सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
एखादा करार संपवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असल्यास आता त्यासाठीची प्रेरणा तुम्हाला मिळू शकेल. स्वतःला अनेक गोष्टींमध्ये गुंतवून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला तणाव जाणवणार नाही. आर्थिक गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला थोडासा दिलासा मिळू शकतो.
LUCKY SIGN – A glass bottle
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
तुमच्या विश्वासातल्या व्यक्तीबाबत अपघाताने एखादं सत्य समोर येऊ शकतं. एखादा जवळचा मित्र तुमच्यासाठी सरप्राइज प्लॅन करू शकतो. कामाच्या ठिकाणी दाखवलेली नाराजी तुम्हाला नंतर भारी पडू शकते. त्यामुळे ते टाळलेलंच बरं.
LUCKY SIGN – A gold coin
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
तुमच्यासाठी त्रासदायक ठरलेला तात्पुरता टप्पा आता संपणार आहे. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आता उडी घेऊ शकता. कोणी तरी तुमच्या हालचालींवर नजर ठेवून आहे. त्यामुळे सतर्क राहा.
LUCKY SIGN – A constellation
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुम्ही खरंच प्रयत्न केले असतील तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुमच्या कामाची तपासणी करणारा बाहेरचा असू शकतो आणि त्याच्यावर तुमची चांगली छाप पडेल. ज्यांनी तुमचं चांगलं केलं नाही त्यांना कर्माचं फळ मिळेल.
LUCKY SIGN – A large ground
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
भूतकाळात उचलेली छोटी पावलं आता मोठा निकाल देणारी ठरू शकतात. तुम्हाला एखाद्या गोष्टी रस असेल आणि त्याबद्दल उत्स्फूर्त भावना वाटत असल्यास त्यासाठी विश्वासाची झेप घ्यावी लागेल. तुमचं कुटुंब तुमच्या निर्णयात तुम्हाला पाठिंबा देईल.
LUCKY SIGN – A tool box
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
तुमच्या भीतीला दाबण्याचा प्रयत्न करू नका. भितीला सामोरं जाण्याची हीच वेळ आहे. तुम्ही जिथे एखादी गोष्ट सोडली होती तिथून पुढच्या नियोजनाचं पाऊल उचलू शकता. तुम्हाला एखाद्या गोष्टीबाबत माहिती घेण्याची उत्सुकता असल्यास ती माहिती तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN – A pigmented surface
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
तुमच्या मनात एखादी न सुटलेली समस्या असेल तर त्यासाठी प्रयत्न करा आणि सोडवा. यामुळे अनावश्यक ताण आणि विचलितपणा दूर होईल. तुमच्या आठवणीतून गेलेली एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करील. आताची वेळ ही स्वतःच्या खऱ्या भावना जाणण्याची आहे.
LUCKY SIGN – A coffee mug
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
भूतकाळात पूर्ण केलेल्या एखाद्या गोष्टीसाठी बक्षीस मिळण्याची तुमची अपेक्षा असल्यास ते विसरून पुढे गेलेलंच चांगलं ठरेल. कदाचित जीवनाकडून आश्चर्याचा धक्का मिळेल जो तुमच्यासाठी चांगली बातमी असेल. तुम्हाला स्वतःला प्रभावशाली व्यक्ती असल्याचं वाटू शकतं.
LUCKY SIGN – A musical instrument
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
नव्या प्रेरणेमुळे विलक्षण असं काहीतरी करण्यासाठी तुम्ही प्रेरित होण्याची शक्यता आहे. तुम्ही नुकत्याच सबमिट केलेल्या एखाद्या गोष्टीवर संमिश्र प्रतिक्रिया येऊ शकते. तुम्हाला त्यावर पुन्हा काम करावं लागू शकते. आरोग्याकडे लक्ष द्यावं लागू शकतं.
LUCKY SIGN – Fireworks
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
मत्सराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. कोणी तरी कामाच्या ठिकाणी तुमच्या गोष्टी चोरून ऐकू शकतं. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर ते थोड्या वेळासाठी लांबणीवर टाकायचा प्रयत्न करा. वारसाहक्काचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN – A solar panel
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
एखादा सोपा दृष्टिकोनही चांगला परिणाम देणारा असू शकतो. तुमच्या पाठीमागून कोणी तुमची तक्रार केली असल्यास त्याचा शोध घेतला पाहिजे. किरकोळ चोरीची घटना संभवते. त्यामुळे काळजी घ्या. तुमच्या आईला भावनिक आधाराची गरज भासेल.
LUCKY SIGN – A silk scarf
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
हा बदलांचा काळ आहे. तुमचा जॉब, आवड किंवा एखाद्या सवयीच्या बाबतीत बदल घडू शकतो; पण जो काही बदल होईल तो चांगल्यासाठी असेल. तुम्हाला आता स्वयंप्रेरणेच्या आणि सातत्याची ऊर्जा मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN – A glue
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs