मेष (Aries)
आयुष्यातल्या गतीमुळे तुम्हाला हरवून गेल्यासारखं वाटत असेल, तर तुमचा वेग कमी करू शकता. एखादी तुलनेने नवीन व्यक्ती तुमच्या बिझनेसमध्ये अचानक रस दाखवेल. कमाईचा आणखी एक स्रोत समोर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN – A Constellation
वृषभ (Taurus)
एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला रस असण्याचं मूळ कारण अद्याप अस्पष्ट असेल. अशी अशी स्वप्नं असू शकतात, जी अनेकदा तुम्हाला अस्वस्थ करतील किंवा त्यांबद्दल विचार करण्यास भाग पाडतील. एखादी सवय सोडण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये आता यश मिळेल.
LUCKY SIGN – A Circus
मिथुन (Gemini)
एखादी व्यक्ती तुमच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. तुम्हालाही कोणी तरी तुमचा पाठलाग करत असल्याची जाणीव होईल; मात्र तुम्ही तुमच्या हुशारीने, क्लृप्तीने त्यावर मात कराल. तुमच्या खासगी गोष्टी किंवा अडचणी ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी शेअर करू नका.
LUCKY SIGN – Sparkling Water
कर्क (Cancer)
तुमचं नियोजन खरंच मास्टरप्लॅन असतं, तर आतापर्यंत त्याचे परिणाम दिसून आले असते. त्यामुळे तुमचं नियोजन बदलण्यावर विचार करा. एखादी नवीन संकल्पना तुमच्या वरिष्ठांच्या पसंतीस पडेल. घरामध्ये काही गोंधळ-वाद होण्याची शक्यता आहे; मात्र हे तात्पुरतं असेल.
LUCKY SIGN – A New Footwear
सिंह (Leo)
भूतकाळातली एखादी व्यक्ती पुन्हा आयुष्यात येऊ शकेल; मात्र तुम्ही तिच्याकडे पाठ फिरवाल. तुम्ही कामामध्ये भरपूर व्यग्र असाल, मात्र तुम्हाला एकटेपणाची जाणीव होईल. एखाद्या लहान मुलांच्या खोड्यांमुळे चांगलं मनोरंजन होईल.
LUCKY SIGN – A Diamond Ring
कन्या (Virgo)
तुम्ही कामाच्या एखाद्या नव्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित कराल. ते एखादं पर्यटनस्थळ किंवा तिथे जाण्याचा मार्ग असू शकतो. कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा खूप आटापिटा करील. एखादा साधा दृष्टिकोन मोठा प्रभाव निर्माण करू शकतो.
LUCKY SIGN – An Eclipse
तूळ (Libra)
घरामधल्या एखाद्या व्यक्तीला दुर्लक्षित वाटेल. एखाद्या फोटोमुळे किंवा जुन्या आठवणीमुळे लपलेल्या भावना बाहेर येतील. तुमच्या कल्पना युनिक असतात, तुम्हाला त्या सादर करण्याची संधी मिळेल. नव्याने संवाद सुरू करा.
LUCKY SIGN – A Wireless Headphone
वृश्चिक (Scorpio)
तुम्हाला लवकरच व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही आधीच जे ठरवलं आहे, त्यामध्ये बदल करणं तुम्हाला आवडणार नाही. परदेश दौऱ्यामुळे नवीन समज मिळेल. तुमची दिनचर्या कायम ठेवा.
LUCKY SIGN – A Terracotta Basin
धनू (Sagittarius)
कामाची डेडलाइन जवळ आल्यामुळे तुमचे प्रयत्न वाढवण्याची गरज आहे. घरगुती समस्या सुटण्यासाठी एखादा आशेचा किरण दिसेल. तुमचं लक्ष्य गाठण्यासाठी एखाद्या तरुणाची स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रेरित करेल.
LUCKY SIGN – A Silicon Tray
मकर (Capricorn)
तुमच्याशी चांगलं वागणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुमच्याबद्दल मत्सरही वाटत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर नीट लक्ष ठेवणं गरजेचं आहे. एखाद्या नवीन सवयीचे फायदे तुम्हाला अपेक्षेपेक्षा लवकर दिसून येतील. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणखी लवचीक होणं गरजेचं आहे.
LUCKY SIGN – A Red Candle
हे वाचा - आनंददायी, मोहक, प्रभावशाली असतात R आद्याक्षराच्या व्यक्ती; भावतो त्यांचा हा गुण
कुंभ (Aquarius)
कायदेविषयक प्रकरणांमध्ये काहीसा दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा ज्युनिअर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक करील. एखादा मोठा निर्णय घोषित करणार असाल, तर सध्या होल्डवर ठेवा. मध्यस्थी व्यवस्था तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
LUCKY SIGN – A Sour Candy
मीन (Pisces)
तुमच्या आजूबाजूच्या घटनांमधला ठरावीक पॅटर्न तुमचं लक्ष वेधून घेईल. तुम्ही तुमच्या लक्ष्याच्या अगदी जवळ आहात असं वाटेल; मात्र त्यासाठी अद्याप वेळ आहे. तुमचं लक्ष नसताना एखादी संधी दारावर चालून येईल.
LUCKY SIGN – A Yellow Crystal
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Horoscope, Rashibhavishya, Rashichark