मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Money Mantra - आज आर्थिक लाभ होणार पण ही गोष्ट मात्र आवर्जून टाळा

Money Mantra - आज आर्थिक लाभ होणार पण ही गोष्ट मात्र आवर्जून टाळा

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं 11 जानेवारी, 2023 राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

    आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (11 जानेवारी 2023) राशिभविष्य

    मेष (Aries) : आर्थिक बाजूवर दक्षता बाळगणं गरजेचं. कोणाशीही आर्थिक व्यवहार टाळा. गुंतवणुकीच्या नावाखाली घोटाळा घडू शकतो. ऑफिसमधली कोणतीही कठीण समस्या सुटू शकेल. ज्येष्ठांकडून सल्ला घेणं चांगलं राहील.

    उपाय : सूर्याला अर्घ्य द्या.

    वृषभ (Taurus) : बिझनेसशी संबंधित समस्या सोडवाल. ऑफिसमधल्या विरोधकांना पराजित कराल. ऑफिसर्सशी चांगले संबंध तयार होतील. जमीन, वाहन किंवा एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचं नियोजन कराल.

    उपाय : हनुमान मंदिरात ध्वज अर्पण करा.

    मिथुन (Gemini) : आज इतरांच्या भावनांची दखल घेऊन काम करणं चांगलं राहील. ऑफिसमध्येही केवळ टीमवर्कच्या माध्यमातून कठीण समस्या सोडवू शकाल. बिझनेसमनसाठी कठीण काळ असेल. पैसे अडकू शकतात. भविष्याबद्दलचं नियोजन करा.

    उपाय : संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.

    कर्क (Cancer) : आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळतील. सध्या तुम्ही या संधी ओळखून त्यावर काम करणं ही तुमची जबाबदारी असेल. व्यापाऱ्यांनी अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करण्यापूर्वी सखोल चौकशी केली पाहिजे.

    उपाय : मुंग्यांसाठी पीठ ठेवा.

    सिंह (Leo) : आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. बिझनेसमधल्या कोणाकडून तरी सल्ला घ्यावा लागेल. प्रत्येक नवीन कामाचा कायदेशीर पैलू लक्षात घ्या. वादांमध्ये तुमचा विजय होईल. जमिनीच्या व्यवहारांमध्ये दक्ष राहा. वाहनं काळजीपूर्वक चालवा.

    उपाय : गायींना हिरवा चारा खाऊ घाला.

    कन्या (Virgo) : कामाच्या ठिकाणी कामाचा ताण मोठा असेल. तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतील. बिझनेसमनचं दीर्घ काळ प्रलंबित असलेलं काम पूर्ण होईल. बिझनेसमध्ये जोखीम पत्करणं टाळा. गुंतवणूक करण्यापूर्वी कागदपत्रं काळजीपूर्वक वाचा.

    उपाय : छोट्या मुलींना मिठाई द्या.

    तूळ (Libra) : तुमची जुनी कर्जं फेडण्यात आज यशस्वी ठराल. महत्त्वाच्या वस्तूंच्या खरेदीसाठी तुम्हाला कदाचित जावं लागेल. तुमच्या पाकिटावर म्हणजेच खर्च करण्याच्या क्षमतेवर लक्ष ठेवा. बजेटमध्ये गोंधळ होऊ शकतो. सध्या लोकांना तुमच्या ओरिजिनल आयडियाज आवडतील.

    उपाय : श्री हनुमानाची पूजा करा.

    वृश्चिक (Scorpio) : ऑफिसच्या कामात व्यग्र असाल. आजच्या कामामुळे तुम्हाला भविष्यात आर्थिक लाभ मिळू शकेल. बचतीनुसार आपलं वर्तन ठेवा. बिझनेसमन्ससाठी दिवस उत्तम असेल. फायद्याचं डील होईल.

    उपाय : माशांना खाऊ घाला.

    धनू (Sagittarius) : आज तुम्हाला काही नवे अधिकार मिळू शकतात. आज तुम्ही क्रिएटिव्ह कामात व्यग्र असाल. आजचा दिवस बिझनेसमन्ससाठी सर्वसाधारण असेल. बेरोजगार व्यक्तींना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील.

    उपाय : गरिबांना अन्नदान करा.

    मकर (Capricorn) : आज तुम्हाला तुमच्यात नवा उत्साह आणि क्षमता भरली असल्याचं जाणवेल. प्रेमप्रकरणाबद्दल खूप एक्सायटेड असाल. ऑफिसमध्ये तुमचं प्रमोशन किंवा पगारवाढीबद्दल चर्चा असेल. तुमच्या उत्साहावर नियंत्रण ठेवा.

    उपाय : श्रीरामरक्षा स्तोत्राचं पठण करा.

    कुंभ (Aquarius) : आज आर्थिक लाभाची शक्यता आहे. ऑफिसमध्ये ऑफिसर्सशी चांगले संबंध असतील. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना नव्या संधी मिळतील. इंडस्ट्रीसाठी दिवस सर्वसाधारण असेल. नवी डील्स अपेक्षित नाहीत.

    उपाय : जेवणात काळ्या मिरीचा समावेश करा.

    मीन (Pisces) : आज तुम्ही स्वतःवर खूश असाल. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा. तुमचं काम करत राहा. तुम्हाला यश नक्की मिळेल. सोशल सर्कलमध्ये तुम्ही संवाद वाढवू शकाल. आदरात वाढ होऊ शकेल.

    उपाय : श्रीकृष्ण मंदिरात मोरपीस अर्पण करा.

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya