मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Money Mantra: आर्थिक आघाड्यांवर कसा असेल तुमचा आजचा दिवस, वाचा राशीनुसार

Money Mantra: आर्थिक आघाड्यांवर कसा असेल तुमचा आजचा दिवस, वाचा राशीनुसार

आर्थिक राशीभविष्य

आर्थिक राशीभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (13 जानेवारी 2023) राशिभविष्य

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मेष (Aries) : बिझनेसमन्सची जुनी कायदेविषयक प्रकरणं पुन्हा उफाळून वर येऊ शकतील. संयम दाखवाल. बिझनेसशी संबंधित आर्थिक प्रकरणं वाढतील. नोकरदार व्यक्ती बजेट तयार करून काम करतील. खर्चावरचं नियंत्रण वाढवा. अन्यथा तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल. गुंतवणूक आणि विस्तारीकरणाच्या कामाशी जोडले जाल.

उपाय : शिवलिंगावर जलाभिषेक करा.

वृषभ (Taurus) : कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. केवळ सध्याच्या कामांवरच लक्ष केंद्रित करा. कोणताही नवा प्लॅन किंवा प्लॅनिंगवर काम करणं धोकादायक ठरू शकेल.

उपाय : श्री गणेशाची पूजा करा.

मिथुन (Gemini) : मार्केटिंग आणि इम्पोर्ट-एक्स्पोर्टशी निगडित व्यवसाय नफा देणारे ठरतील. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार करताना कागदपत्रांचं काम काळजीपूर्वक करावं लागेल. सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तींसाठी प्रमोशनच्या संधी तयार होत आहेत.

उपाय : गरजू व्यक्तींना मदत करा.

कर्क (Cancer) : बिझनेसमध्ये खूप व्यग्र असाल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याबद्दल काळजीपूर्वक विचार करा. कारण एका चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या नफ्याचं रूपांतर तोट्यात होऊ शकतं. करिअरशी संबंधित निर्णय घेण्यात तरुण यशस्वी होतील.

उपाय : पिवळ्या रंगाच्या गोष्टी दान करा.

सिंह (Leo) : सध्या बिझनेसकडे पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीज संथ गतीने होतील; मात्र काम करण्याच्या तुमच्या पॅशनमुळे तुम्ही अचीव्ह करू शकाल. नोकरदार व्यक्तींनी ऑफिशियल ट्रिपला जाणं लाभदायक ठरेल.

उपाय : योगासनं आणि प्राणायाम करा.

कन्या (Virgo) : कामाच्या ठिकाणच्या काही कर्मचाऱ्यांमुळे काही समस्या असतील. तुम्ही अगदी हुशारीने त्या समस्या सोडवाल. सरकारी नोकरीत असलात, तर उच्चपदस्थ अधिकारीही तुम्हाला तुमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी मदत करतील. ऑफिसमधलं वातावरणही सुखद राहील.

उपाय : सूर्यदेवाला अर्घ्य द्या.

तूळ (Libra) : बिझनेसच्या कामात सध्या सुरू असलेल्या समस्या दूर होतील. नियोजित पद्धतीने काम पूर्ण होईल. मार्केटिंग, वसुली आदी कामांमध्ये अधिक वेळ व्यतीत करा. सरकारी नोकरीत असलेल्यांना उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून काही अधिकार मिळू शकतील.

उपाय : शिवलिंगावर जलाभिषेक करा.

वृश्चिक (Scorpio) : बिझनेसशी संबंधित मोठे निर्णय घेण्यात काही अडचण येऊ शकेल. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं उत्तम राहील. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. हा बदल तुम्हाला लाभदायक असेल.

उपाय : भगवान विष्णूची पूजा करा.

धनू (Sagittarius) : बिझनेसमध्ये सुधारणा होईल. बिझनेस वूमनसाठी काळ अनुकूल आहे; मात्र तुमची पद्धत कोणाशीही शेअर करू नका. परदेशाशी संबंधित बिझनेसमध्ये चांगल्या संधी मिळू शकतील.

उपाय : शिक्षक किंवा वरिष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घ्या.

मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी रखडलेलं काम अनुभवी व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकेल. तुमच्या विरोधकांच्या हालचालींकडे लक्ष देऊ नका. वूमन्स क्लासशी निगडित बिझनेस यशस्वी होईल. नोकरदार महिला काही महत्त्वाच्या अचीव्हमेंट्स साध्य करतील.

उपाय : हनुमानाच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा.

कुंभ (Aquarius) : तुमच्या बिझनेसवर खूप कष्ट घेण्याची गरज आहे. थोडंसं दुर्लक्षही नुकसान करू शकतं. पार्टनरशिपशी संबंधित बिझनेस यशस्वी होईल. मनापासून कोणताही निर्णय घेणं योग्य राहील.

हे वाचा - रस्त्यावर पडलेले पैसे तुम्हीही उचलले आहेत का? हे आहे रहस्य !

उपाय : काळ्या कुत्र्याला ब्रेड/चपाती खाऊ घाला.

मीन (Pisces) : बिझनेस स्टाफ किंवा कर्मचारी यांच्यामुळे सिस्टीममध्ये गोंधळ होईल. त्यामुळे तुम्ही उपस्थित राहणं आणि सर्व कामांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. नोकरदार व्यक्तींना अचानक त्यांच्या प्रमोशनसंदर्भात गुड न्यूज मिळेल.

उपाय : वृद्धाश्रमात ब्लँकेट्स दान करा.

First published:
top videos

    Tags: Money, Money matters