आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (2 डिसेंबर 2022) राशिभविष्य
मेष (Aries) : आज तुम्ही जे काम कराल, ते समर्पण वृत्तीने करा. त्याची फळं तुम्हाला तातडीने मिळतील. बिझनेसमध्ये तोट्याची शक्यता. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
उपाय : भगवान श्रीकृष्णाला साखर अर्पण करा.
वृषभ (Taurus) : आज तुमचं मन थोडंसं अस्वस्थ, विचलित असेल. ताण दूर करण्यासाठी छोट्या ट्रिपला जाऊ शकाल. त्यातून आर्थिक प्रगतीची शक्यता आहे.
उपाय : मोहरीचं तेल लावलेला ब्रेड काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.
मिथुन (Gemini) : अनोळखी व्यक्तींशी बोलताना सावधगिरी बाळगा. अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावरून गुंतवणूक करू नका. तोटा होईल. नवा बिझनेस सुरू करण्याची संधी मिळू शकेल. घरी एखाद्या चांगल्या कामाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.
उपाय : हनुमान चालिसा पठण करा.
कर्क (Cancer) : आजचा दिवस तुमच्या बिझनेससाठी खूपच फायद्याचा ठरेल. कामाच्या वर्तनाशी संबंधित वाद आज सोडवले जाऊ शकतात. नव्या प्रोजेक्टचं काही काम सुरू होऊ शकेल. रिअल इस्टेटच्या संदर्भात कुटुंबीय आणि आजूबाजूच्या व्यक्ती काही समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.
उपाय : वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा.
सिंह (Leo) : आर्थिक बाबतीमध्ये आजचा दिवस खूपच चांगला असेल. आज दिवसभरात नफ्याच्या संधी मिळतील. आज तुम्ही खूप सक्रिय राहाल. कुटुंबात शांतता आणि स्थिरता असेल. त्याचा आनंद घ्या.
उपाय : सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचं 7 वेळा पठण करा.
कन्या (Virgo) : आजचा दिवस सावधगिरी बाळगण्याचा आहे. बिझनेसमध्ये कोणतीही मोठी रिस्क घेऊ नये. तोट्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तींसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. कुटुंबात चिंतेचं वातावरण असेल.
उपाय : पिंजऱ्यातल्या पक्ष्यांना सोडून द्या.
तूळ (Libra) : पार्टनरशिपमधला बिझनेस आज बराच नफा देईल. आज तुम्हाला दैनंदिन घरकामांशी निगडित मुद्द्यांवर काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. आज तुम्हाला तुमच्या अपत्याच्या संदर्भात एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो.
उपाय : भगवान श्री गणेशाला लाडू अर्पण करा.
वृश्चिक (Scorpio) : आरोग्याची काळजी घ्या. हवामानात झालेल्या बदलामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बिझनेसच्या कामात उशीर होऊ शकतो. घाई-गडबड टाळा. चिंता करू नका. त्यामुळे बिझनेसला कोणताही धोका पोहोचणार नाही.
उपाय : गरीब व्यक्तींना शिक्षण द्या.
धनू (Sagittarius) : आजचा दिवस फायदा देणारा आहे. जोखीम घेतली, तर नफा होईल. संयम आणि मृदू वर्तनाच्या साह्याने तुम्ही समस्या सोडवू शकाल. ताण-तणावात, निराशेत असलेल्या व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल.
उपाय : आईला काही तरी मिठाई द्या.
मकर (Capricorn) : महत्त्वाचे निर्णय प्रलंबित ठेवू नका. हितचिंतकांच्या अभ्यासू सल्ल्याचा आदर कराल. आर्थिक विषयांमध्ये सक्रियता आणाल. सलोख्याने काम केल्यास अनपेक्षित नफा प्राप्त होऊ शकेल. बजेटवर लक्ष केंद्रित करा. गरजेच्या नसलेल्या वस्तूंवर मोठा खर्च करू नका.
उपाय : भगवान श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा.
कुंभ (Aquarius) : नशिबाची साथ मजबूत राहील. तुमच्या प्लॅनिंगमुळे बिझनेस पुढे जाईल. नफा आणि प्रभावात वाढ होईल. प्रत्येकाशी समन्वय राखाल. नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन उत्तम असेल. जोखीम घेण्याचा विचार तुम्हाला बिझनेसमध्ये नफा मिळवून देईल.
उपाय : गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा.
मीन (Pisces) : तुमचे कष्ट आणि समर्पण वृत्ती यांमुळे तुम्ही कामाच्या ठिकाण तुमचं स्थान निर्माण केलं आहेत. व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. अन्यथा आर्थिक तोटा होऊ शकतो. बिझनेसमधला नफा चांगला राहील. बिझनेसमध्ये आनंदी वातावरण असेल.
उपाय : श्री हनुमानाला नारळ अर्पण करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya