मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /व्यावसायिकांना चांगल्या ऑफर्स मिळतील; या राशीच्या लोकांनी मात्र आर्थिक व्यवहार जपून करा

व्यावसायिकांना चांगल्या ऑफर्स मिळतील; या राशीच्या लोकांनी मात्र आर्थिक व्यवहार जपून करा

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (5 फेब्रुवारी 2023) राशिभविष्य.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मेष (Aries) : करिअर, व्यवसायात सहजता ठेवा. व्यावसायिक कामांना गती मिळेल. कामासंबंधी योजनांमध्ये गती राहील. प्रतिभा बहरेल. कामात अनुकूलता येईल. वैयक्तिक विषयांवर लक्ष केंद्रित कराल. सहकाऱ्यांशी समन्वय वाढेल.

उपाय : भगवान शंकराला जल अर्पण करा.

वृषभ (Taurus) : करिअर आणि व्यवसायात सुसंवाद राहील. व्यावसायिकांना चांगल्या ऑफर्स मिळतील. नफा आणि विस्तारावर भर राहील. उद्योग, उत्पादनांमध्ये सुधारणा होतील. तुमच्या सक्रियतेनं प्रत्येकजण प्रभावित होईल. विविध क्षेत्रांत शुभकाळ असल्याचं तुम्हाला जाणवेल.

उपाय : श्री हनुमान मंदिरात तुपाचा दिवा लावा.

मिथुन (Gemini) : नोकरीच्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे कामगिरी होईल. आर्थिक व्यावसायिक बाबी घडतील. वडिलोपार्जित व्यवसायाला गती मिळेल. करिअर, व्यवसायात सकारात्मकता राहील. सर्वांना सोबत घेऊन जा. संपत्तीत वाढ होईल. आर्थिक बाजू सुधारण्यास सक्षम काळ आहे.

उपाय : भगवान श्रीराम मंदिरात ध्वज लावा.

कर्क (Cancer) : सर्व क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. धैर्याने सक्रियता आणि समज वाढेल. आर्थिक, व्यावसायिक क्षेत्रात वेगळं काम करण्याचा विचार होईल. अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील. आकर्षक ऑफर्स मिळतील. सामंजस्य ठेवा. योजनांना बळ मिळेल.

उपाय : देवी सरस्वतीला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा.

सिंह (Leo) : संयमानं आणि विश्वासानं पुढे जा. कामाच्या ठिकाणी लोभ, मोह यामध्ये पडू नका. आर्थिक व्यवहारात सावधगिरी वाढेल. नोकरी, व्यवसायावर लक्ष केंद्रित कराल. घाई करू नका. जोखमीचं काम टाळा. योजनांच्या अंमलबजावणीत वाढ होईल.

उपाय : लाल गाईला गूळ खाऊ घाला.

कन्या (Virgo) : ध्येय गाठण्यात यश मिळेल. परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. संपत्तीत वाढ होईल. करिअर, व्यवसायात यश मिळेल. अधिकारी वर्ग आनंदी राहील. इच्छित परिणाम मिळतील. व्यवसायात सुधारणा होईल. प्रभावी कामगिरी कराल.

उपाय : संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

तूळ (Libra) : नोकरी, व्यवसायातील कामाच्या प्रयत्नात गती येईल. योजना आकार घेतील. मुलाखतीत यश मिळेल. व्यवसाय मजबूत होईल. चांगल्या गतीनं पुढं जाल. तुम्हाला सर्वत्र यश मिळेल. बहुतेक प्रकरणांचे निकाल तुमच्या बाजूने होतील. प्रभाव वाढत राहील.

उपाय : मुंग्यांना पिठात साखर मिसळून खायला द्या.

वृश्चिक (Scorpio) : आर्थिक बाबतीत गती कायम ठेवाल. सकारात्मक वेळेचा जास्तीत जास्त फायदा घ्याल. व्यावसायिक प्रयत्न सुरू ठेवाल. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून लाभाचे मार्ग खुले होतील. संपर्क वाढेल, संवाद अधिक चांगला होईल. धैर्य आणि शौर्य वाढेल. करिअर, व्यवसायात गती येईल.

उपाय : शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तीची सेवा करा.

धनू (Sagittarius) : ऑफिसमध्ये समजुतदारपणानं आणि नम्रतेनं काम कराल. परिस्थितीवर नियंत्रण ठेवाल. नोकरी, व्यवसाय सामान्य राहील. विस्तार योजनांवर लक्ष केंद्रित करा. संशोधन कार्यात रस दाखवाल. अनुभवी लोकांचा सहवास वाढवा. सल्लागारांच्या संपर्कात रहा.

उपाय : काळ्या कुत्र्याला गोड पदार्थ खायला द्या.

हे वाचा - तुमची जन्मतारीख या पाच अंकापैकी आहे का? प्रेमात असाल तर उघडपणे बालून मोकळं व्हा

मकर (Capricorn) : उत्पादनासंबंधी कामांकडे कल वाढेल. सामाईक कामात पुढे राहाल. वेळ प्रभावी आहे. गंभीर विषयात रुची राहील. शाश्वततेवर भर राहील. विजयाचा उत्साह कायम राहील. व्यावसायिक कामात चांगली कामगिरी कराल.

उपाय : पक्ष्यांना खायला द्या.

हे वाचा - तब्बल 12 वर्षांनी गुरूची या राशीत चाल; 3 राशीच्या लोकांना जणू सुवर्णकाळ जाणवेल

कुंभ (Aquarius) : कृती योजना पुढे जातील. वेळेच्या व्यवस्थापनावर भर द्या. लोभ तुम्हाला मोहापासून वाचवेल. आर्थिक बाबींवर नियंत्रण वाढेल. नोकरी, व्यवसायात जागरुकता वाढेल. कामाच्या बाबतीत संयम दाखवा. सतर्क रहा. अतिउत्साही होऊ नका.

उपाय : एखाद्या गरीब व्यक्तीला पांढरी वस्तू दान करा.

मीन (Pisces) : ऑफिसमधील टार्गेट लवकर पूर्ण कराल. धैर्य आणि शौर्य दाखवाल. करिअरच्या संधी वाढतील. विजयाची भावना असेल. नोकरी, व्यवसायात चांगलं काम कराल. सर्वत्रच बाबतीत शुभकाळ सुरू आहे. स्पर्धेची भावना वाढेल.

उपाय : दुर्गादेवीच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा.

First published:

Tags: Horoscope, Rashibhavishya, Rashichark