राशीभविष्य: सिंह राशीच्या व्यक्तींची होणार इच्छापूर्ती; मात्र या 3 राशींनी जपून राहा

नक्षत्रांच्या प्रभावामुळे काही राशींच्या अडचणी दूर होणार आहेत.

दैनंदिन राशीभविष्य: दररोजच्या भविष्याबरोबर आपण दररोज एकेका राशीचे स्वभाव गुणदोष जाणून घेत आहोत. आज आहे वृश्चिक राशीविषयी..

  • Share this:
आज मंगळवार दिनांक 22 जून 2021 तिथी ज्येष्ठ शुद्ध द्वादशी. रोजच्या प्रमाणे आज आधी एका राशीच्या स्वभावदोषांविषयी जाणून घेऊ. आज आपण वृश्चिक राशी बद्दल जाणून घेऊ या. राशी चक्रातील आठवी रास असुन स्थिर, जल तत्त्वाची, राशी स्वामी मंगळ. चंद्र या राशीत नीच असतो. राशीचा अंमल गुह्य भाग, रक्त , अंतर्गत अवयव ,यांवर असतो. तांबूस वर्ण,लालसर  डोळे, रेखीव, मध्यम उंची. तामसी स्वभावधर्म असतो. अत्यंत ऊर्जा  असलेले, कुठलेही काम तडीस नेणारे, फटकळ, कधीतरी  भांडखोर  व्यक्तिमत्त्व असते. राग  लौकर येतो. पण जिवलग व्यक्तींसाठी काहीही  करायला तयार असतात. ओम अं.अंगारकाय नम: हा जप करावा. मारुतीची उपासना करावी. आता आजचे बारा राशींचे  भविष्य .. मेष आज आपल्या तापट स्वभावाला काबूत ठेवून  काम करा. गुरु लाभ स्थानात वक्री झाले असून मार्ग प्रशस्त करतील. आर्थिक लाभ होईल. दिवस चांगला आहे. वृषभ काही  जणांना प्रकृती अस्वस्थ वाटेल. डोळे किंवा  पोटाचे त्रास जाणवत असतील तर दुर्लक्ष नको. हाती घेतलेली कामे पूर्ण करा. अति  खर्च टाळा. दिवस मध्यम . मिथुन कामात दिरंगाई, शिक्षणात अडथळा, आणि प्रकृती  अस्वस्थ वाटत असेल  तर  आज जपून रहा. खर्च वाढेल. मुलांकडे  जास्त लक्ष द्यावे लागेल. शनि जप करीत रहावे. कर्क राशीत असलेला मंगळ थोडी  धुसफूस वाढवत असेल पण शांत रहा लवकरच सगळे ठीक होईल. सप्तम शनि, जोडीदाराला त्रासदायक असतो. काळजी घ्या. दिवस अनुकूल आहे. सिंह कुटुंब ही तुमची प्राथमिकता आहे. आज दिवस समाधानात जाईल. व्यय स्थानातील मंगळ आणि तृतीय चंद्र  प्रवास घडवतील. इच्छा पूर्ती होईल. दिवस  चांगला आहे. कन्या आज आर्थिक घडामोडी  होतील  कुटुंबीयांसाठी वेळ काढला तर बरे होईल. महिला वर्ग नेहमीच  जबाबदारीने काम करतात. आजही  दिवस तसाच आहे. चांगले फळ मिळेल. तुला राशीत चंद्र, चतुर्थातील मंगळ. मातेचं  आरोग्य बिघडलेले असू शकेल. घरातली  विजेची उपकरणे सांभाळून वापरा  दुरुस्ती निघू शकते. प्रकृती जपा. वृश्चिक अष्टमात सूर्य, व्यय स्थानातील चंद्र ,मतभेद, कुरबुरी  घडवून आणतील. अधिकाऱ्यांशी चर्चा करून मग निर्णय  घ्या. अचानक  छोटा प्रवास  संभवतो. जरा जपून रहा. धनु आज दिवस जरा वादग्रस्त ठरू शकतो  मित्रांशी वाद करु नका. मतभेद होतील. नौकरी  व्यवसायातून लाभ  संभवतात. मात्र  सरळ मार्गाने जा. साडेसाती असली तरी गुरुकृपेने मार्ग निघेल. मकर द्वितीय स्थानात वक्री होणारे गुरू महाराज, आप्तेष्टांना नाराज करू नका. त्यांना डावलून चालणार नाही. आर्थिक घडी बसवण्याचे प्रयत्‍न करा. कामाच्या ठिकाणी भरपूर वेळ द्यावा लागणार आहे. दिवस चांगला आहे. कुंभ दिवस उत्तम. आता कामांना वेग येणार आहे.  शत्रू पीडा संभवते. पण विजय  तुमचाच होईल. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. काही  धार्मिक कामात मन रमेल. मीन जरा जपून राहावे असे  ग्रहमानआहे .एकाग्र राहून काम करा. गुरूची शुभ दृष्टी फायद्याची ठरेल. यश मिळेल पण प्रयत्नाने. संतती  कडे  लक्ष द्यावे लागेल. दिवस मध्यम आहे. शुभम भवतु!!
First published: