मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

एखादा जवळचा मित्र सकारात्मक बातमी सांगेल; कसा असेल 26 जानेवारीचा दिवस?

एखादा जवळचा मित्र सकारात्मक बातमी सांगेल; कसा असेल 26 जानेवारीचा दिवस?

26 जानेवारीचे राशीभविष्य

26 जानेवारीचे राशीभविष्य

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 26 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मेष (Aries) 

आजचा दिवस तुम्ही ठरवल्यापेक्षा जास्त व्यग्र असू शकेल. एखाद्या अचानक आलेल्या कामामध्ये दिवसाचा बराचसा वेळ जाईल. आज खाण्याच्या बाबतीत नियंत्रण गरजेचं आहे. अत्यावश्यक नसेल तर कोणत्याही बाबतीत कमिटमेंट टाळा.

LUCKY SIGN – A Jasmine Flower

वृषभ (Taurus) 

दिवसाची सुरुवात आळसाने, आरामात करून स्वतःचे लाड करा; मात्र दुपारनंतर दमवणारा वेग येईल. एखादा जवळचा मित्र सकारात्मक बातमी सांगेल. तुम्ही आतापर्यंत जी गोष्ट पुढे ढकलत होतात, ती आता करावी लागणार आहे हे लक्षात घ्या.

LUCKY SIGN – A Lemongrass

मिथुन (Gemini) 

आज आर्थिक फायदा संभवतो. अडकलेले पैसे मिळू शकतील किंवा नवीन कमिटमेंटमध्ये लाभ होईल. तुमच्या मुलाचे मित्र कोण आहेत, कसे आहेत याबाबत आढावा घेण्याची गरज आहे. दैनंदिन जीवनातून एक ब्रेक घ्या.

LUCKY SIGN – Two Squirrels

कर्क (Cancer) 

तुम्ही आधी ठरवलेल्या गोष्टी वेळेवर पार पडतील. एकतर्फी असणाऱ्या संबंधांना आता अर्थ उरणार नाही. तुम्हाला लवकरच त्यातून बाहेर पडावंसं वाटेल. सरकारी आणि मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींना आजचा दिवस दमवणारा, मात्र अर्थपूर्ण असेल

LUCKY SIGN – An Eagle

सिंह (Leo)

तुमच्या मताला आज सर्वाधिक किंमत असेल. प्रगतीसाठी तुम्हाला एक व्यासपीठ उपलब्ध होईल. रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या जोडीदाराला एखाद्या कामासाठी तुमची मदत लागेल, तुम्हाला कदाचित वेळ नसेल.

LUCKY SIGN – A Notice Board

कन्या (Virgo)

तुमच्या इच्छांबाबत ठाम राहा आणि त्यातून जे काही समोर येणार आहे ते स्वीकारण्यास तयार राहा. तुमच्या अलीकडच्या कृतींबद्दल तुम्हाला जज केलं जाईल. एखादी आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती तुम्हाला भेटेल. अचानक एखादा प्रवासाचा बेत आखाल.

LUCKY SIGN – A Yellow Sapphire

तूळ (Libra)

आज जवळपास एक सर्वोत्कृष्ट दिवस आहे, ज्याचा फायदा तुम्ही घ्यायलाच हवा. नियोजनबद्ध राहा आणि शोध घेत राहा. तुम्ही सध्या योग्य आणि निश्चित मार्गावर आहात. कौटुंबिक सहलीचे संकेत आहेत.

LUCKY SIGN – A New Gadget

वृश्चिक (Scorpio) 

एखादा नवीन छंद तुम्हाला बऱ्याच ठिकाणी घेऊन जाईल. नुकतीच भेट झालेल्या एखाद्या व्यक्तीवर तुम्ही भरपूर विश्वास ठेवाल. मनातल्या गोंधळामुळे मानसिक ताण, गोंधळ जाणवेल. नेटकेपणा जपण्यासाठी तुमच्या दिनचर्येत बदल करा.

LUCKY SIGN – A String of Lights

धनू (Sagittarius)

वेळेपूर्वीच एखाद्या बाबतीत बोलणी करू नका. संयम बाळगणं गरजेचं आहे. तुमच्या हेतूंना सर्वांचा पाठिंबा आहे; मात्र त्यासाठी योग्य संवाद गरजेचा आहे. शेजारची एखादी व्यक्ती अडथळा निर्माण करील.

LUCKY SIGN – A Vanilla Fragrance

मकर (Capricorn)

तुमचे हेतू चांगले करण्याचा आजचा दिवस आहे. एखादी कृती करण्याबाबत तुमच्याकडे बऱ्याच दिवसांपासून चौकशी सुरू आहे आणि आता कृतीची वेळ आली आहे. तुमच्या मनातली भीती बाजूला ठेवून समोरचं नवीन आव्हान स्वीकारा. साधेपणाने काम करत राहा.

LUCKY SIGN – A Mushroom Plant

हे वाचा - जानेवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

कुंभ (Aquarius)

समृद्धी हळूहळू तुमच्या दिशेने येत आहे. नवीन संकल्पनांचा आणि विचारांचा स्वीकार करत राहा. त्यामुळे तुमचं रूटीन काही काळासाठी बिघडेल; मात्र तुम्हाला संघटित मार्ग मिळेल. नव्या कर्मचाऱ्यांची भरती करा.

LUCKY SIGN – A Clear Sky

मीन (Pisces)

तुमची भीती सत्यात उतरते आहे असं वाटेल; मात्र त्यावर आरामात मात करू शकाल. कामाच्या ठिकाणी मिळणारी मदत आणि आधार, काही प्रकारची परिस्थिती तपासण्याची गरज भासेल. नवीन संधी मिळण्यासाठी थोडा वेळ लागेल.

LUCKY SIGN – Purple Flowers

First published:

Tags: Horoscope, Rashibhavishya, Rashichark