• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: सिंह, तूळ, वृषभ राशीसाठी मंगळवार शुभ; पाहा तुमचं भविष्य

राशीभविष्य: सिंह, तूळ, वृषभ राशीसाठी मंगळवार शुभ; पाहा तुमचं भविष्य

दैनंदिन राशीभविष्याबरोबर जाणून घ्या चंद्राचं ज्योतिषशास्त्रातलं महत्त्व. कशी आणि कुणी करायची चंद्र उपासना?

  • Share this:
आज मंगळवार दिनांक 29 जून 2021 तिथी ज्येष्ठ कृष्ण पंचमी. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कुंभ राशीतून राहील. आज आपण जाणून घेऊया  ग्रहमालेतील दुसर्‍या महत्त्वाच्या ग्रहाबद्दल. सूर्यानंतर ज्योतिषशास्त्रात चंद्र  महत्त्वाचा. हा नुसत्या डोळ्यांनी दिसणारा आणि ज्योतिष शास्त्रात फार महत्त्वाचा ग्रह आहे. जन्माच्या वेळेस  चंद्र  ज्या राशीत असतो ती आपली चांद्र रास असते. चंद्राला सर्वात तीव्र गती असते. साधारण दोन सव्वा दोन दिवस चंद्र एका राशीत राहतो. चंद्र  हा मनाचा कारक आहे. चंद्र म्हणजे भाव भावना आणि त्यांचे  उतार चढाव. 'चंद्रमा मनसो जातह'. चंद्र जेव्हा कर्क या उच्च राशीत असतो  तेव्हा तो  बलवान असतो. तसेच वृश्चिक राशीत नीच अवस्थेत असतो. कुंडलीत  चंद्र  तुमचे  मन, आई, आणि इतर स्त्री वर्ग, आर्थिक बाबी, व मानसिक आरोग्य, आंदोलने दर्शवतो. चंद्राचा रंग मोतीया, पांढरा असून मोती हे रत्न आहे. रोहिणी, हस्त, श्रवण या नक्षत्रांचा स्वामी  चंद्र आहे. चंद्र  नीच असलेल्या  व्यक्तीनी जप व पांढर्‍या वस्तु दान करणे योग्य आहे. ओम सोम सोमाय नम: हा जप करावा. शिव हे चंद्राचे दैवत आहे. शिवाची उपासना फल देणारी ठरते. जाणून घेऊया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज दिवस उच्च लाभ देणारा असून गुरू चंद्र शुभ योगाची फळे मिळतील. मन आनंदी राहील. मित्र मैत्रिणींना भेटणे शक्य होईल. तुमचा  नाव लौकिक वाढेल. मुलांसाठी शुभ दिवस. वृषभ आज तुम्ही आपल्या  कर्मभूमीत रमणार आहात. धाडसाने काही निर्णय घ्याल. तुमचे  वरीष्ठ  तारीफ करतील. आर्थिक बाजू ठीक राहील. प्रकृती पण चांगली राहील. दिवस शुभ आहे. मिथुन भाग्य स्थानात गुरू चंद्र  तुम्हाला  खूप सुखद आणि दैवी अनुभव देणार आहेत. प्रवास, कार्य सिद्धीस जाईल. मिथुन राशीतील  सूर्य आणि कुंभ गुरू नवपंचम योग करीत आहेत. प्रतिष्ठा वाढेल. अष्टम शनीची चिंता आज करू नका. दिवस  शुभ आहे. कर्क आज काही नवीन  गूढ शास्त्राचे वाचन किंवा  अभ्यास करा. राशीतील मंगळ शुक्र व अष्टमात गुरू  आध्यात्मिक प्रगती होईल. पण मन थोडे  अस्वस्थ राहील.  थकवा जाणवेल. आर्थिक  बाजू ठीक राहील. प्रवास, मौजमजेसाठी खर्च कराल. दिवस  मध्यम आहे. गुरु उपासना करावी. सिंह तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण घेऊन येणारा दिवस आहे. त्यासाठी थोडा खर्च करायला  हरकत नाही. कार्यक्षेत्रातील बदल फायद्याचे ठरतील. दिवस उत्तम आहे. कन्या षष्ठ स्थानातील गुरू चंद्र प्रकृती उत्तम ठेवतील. आज नोकरी व्यवसाय आणि त्यासंबंधी काही बोलणी असतील  तर  यशस्वी होतील. नवीन संधी मिळतील. दिवस चांगला जाईल. तुला पंचम स्थानातील गुरू चंद्र अतिशय शुभ असुन वैचारिक बैठक मजबूत करतील. उत्तम लिखाण,वाचन ,अभ्यास यासाठी आजचा दिवस फार चांगला आहे. मुले तुम्हाला आनंद देतील. शुभ दिवस.. वृश्चिक आज  वृश्चिक राशीचे लोक घर  म्हणजे स्वर्ग असा  अनुभव घेतील. उत्तम सजावट ,घरात काही विशेष  पुजा  यात मन रमून ,जाईल.आर्थिक बाजु चांगली .आरोग्य ही  साथ देईल. अनावश्यक खर्च टाळा. दिवस  चांगला आहे. धनु महत्त्वाचा फोन, नोकरीसाठी मुलाखत, छोटासा सुखद प्रवास असा आजचा दिवस आहे.आर्थिक व्यवहार जपून करा. वाहन अगदी जपून चालवा. दिवस  शुभ आहे. मकर आज काही दान, पूजा  यासाठी खर्च होऊ शकतो. तुमच्या मनाचा कल अध्यात्माकडे वळेल. वाणी मधुर, कुटुंबाशी संबंध उत्तम असतील. तुमचा  आर्थिक फायदा होणार आहे. दिवस शुभ. कुंभ  राशीतील गज केसरी योगातील गुरू चंद्र मान प्रतिष्ठा  वाढवणारे आहे. मन स्थिर ,आनंदी राहील  मुलां बद्दल शुभ समाचार मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. शनि उपासना करावी. दिवस उत्तम आहे मीन आज व्यय स्थानातील ग्रह  फारसा लाभ  मिळू देणार नाहीत. काही  खर्च  समोर उभे राहतील. मुलांसाठी  काही खरेदी, कपडे, घ्यावे लागतील. राशी स्वामी गुरू  चंद्रा सोबत असून दिवस  मार्गी  लावण्यास  मदत करतील. गुरु जप करावा. शुभम भवतु!!
First published: