर (Capricorn): मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस खूप व्यस्त असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात लक्ष दिलं पाहिजे. अनावश्यक कामांमध्ये गुंतल्यानं तुमचा बराच वेळ वाया जाईल. तुम्ही वेळीच तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वाहन चालवताना सावध राहा.

उपाय: धार्मिक ठिकाणी पीठ दान करा.

कुंभ (Aquarius): आज तुम्ही काहीतरी उल्लेखनीय काम करणार आहात. तुमचं नशीब तुमच्या बाजूने आहे, यामुळे तुम्हाला चांगली रक्कम मिळण्यास मदत होईल. तुमचा विरोधक कोणीही असो तुमची बाजू योग्य असेल तर विजय तुमचाच होईल.

उपाय: मंदिरात शिरा आणि खिचडी दान करा.

मीन (Pisces): इच्छापूर्तीसाठी आजचा दिवस योग्य आहे. तुमच्या मनातील कोणतीही गोष्ट उघडपणे सांगण्यास तुम्ही सक्षम असाल. आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवर खर्च कराल. तुम्ही एखाद्या छोट्या ट्रिपला जाल, त्यामुळे तुम्हाला अनपेक्षित नफा मिळेल.

उपाय: मेडिटेशन आणि योग करा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya