मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra: नवीन प्लॅन ठेवा तयार, नाहीतर..; आजच्या आर्थिक राशिभविष्यातील 'मनी मंत्रा'

Money Mantra: नवीन प्लॅन ठेवा तयार, नाहीतर..; आजच्या आर्थिक राशिभविष्यातील 'मनी मंत्रा'

Money Mantra : संपत्तीच्या बाबतीत आजचा दिवस चांगला, पण सांभाळून करा गुंतवणूक

Money Mantra : संपत्तीच्या बाबतीत आजचा दिवस चांगला, पण सांभाळून करा गुंतवणूक

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं 20 नोव्हेंबर, 2022 राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (20 नोव्हेंबर 2022) राशिभविष्य.

मेष (Aries): आज तुम्ही चांगल्या कर्माद्वारे तुमची तसेच तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थिती सुधाराल. तुमच्या दयाळू कृतींमुळे तुम्हाला संपत्ती मिळेल. तुमची उद्दिष्टे सहज साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या निर्णय क्षमतेचा फायदा घ्यावा लागेल.

उपाय: संपत्ती मिळवण्यासाठी पांढऱ्या रंगातील वस्तूंचं दान करा.

वृषभ (Taurus): मुलांशी संबधित गोष्टी आणि कुटुंबाच्या बाबतीत आज तुम्ही खूप भाग्यवान असाल. तुमची मुलं तुम्हाला प्रसिद्धी, पैसा आणि आनंद मिळवून देतील. तुम्हाला ऐश्वर्याचा अनुभव येईल आणि गोष्टी व्यवस्थित झाल्यास तुम्हाला चांगलं वाटेल. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोतदेखील मिळतील.

उपाय: आई-वडिलांची काळजी घ्या आणि कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी त्यांचा आशीर्वाद घ्या.

मिथुन (Gemini): योग्य वेळी निर्णय घेता न आल्यास आज तुम्ही अडचणीत येऊ शकता. भांडणं, युक्तिवाद आणि कायदेशीर किंवा न्यायालयाशी संबंधित प्रकरणांमध्ये पडणं टाळा. अशा परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल असतील. तुमच्या वरिष्ठांवर तुमच्या कामाची छाप पडेल आणि त्यानुसार नोकरीत सुधारणा दिसून येतील. स्मार्ट वर्क हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

उपाय: विष्णू सहस्रनामाचा पाठ करा आणि विष्णूची पूजा करा.

कर्क (Cancer): आजचा दिवस वर्किंग प्रोफेशनल्ससाठी चांगला आहे. कारण, आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी पगारवाढीसारख्या काही सकारात्मक बातम्या मिळतील. तुमच्या संवाद कौशल्याकडे विशेष लक्ष द्या आणि लोकांना प्रभावित करण्यासाठी त्यांचा चांगला वापर करा. तुम्ही झटपट आणि सारासार विचार करून घेतलेले निर्णय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील.

उपाय: गरजू मुलांना वह्या आणि स्टेशनरीचं वाटप करा.

सिंह (Leo): आज तुम्ही तुमच्या कामाच्याबाबतीत चांगले बदल अनुभवाल. व्यावसायिकांनी त्यांच्या कार्यशैलीत काही बदल केल्यास अधिक नफा मिळेल. वर्किंग प्रोफेशनल्सना ऑफिसमध्ये अधिक सन्मान आणि जबाबदाऱ्या मिळतील. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक लाभासाठी जपून वागा.

उपाय: तुमच्या घराच्या बाल्कनीत फुलझाडं ठेवा आणि त्यांची निगा राखा.

कन्या (Virgo): आज तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्यांचा भार पडेल परंतु दीर्घकाळासाठी त्यांचा फायदा होईल. तुम्‍ही तुमच्‍या आरामासाठी आणि लक्झरीसाठी पैसे खर्च करण्‍याची शक्यता आहे. तुमच्या उदार आणि दयाळूवृत्तीचं फळ मिळेल. तुमच्या चांगल्या कर्मामुळं मुलांना नशीबाची साथ मिळेल. आपल्या आरोग्याची दिवसभर काळजी घ्या.

उपाय: गाईंना चणे-फुटाणे आणि गूळ खायला द्या.

तूळ (Libra): आज तुम्ही तुमच्या कृतींबाबत अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आरोग्याच्या समस्या वाढतील किंवा वाढू शकतात. त्यामुळे तुमचा खर्च वाढू शकतो. तरीही तुम्हाला खूप धन्य आणि समाधानी वाटेल. किरकोळ समस्या येतील.

उपाय: शुक्रवारी गरजूंना बटाटे दान करा आणि ‘श्री सुक्ता’चं पठण करा.

वृश्चिक (Scorpio): एखादी मौल्यवान गोष्ट आज तुम्हाला अनपेक्षित नफा मिळवून देईल. तुमच्या सर्व अडचणींतून बाहेर पडण्यासाठी तुमच्यासोबत असलेल्या ऑरामुळे मदत होईल. तुमचे शत्रू तुम्हाला मात देऊ शकणार नाहीत. तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल तर प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आज आराम आणि आनंद मिळेल.

उपाय: मुंग्यांना साखर खायला द्या.

धनू (Sagittarius): तुमच्या हुशारीमुळे तुम्हाला विविध गोष्टींचा शोध घेता येईल आणि त्यामुळे आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. गुरु, शिक्षक आणि पालकांसारख्या तुमच्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा मिळेल. आज विश्वासू लोक तुमचा विश्वास तोडू शकतात. फसवणुकीपासून सावध रहा. कुटुंबासोबत राहणं फायदेशीर ठरेल.

उपाय: तुमच्या पाकिटात तांब्याची तीन नाणी ठेवा.

मकर (Capricorn): आज कामाच्या ठिकाणी तुमचा इतरांवर प्रभाव राहील. विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनपेक्षितपणे काही पैसे मिळतील. गैरसमज आणि वाद टाळावेत. जमिनीशी संबंधित कामांमध्ये सावध राहा.

उपाय: महालक्ष्मी यंत्राची पूजा करा.

कुंभ (Aquarius): जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तुमच्या आतल्या आवाजावर पूर्ण विश्वास ठेवा. घाई करू नका. सांसारिक सुखं तुमच्या वाट्याला येतील. नवीन उपक्रम सुरू करणं फायदेशीर ठरेल. आज तुमची मुलं किंवा पालकांमुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्ही जे काम हाती घ्याल ते तुम्ही समर्पणानं केलं तर यशस्वी व्हाल.

उपाय: तुमच्या देवघरात एक श्री यंत्र ठेवा आणि त्याची नियमित पूजा करा.

मीन (Pisces): तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची व्यवस्था करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला सहज कर्ज मिळेल. नवीन प्लॅन तयार करून त्यांची अंमलबजावणी केल्यास यश मिळेल. नेहमी धैर्य आणि आत्मविश्वास बाळगा. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर खर्च करावा लागू शकतो. आतड्यांसंबंधीच्या समस्या कायम राहतील.

उपाय: एक चांदीचं नाणं लाल कपड्यात गुंडाळा आणि ते तिजोरीत ठेवा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle