मेष (Aries) : कामाच्या ठिकाणी मशिनरी, स्टाफ आदींशी निगडित किरकोळ समस्या उद्भवू शकतील; मात्र गांभीर्याने आणि प्रामाणिकपणाने काम करण्याच्या तुमच्या पद्धतीमुळे तुम्ही समस्यांमधून मार्ग काढाल. बिझनेसशी संबंधित सर्व निर्णय या वेळी तुमचे तुम्हीच घ्या.
उपाय : नोकरी किंवा बिझनेससाठी बाहेर पडताना केशर खाऊन बाहेर पडा.
वृषभ (Taurus) : बिझनेसमध्ये उद्दिष्टपूर्तीसाठी खूप कष्ट करावे लागतात. तुम्हाला त्या कष्टांचे उत्तम परिणामही मिळतील. पार्टनरशिप बिझनेसमध्ये नफ्याची परिस्थिती तयार होत आहे. नोकरदार व्यक्तींना ओव्हरटाइम काम करावं लागू शकेल.
उपाय : कामाच्या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी सूर्याच्या 12 नावांचं स्मरण केल्यास नोकरी-व्यवसायात प्रगती होईल.
मिथुन (Gemini) : आज बिझनेसमध्ये खूप काम असेल. त्यामुळे तुमचं काम इतरांशी शेअर केल्यास ताण बऱ्यापैकी कमी होऊ शकेल. लोकांशी संवाद साधणं तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल. नोकरीतल्या कोणत्याही चुकीमुळे तुम्हाला अधिकाऱ्यांकडून ऐकून घ्यावं लागण्याची शक्यता आहे.
उपाय : भगवान शिवशंकर, भैरव आणि हनुमान यांचं दर्शन घेणं किंवा पूजा करणं यांमुळे कौटुंबिक आयुष्य चांगलं राहतं.
कर्क (Cancer) : सध्या बिझनेसमध्ये काही नवी प्रपोझल्स येतील. तुम्हाला कष्टांचे योग्य परिणाम मिळतील. पार्टनरशिप बिझनेसमधल्या प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना काही तरी चांगली बातमी मिळण्यासारखी परिस्थिती आहे.
उपाय : हनुमानाच्या मंदिरात 1 लाल मिरची, 27 डाळी आणि 5 लाल फुलं अर्पण करा. तुमच्या आयुष्यातला आनंद वाढायला यामुळे मदत होईल.
सिंह (Leo) : बिझनेस अॅक्टिव्हिटीजमध्ये खूप सुधारणा होण्याची फारशी शक्यता नाही. वैयक्तिक ओळख असलेल्या काही व्यक्ती तुमच्यासाठी फायदेशीर असलेली परिस्थिती निर्माण करतील. त्यामुळे अशा व्यक्तींशी संपर्कात राहा. महत्त्वाच्या प्रॉपर्टी डीलची शक्यता आहे.
उपाय : आरोग्यात सुधारणा होण्यासाठी गूळ आणि मसूर खा.
कन्या (Virgo) : बिझनेसच्या ठिकाणच्या कार्यपद्धतीत काही बदल करण्याची गरज आहे. जनसंपर्कातून तुमच्यासाठी बिझनेसच्या नव्या स्रोतांची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे लोकांशी शक्य तितक्या संपर्कात राहा. नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
उपाय : हळद आणि पिंपळाची पाच पानं जवळ ठेवल्यास बिझनेस सुधारेल.
तूळ (Libra) : आता कोणतंही नवं काम सुरू करण्यास योग्य वेळ नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीवर तुम्ही ठेवून राहणं इष्ट. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घेणं योग्य. ऑफिसमध्ये बॉस आणि ऑफिसर्ससोबतचे नातेसंबंध चांगले असतील.
उपाय : आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हनुमान चालिसा आणि श्रीरामस्तुती म्हणणं चांगलं राहील.
वृश्चिक (Scorpio) : सध्या असा काळ आहे, की दुसऱ्या व्यक्तीचा सल्ला ऐकल्यास तुम्हाला काही समस्या निर्माण होऊ शकतात. सर्व कामांमध्ये स्वतःचे निर्णय स्वतःच घेणं इष्ट राहील. आज काही मार्केटिंग अॅक्टिव्हिटीज थांबवा. नोकरदार व्यक्तींना काही विशेष अधिकार मिळतील. त्यामुळे आनंदी वातावरण असेल.
उपाय : गरीब व्यक्तींना हिरव्या रंगाचे कपडे दान केल्यास बिझनेस रिलेशनशिप्स मजबूत राहतील.
धनू (Sagittarius) : प्रोफेशनल फिल्डमध्ये तुम्ही कष्ट आणि तुमच्या क्षमतेच्या साह्याने उद्दिष्ट पूर्ण कराल; मात्र सध्याच्या काळात काही बदल आणणंही गरजेचं आहे. व्हिडिओ आणि मार्केटिंग अॅक्टिव्हिटीजवर सध्या अधिक लक्ष केंद्रित करा. नोकरदार व्यक्तींनी त्यांचं काम काळजीपूर्वक केलं पाहिजे. एखादी चूक होण्याची शक्यता आहे.
उपाय : आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गायीला गूळ खाऊ घाला.
मकर (Capricorn) : बिझनेसमध्ये काही आव्हानं असतील. सध्या तुमची कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी बरेच कष्ट आणि संघर्ष करावा लागेल. वरिष्ठ अधिकारी किंवा राजकीय नेत्याला भेटणं फायद्याचं ठरेल. नोकरीत अतिरिक्त कामामुळे ताण असेल.
उपाय : पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केल्यास आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
कुंभ (Aquarius) : कामाच्या ठिकाणी अंतर्गत पद्धतीमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. असं केल्यास तुमच्या काही समस्या निश्चितपणे सोडवल्या जातील. कामातल्या चांगल्या योगदानाबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांचं त्यांच्या वरिष्ठांकडून कौतुक होईल.
उपाय : काळे उडीद, काळे वाटाणे, काळं कापड आणि मोहरीचं तेल दान केल्यास आरोग्य सुधारेल.
मीन (Pisces) : बिझनेसमध्ये घेतलेले काही ठोस आणि गंभीर निर्णय फायदेशीर ठरतील; मात्र स्वतःला सिद्ध करणं संघर्षाचं आणि कष्टाचं असू शकतं. नोकरदार व्यक्ती त्यांचं काम योग्य पद्धतीने पूर्ण करू शकतील.
उपाय : हनुमान चालिसा पठण करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Religion