मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Money Mantra: कर्ज घेणं-देणं आज टाळा, असं आहे 8 फेब्रुवारीचं आर्थिक राशीभविष्य

Money Mantra: कर्ज घेणं-देणं आज टाळा, असं आहे 8 फेब्रुवारीचं आर्थिक राशीभविष्य

आर्थिक राशीभविष्य

आर्थिक राशीभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (8 फेब्रुवारी 2022) राशिभविष्य.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मेष (Aries) : नोकरीच्या ठिकाणी प्रगतीसाठी तीव्र प्रयत्न करावे लागतील. पदाच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. बिझनेसमधल्या व्यावसायिक कामांना सहकार्य मिळेल. सक्रिय राहाल. वातावरण सकारात्मक राहील. सर्वांचं सहकार्य कायम राहील. मोठा विचार करा. तुमच्या मार्गातले अडथळे आपोआप दूर होतील.

उपाय : सरस्वती देवीला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा.

वृषभ (Taurus) : ऑफिसमध्ये अपेक्षित परिणाम होतील. वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करा. तसं केल्यास तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. सर्वांचं सहकार्य मिळेल. करिअर व्यवसायात स्पर्धा टिकवून ठेवाल. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. व्यावसायिक उद्दिष्टं पूर्ण होतील. सर्व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाल. बिझनेस मजबूत होईल.

उपाय : राम मंदिरात ध्वज दान करा.

मिथुन (Gemini) : कर्ज घेणं आणि देणं टाळा, नाहीतर नुकसान होईल. कामाच्या ठिकाणी बडबड करणं टाळा. व्यावसायिकता जपा. काही जुने मुद्दे समोर येऊ शकतात. गुंतवणुकीत रस घ्याल. व्यावसायिक कार्यात जागरूकता ठेवावी लागेल. व्यवसाय विस्तारावर भर द्याल.

उपाय : हनुमान मंदिरात तुपाचा दिवा लावा.

कर्क (Cancer) : व्यावसायिक यशामध्ये वाढ होईल. करिअर व्यवसायातल्या शुभ गोष्टी वाढतील. व्यवस्थापन प्रणाली मजबूत राहील. आर्थिक प्रश्न सुटतील. योग्य दिशेने पुढे जाल. धाडस वाढेल. ध्येयाभिमुख राहाल. नवीन कामात रस घ्याल. उद्योग-व्यवसायात सुधारणा होईल.

उपाय : भगवान शंकराला जल अर्पण करा.

सिंह (Leo) : पैशाशी संबंधित प्रकरणं अधिक चांगली होतील आणि बचत होईल. करिअर व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. संपत्तीत वाढ होईल. व्यवसाय चांगला होईल. कामकाजात सकारात्मकता वाढेल. नक्कीच पुढे जाल. नफ्याचं प्रमाण चांगलं राहील. अनुकूलता वाढेल.

उपाय : भैरव मंदिरात नारळ अर्पण करा.

कन्या (Virgo) : करिअर व्यवसायातला संकोच कमी होईल. अपेक्षित यश मिळेल. व्यावसायिक कामांना गती येईल. वस्तू आणि विचारांची देवाणघेवाण वाढेल. व्यावसायिक कामासाठी प्रवास करू शकता. कामात निष्काळजीपणा टाळा.

उपाय : गायींना हिरवा चारा द्या.

तूळ (Libra) : कार्यालयीन कामात गांभीर्य दाखवा. जवळचे सहकारी मदत करतील. गुंतवणुकीच्या मोहात पडणं टाळा. करिअर व्यवसाय सकारात्मक राहील. कुटुंबातल्या सदस्यांचं सहकार्य मिळेल. सक्रियपणे काम कराल. वडिलोपार्जित व्यवसायात परिणामकारकता ठरेल.

उपाय : पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ दान करा.

वृश्चिक (Scorpio) : आयुष्यातली अत्यावश्यक कामं जलद गतीनं पूर्ण करा. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. चांगल्या ऑफर्स मिळतील. विविध प्रश्न मार्गी लागतील. करिअर व्यवसायावर लक्ष केंद्रित कराल. लाभाची टक्केवारी चांगली राहील.

उपाय : कृष्ण मंदिरात बासरी अर्पण करा.

धनू (Sagittarius) : गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीला बळी पडणं टाळा. अनोळखी लोकांवर पटकन विश्वास ठेवू नका आणि मीटिंगमध्ये सावधगिरी बाळगा. महत्त्वाच्या सौद्यांमुळे करारांमध्ये संयम वाढेल. गोंधळून जाऊ नका आणि दिशाभूल होऊ देऊ नका. निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. व्यवस्थेवर विश्वास ठेवा. सहकाऱ्यांचा विश्वास जिंकाल. परिस्थिती सामान्य राहील.

उपाय : हनुमान चालिसा पठण करा.

मकर (Capricorn) : व्यवसाय भागीदारीतलं प्रकरणं तुमच्या बाजूने होतील. व्यावसायिक यशात वाढ होईल. अधिकारीवर्ग आनंदी राहील. मोठे-मोठे उद्योग व्यवसायात सहभागी होत आहेत असं तुम्हाला वाटेल. मनात नेतृत्वाची भावना निर्माण होईल. जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. आर्थिक लाभात सुधारणा होईल. कामात स्पष्टता राहील.

उपाय : भगवान शंकराला पंचामृताने अभिषेक करा.

हे वाचा - तुमच्याही नावाची सुरुवात V या अक्षराने होते का ? मग हे नक्की वाचा

कुंभ (Aquarius) : सिस्टिमॅटिक कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक बाबींमध्ये सहजपणा राहील. आर्थिक बाबी संमिश्र राहतील. दूरदृष्टी ठेवा. कर्जाचे व्यवहार टाळा. संशोधनात सहभागी व्हा. कामात संयम वाढेल. करिअर व्यवसायाची स्थिती संमिश्र राहील. आवश्यक निर्णय घेण्यास उशीर करू नका.

उपाय : कृष्ण मंदिरात बासरी अर्पण करा.

मीन (Pisces) : आर्थिक प्रगतीच्या संधी वाढतील. विविध क्षेत्रांत चांगली कामगिरी कराल. व्यावसायिकपणा राखाल. तुम्ही नवीन काम सुरू करू शकाल. काउंट्रपार्ट्सवरचा विश्वास वाढेल. स्पर्धेत प्रभावी ठराल. वाणिज्य विषयात आवड वाढेल. करिअर व्यवसायात गती राहील.

उपाय : घरातून बाहेर पडण्यापूर्वी ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या.

First published:

Tags: Horoscope, Money, Rashibhavishya