मेष (Aries) : प्रोफेशनल बाबींत उत्साही राहाल. करिअर बिझनेसमध्ये निश्चितपणे पुढे जाल. चांगली बातमी मिळेल. नफ्याच्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित कराल. अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी कराल. विविध कामं सक्रियपणे पुढे जातील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.
उपाय : गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा.
वृषभ (Taurus) : भौतिक सुविधांवर भर असेल. अधिकारी मदत करतील. नियोजन आकार घेईल. करिअ बिझनेसमध्ये प्रभावी राहाल. अनावश्यक संभाषण टाळाल. वेगवेगळ्या प्रयत्नांत गती कायम राहील. संपर्क क्षेत्र मोठं राखाल.
उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा.
मिथुन (Gemini) : ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला सर्वांचं सहकार्य मिळेल. उत्साह कायम राहील. कमर्शियल कृतींवर भर द्याल. व्यवसायाच्या अनुषंगाने प्रवास संभवतो. आर्थिक बाबी अनुकूल होतील. पारंपारिक कामांत प्रभावी ठराल. करिअर बिझनेसमध्ये गती येईल. नफा वाढेल.
उपाय : श्री हनुमानाला नारळ अर्पण करा.
कर्क (Cancer) : पारंपरिक कामांना चालना द्याल. आकर्षक ऑफर मिळतील. बँक संबंधित कामे मार्गी लागतील. व्यावसायिक बाबींवर लक्ष केंद्रित कराल. कलेक्शन, संवर्धनावर भर असेल. बँकिंगचं काम होईल. बिझनेसच्या बाबींवर लक्ष द्याल. कार्यक्षमता मजबूत होईल. आर्थिक व्यावसायिक प्रयत्न अनुकूल असतील.
उपाय : दुर्गा मातेला लाल ओढणी अर्पण करा.
सिंह (Leo) : कामाच्या ठिकाणी क्रिएटिव्हिटी वाढेल. नफ्याची टक्केवारी चांगली राहील. करिअर बिझनेसमध्ये प्रभाव वाढेल. प्रभाव आणि कामगिरीत सुधारणा करत राहाल. आवश्यक उद्दिष्टं साध्य होतील. आर्थिक कमर्शियल नफा अधिक चांगला होईल.
उपाय : लहान मुलींना खीर खायला द्या.
कन्या (Virgo) : गुंतवणूक आणि विस्ताराच्या कामात सहभागी व्हाल. व्यावसायिकांचा विश्वास कायम राखाल. परदेशातले व्यवहार सेटल होतील. विविध बाबतीत सतर्क राहाल. सुव्यवस्था आणि शिस्त राखाल. आर्थिक बाबींमध्ये व्यग्रता वाढेल. संयम ठेवाल.
उपाय : केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.
तूळ (Libra) : व्यवसायाशी संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील. लाभदायक वेळ सुरू आहे. व्यावसायिकांशी असोसिएशन असेल. टॅलेंटमध्ये सुधारणा होईल. व्यावसायिकांना उल्लेखनीय परिणाम मिळतील. यशाने उत्साही व्हाल. मोठे विचार कराल. आर्थिक बाजू चांगली राहील.
उपाय : सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या.
वृश्चिक (Scorpio) : व्यावसायिक प्लॅन्सना गती द्याल. संवादात यशस्वी व्हाल. संधी वाढतील. व्यवस्थित पुढे जाल. मान-सन्मान वाढेल. कामाच्या सोयी वाढतील. स्पर्धेचा सेन्स वाढेल. कामाचा नफा आणि विस्ताराचे प्रयत्न सुधारतील.
उपाय : श्री लक्ष्मीमातेला कमळाचं फूल अर्पण करा.
धनू (Sagittarius) : नोकरी, व्यवसायात चांगली कामगिरी कराल. संकल्प पूर्ण होतील. परिस्थितीतली सकारात्मकता वाढेल. आत्मविश्वास वाढेल. प्रलंबित प्रकरणांना गती मिळेल. नवीन सुरुवात करू शकता. कामाच्या ठिकाणी सक्रियता वाढेल.
उपाय : काळ्या कुत्र्याला तेलात तळलेली इमरती खाऊ घाला.
मकर (Capricorn) : व्यवस्थेवर विश्वास ठेवून, ती समजून घेत नियमात राहा. सर्वांच्या सहकार्याने तुम्ही पुढे जाल. संयमाचं, विश्वासाचं फळ मिळेल. उद्योग व्यवसाय कायम राहील. अनोळखी व्यक्तींपासून अंतर ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका.
उपाय : शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तीची सेवा करा.
कुंभ (Aquarius) : कामाच्या ठिकाणी संयमाने काम करा. संघटित प्रयत्न प्रभावी होतील. नफ्याची टक्केवारी सुधारेल. जॉब प्रोफेशनमध्ये उत्तम असाल. आर्थिक विषयात रुची वाढेल. मोठ्या प्रयत्नांसाठी मार्ग मोकळा होईल. उद्योग, व्यवसायात काळ शुभ राहील. अपेक्षा पूर्ण होतील.
हे वाचा - तुमच्या तोंडात दात किती आहेत? इतके दात असणाऱ्या व्यक्ती असतात लकी
उपाय : साखर घातलेलं पीठ मुंग्यांना ठेवा.
मीन (Pisces) : व्यवसायात इच्छित स्थान राखण्यात यशस्वी व्हाल. नियमांचं पालन कराल. लोभ-मोह टाळा. सावधपणे पुढे जात राहा. काउंटरपार्ट्सचं सहकार्य मिळेल. व्यावसायिक संबंधांमध्ये समन्वय राहील.
उपाय : माशांना खाऊ घाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.