मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra : बिझनेसमधील समस्या सोडवायच्या तरी कशा? राशीनुसार आर्थिक भविष्य पाहा

Money Mantra : बिझनेसमधील समस्या सोडवायच्या तरी कशा? राशीनुसार आर्थिक भविष्य पाहा

Money Mantra : बिझनेसमधील समस्या सोडवायच्या तरी कशा? राशीनुसार आर्थिक भविष्य पाहा

Money Mantra : बिझनेसमधील समस्या सोडवायच्या तरी कशा? राशीनुसार आर्थिक भविष्य पाहा

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं 06 डिसेंबर, 2022 राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (6 डिसेंबर 2022) राशिभविष्य

मेष (Aries) : कामाशी निगडित कोणताही प्रवास तुमच्या चांगल्या भविष्याची दारं उघडील. आता काही नव्या अचीव्हमेंट्स साध्य होण्याची शक्यता आहे. नफ्याचा मार्ग संथ असेल. नोकरदार व्यक्तींनी त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करू नये.

उपाय : शिवलिंगावर जलाभिषेक करा.

वृषभ (Taurus) : काही वेळा काही समस्या उद्भवू शकतात; मात्र तुम्ही बुद्धीने त्या समस्या सोडवू शकाल. नोकरदार व्यक्तींनी त्यांच्या ऑफिसच्या कामाकडे अधिक लक्ष द्यायला हवं. कारण भविष्यात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे.

उपाय : भगवान विष्णूची पूजा करा.

मिथुन (Gemini) : सध्याच्या काळात बिझनेसच्या वृद्धीसाठी जनसंपर्क आणि लोकांशी असलेली नाती तुम्हाला अधिक फायद्याची ठरतील. मीडिया किंवा फोनच्या माध्यमातून महत्त्वाची काँट्रॅक्ट्स मिळू शकतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समर्पण भावनेने काम करा.

उपाय : योगासनं, प्राणायाम करा.

कर्क (Cancer) : बिझनेसच्या स्थळात बदल होण्याची शक्यता आहे. टॅक्स, कर्ज आदींसारख्या प्रकरणांमध्ये वाद उद्भवू शकतात. त्यामुळे ही कामं स्वतः करू नका. ऑफिसमध्ये बॉस आणि ऑफिसर्सबरोबरचे संबंध मैत्रीपूर्ण असतील.

उपाय : श्री हनुमानाची पूजा करा.

सिंह (Leo) : सध्या बिझनेसकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण काही प्रकारचा तोटा होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या कृतींवर लक्ष ठेवा. ऑफिसमधली तुमची प्रतिमा आणि रेप्युटेशन यांमध्ये वाढ होईल. तुम्हाला काही महत्त्वाचे अधिकार मिळतील.

उपाय : भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.

कन्या (Virgo) : प्रोफेशनल ठिकाणी तुमचे सहकारी पूर्णतः समर्पण भावनेने काम करतील. तुमचा प्रभावही कायम राहील. काही काळासाठी सुरू असलेले चढ-उतार थांबतील. नोकरदार व्यक्तींना नोकरी बदलण्याची एखादी संधी मिळाल्यास त्यांनी ती तातडीने स्वीकारावी.

उपाय : गोमातेला हिरवा चारा खाऊ घाला.

तूळ (Libra) : बिझनेसच्या कामात नफा मिळण्याची गती संथ असेल. आता कामाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. नोकरदार व्यक्तीने ही बाब कायम मनात ठेवली पाहिजे, की काही चुकीचं केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांचा क्रोध ओढवून घ्यावा लागू शकतो.

उपाय : श्री हनुमानाला शेंदूर अर्पण करावा.

वृश्चिक (Scorpio) : कामाच्या ठिकाणी कामांचा वेग कमी असेल. पेमेंट्स वसूल करणं आणि मार्केटिंग यांवर काम करण्यात दिवस व्यतीत करा. त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. नोकरदार व्यक्तींना बदलाशी निगडित काही माहिती मिळू शकेल.

उपाय : श्री गणेशाला लाडू अर्पण करा.

धनू (Sagittarius) : सध्या बिझनेसमध्ये खूप नफा मिळेल अशी अपेक्षा धरू नका. काही कौटुंबिक कामांमुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी अधिक वेळ देऊ शकणार नाही. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या उद्दिष्टपूर्तीपासून दिलासा मिळेल.

उपाय : श्री गणेशाला मोदक अर्पण करा.

 

मकर (Capricorn) : बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीज सर्वसाधारण असतील. तुमचं बहुतांश काम फोनमधूनच होईल. शेअर्स आणि स्टॉक मार्केटशी संबंधित बिझनेस सध्याच्या काळात चांगला नफा मिळवतील. नोकरदार व्यक्तींना त्यांना वरिष्ठांशी चांगले संबंध राखणं गरजेचं आहे.

उपाय : शंकराच्या पिंडीवर पंचामृताचा अभिषेक करा.

 

कुंभ (Aquarius) : पार्टनरशिपमधल्या कामांमध्ये नफा मिळण्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही कामात तुमच्या भागीदाराचं सहकार्य घ्या. ते फायद्याचं ठरेल. मार्केटिंगशी निगडित कामं हाताळणं तुमच्यासाठी योग्य राहील. पगारदार व्यक्तींना त्यांच्या ऑफिसविषयक धोरणांमध्ये काही बदल करावे लागतील.

उपाय : शिवलिंगावर जलाभिषेक करा.

मीन (Pisces) : आज तुमचं पूर्ण लक्ष कामाच्या प्रमोशवर द्या. निश्चित धोरण घेऊन काम केल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते. बिझनेस एक्स्पान्शनचे प्लॅन्स गांभीर्याने घ्या. नोकरीत काही किरकोळ अडचणी असतील; मात्र नेमकं समजून घेतल्यास तुम्हाला त्यावर उपायही मिळतील.

उपाय : योगासनं आणि प्राणायाम करा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Money, Rashibhavishya