आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (8 डिसेंबर 2022) राशिभविष्य
मेष (Aries) : बिझनेसच्या ठिकाणी काही अडथळे येण्याची शक्यता आहे; मात्र तरीही तुम्ही बिझनेसमधून काही प्रमाणात नफा कमावू शकाल. तुम्हाला केवळ तुमचा राग आणि अतिआत्मविश्वास या बाबींवर नियंत्रण मिळवावं लागेल. ऑफिसच्या कामात उशीर करू नका.
उपाय : गरीब मुलांना अन्नदान करा.
वृषभ (Taurus) : तुमची ध्येयं गुप्त राहतील, याची काळजी घ्या. अन्यथा कोणी तरी त्याचा गैरफायदा घेऊन तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या आर्थिक परिस्थितीत काही लाभ मिळतील.
उपाय : हनुमान चालिसा पठण करा.
मिथुन (Gemini) : बिझनेसमध्ये क्रिएटिव्हिटी वाढवण्याची, त्यात सुधारणेची गरज आहे. तुमच्या कष्टांमुळे तुम्हाला बिझनेसमध्ये नव्या संधी मिळतील. सरकारी नोकरीत असलेल्यांना काही तरी महत्त्वाचं नवं काम मिळेल.
उपाय : वृद्धाश्रमात अन्नदान करा.
कर्क (Cancer) : शेअर बाजार किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करा. नोकरीचा शोध घेणाऱ्यांना नोकरीच्या नव्या संधी मिळतील. आज तुम्हाला पार्टनरशिपशी निगडित कामांमध्ये लाभ मिळतील. बिझनेसशी निगडित कामांकडे लक्ष द्या.
उपाय : गणेश स्तोत्राचं पठण करा.
सिंह (Leo) : तुम्हाला काही नव्या व्यक्ती भेटतील; मात्र अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका. पगारदार व्यक्तींना बोनस किंवा कमिशनसारख्या रूपाने आर्थिक लाभ मिळतील. आज बिझनेसमध्ये नफा मिळेल.
उपाय : कामाच्या ठिकाणी श्री गणेशाची पूजा करा.
कन्या (Virgo) : बिझनेसमध्ये तुम्हाला अचानक मोठ्या ऑर्डर्स मिळतील आणि ते तुम्हाला फायद्याचं ठरेल. बिझनेस करणाऱ्या महिला बिझनेसमध्ये चांगलं स्थान प्राप्त करतील. तुमच्या ऑफिसमधल्या कामाचं कौतुक होईल.
उपाय : तुमच्यासोबत चांदी ठेवा.
तूळ (Libra) : आज तुम्ही खूप बिझी असाल आणि त्यामुळे बिझनेसकडे लक्ष देऊ शकणार नाही. त्यामुळे काम घरीच पूर्ण करा. क्रिएटिव्ह कामं, तसंच मीडियाशी निगडित बिझनेसमध्ये महत्त्वाची अचीव्हमेंट होईल.
उपाय : हनुमान चालिसा पठण करा.
वृश्चिक (Scorpio) : तुम्हाला बिझनेसमध्ये अनपेक्षित असलेली आणि फायद्याची माहिती मिळेल. गुंतवणुकीशी निगडित महत्त्वाची ऑफर समोर येईल. नोकरीत नव्या संधी मिळतील.
उपाय : आईला गोड काही तरी भेट द्या.
धनू (Sagittarius) : बिझनेसच्या कामासाठी सध्याचा काळ खूप अनुकूल आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी नफ्याचा आहे. पार्टनरशिपशी संबंधित कामात तुम्ही घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील.
उपाय : योगासनं, प्राणायाम करा.
मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी नफा मिळू शकेल. अधिक कष्ट करण्याची गरज आहे. बिझनेसमध्ये यश मिळवणं तुम्हाला शक्य होईल. आज बिझनेसमध्ये तोटा होण्याचीही शक्यता आहे.
उपाय : वडिलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घ्या.
कुंभ (Aquarius) : तुम्ही आणि तुमचं काम यांमुळे प्रत्येक जण प्रभावित होईल. कामाच्या दृष्टीने दक्ष राहाल. इंडस्ट्री बिझनेसला गती प्राप्त होईल. क्रिएटिव्ह होण्याबद्दल विचार कराल. कामाच्या प्रयत्नांना साह्य मिळेल.
उपाय : गायीला हिरवा चारा खाऊ घाला.
मीन (Pisces) : तुमच्या बिझनेसचं उत्पन्न वाढू शकेल. कमिशनशी निगडित व्यवसायांमध्ये नफ्याची परिस्थिती असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या म्हणण्यानुसार काम पूर्ण होईल.
उपाय : भगवान श्रीकृष्णाला बासरी अर्पण करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya