दैनंदिन राशीभविष्य: कुंभ, तूळ आणि वृषभसाठी 'अच्छे दिन'ला सुरुवात

दैनंदिन राशीभविष्य: कुंभ, तूळ आणि वृषभसाठी 'अच्छे दिन'ला सुरुवात

Today's Horoscope: आज ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा. सूर्य मृग नक्षत्रात आहे. तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा आहे वाचा - आजचं राशीभविष्य

  • Share this:

आज  शुक्रवार  दिनांक 11 जून 2021 तिथी  ज्येष्ठ शुद्ध  प्रतिपदा. सूर्य  मृग नक्षत्रात राहील. वाचा आजचं  राशी भविष्य.

मेष  - अग्नी तत्त्वाची ही प्रथम  रास. शुक्रवारी चंद्र  मिथुन राशीत भ्रमण करेल. तृतीय स्थानातील हे  भ्रमण   शुभ  असून आर्थिक, शारीरिक  त्रास  कमी होतील.  घरात जपून बोलावे. लाभ स्थानातील वक्री गुरू परिस्थिती  नियंत्रणात ठेवेल.

दिवस  मध्यम  जाईल.

वृषभ

ही पृथ्वी तत्त्वाची   द्वितीय रास. गेले तीन दिवस फारसे अनुकूल नसलेले ग्रहमान आज  सुधारेल. आर्थिक घडामोडी होतील.  प्रकृती बरी राहील. लाभ ही होईल. आज दिवस शुभ आहे.

मिथुन

वायु तत्त्वाची  ही तिसरी रास .आज तुमच्या राशी स्थानात होणारे चंद्र भ्रमण  अनुकूल आहे. प्रकृती ठीक राहील. आर्थिक व्यवहार जपून करा. आज दिवस चांगला  आहे.

कर्क

जलतत्त्वाची ही चौथी रास. आज  चंद्र  व्यय स्थानातून  भ्रमण करेल. मानसिक  आंदोलने, प्रकृती नरम राहील. राशीतील मंगळ शुक्र चेहर्‍यावर  तेज , विलासी वृत्ती  देईल. दिवस मध्यम  आहे.

सिंह

सिंह रास ही  अग्नी तत्त्वाची  पाचवी रास  आहे. आज चा दिवस लाभदायक आहे. केलेल्या  कामाचे  फळ मिळेल. पण व्ययातला  मंगल, शुक्र चैनीसाठी  खर्च  करेल. दिवस चांगला आहे.

कन्या

पृथ्वी तत्त्वाची ही सहावी रास. कन्या राशीला

शुक्रवार  कामाचा  प्रभाव वाढवणारा आहे. जास्तीची जबाबदारी  येऊ शकते. कोणी अधिकारी व्यक्ती भेटू शकतो. दिवस  उत्तम आहे.

तुला

वायु तत्त्वाची ही  सातवी  रास आहे. भाग्यशाली  रास. तीन दिवस  झालेले  त्रास आज कमी होतील. धार्मिक गोष्टींकडे  कल राहील. छोटे प्रवास  संभवतात. अष्टमात असलेले  ग्रह सावध राहावे  असे  सुचवतात. दिवस  चांगला.

वृश्चिक

राशीचक्रामधील  जल तत्त्वाची ही आठवी  रास.  आजचा दिवस  तुम्हाला शुभ नाही. अष्टमात भ्रमण करणारा चंद्र मानसिक, शारीरिक  त्रास  देईल. राशीतील केतू  जप, ध्यान  करावे  असे  सांगतो. दिवस शांततेत घालवा..

धनु

अग्नीतत्त्वाची  ही नववी रास. राशीच्या सप्तम स्थानात होणारे  चंद्र भ्रमण अनुकूल आहे. जोडीदाराला वेळ द्या. अष्टमात असलेले मंगळ शुक्र प्रकृतीकडे  लक्ष द्या असे सांगतात. मंगळजप करणे योग्य  ठरेल. दिवस  शुभ.

मकर

पृथ्वी तत्त्वाची ही  दहावी  रास आहे. चिकाटीने कार्य पार  पाडा. प्रकृती  आज  थोडी  नरम राहील. कर्ज  देणे किंवा घेणे  टाळा. दिवस  शांततेत व्यतीत  होईल. मध्यम दिवस.

कुंभ

राशी चक्रातील ही  वायु तत्त्वाची अकरावी रास.  आज दिवस उत्तम  आहे. मुलांच्या  मागण्यांसाठी आज  खर्च  होणार आहे. वेळ  किंवा  पैसा. राशीतील गुरू  साथ  देतो आहे. शुभ दिवस.

मीन

जल तत्त्वाची  ही बारावी  रास. गुरु  सध्या  व्ययात आहे. नियमाने जप करावा. चंद्र आज  चतुर्थ स्थानात भ्रमण करीत आहे. घरातील  जास्तीची  काम  आज उरकून घ्या.  घरासाठी  काही खरेदी  करावी लागेल. दिवस समाधान कारक  आहे.

शुभम भवतु.

First published: June 11, 2021, 7:05 AM IST

ताज्या बातम्या