मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

घरामध्ये काहीसं ताणाचे वातावरण राहील; या राशीच्या लोकांनी जपून घ्यावं

घरामध्ये काहीसं ताणाचे वातावरण राहील; या राशीच्या लोकांनी जपून घ्यावं

24 जानेवारी राशीभविष्य

24 जानेवारी राशीभविष्य

आज दिनांक 25 जानेवारी 2023 वार बुधवार. आज माघ शुक्ल चतुर्थी, विनायक चतुर्थी दुपारी 2.14 पर्यंत. त्यानंतर पंचमी. आज चंद्र कुंभ राशीतून दुपारपर्यंत भ्रमण करेल. त्यानंतर मीन रास प्रारंभ होईल. आज श्री गणेश जयंती असून ह्या अत्यंत शुभ पर्वाच्या सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा. पाहुया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मेष

आज जरासे आत्मपरीक्षण करा. कटू बोल हानी करू शकतात. चंद्र लाभ स्थानातून विशेष फळ देईल. संतती नाराज राहील. गुरू अध्यात्मिकबाबीत रस निर्माण करेल. शनीचे लाभ स्थानातील वास्तव्य दिलासा देईल. दिवस मध्यम

वृषभ

आज घर आणि जोडीदार ही तुमची प्राथमिकता राहील. विशेष स्वच्छता, सजावट, खरेदी यात वेळ घालवाल. एकूण दिवस हा स्वतःकरता, कुटुंबा करता वेळ देण्याचा आहे. व्यवसाय नोकरीसाठी शुभ दिवस.

मिथुन

आज मन काहीसे अस्थिर राहील. अष्टम स्थानावरील रवि मानसिक द्वंद्व निर्माण करतील. प्रकृतीचे त्रास वाढतील. व्यय मंगळ आहे खर्च आणि उत्पन्न याचा मेळ लागणार नाही. बंधू भेट आणि प्रवास संभवतो. मध्यम दिवस.

कर्क

आज अष्टम स्थानावरील चंद्र स्वभावात आणि बोलण्यात कटुता आणेल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होतील. आर्थिक लाभ संभवतो. संतातीसुख आणि सामाजिक लाभ मिळतील. शुभ दिवसाचे फळ मिळेल.

सिंह

आज वैवाहिक जीवनात सुख तसेच कुटुंबात काही शुभ घटना घडतील. शनी-चंद्र युती योग आहे. मनात घालमेल होत असताना देखील इतर ग्रह मार्ग दाखवतील. गुरू कृपा होईल. दिवस शुभ.

कन्या

संतती चिंता, घरामध्ये काहीसे ताणाचे वातावरण असा हा दिवस आहे. षष्ठ चंद्र भावंडांच्या बाबतीत काळजी लावेल. जपून असा . अष्टम राहू प्रकृती जपा असे सांगत आहे. दिवस मध्यम.

तूळ

अनपेक्षित घडामोडी, मित्र मैत्रिणींची भेट किंवा संपर्क आणि संततीसाठी विशेष घटना असा हा दिवस आहे. कामाचा लाभ मिळेल. आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस.

वृश्चिक

आज ऑफिसमध्ये जास्तीची जबाबदारी येईल. वरिष्ठ अवलंबून राहतील .तिथे वेळ गेल्यामुळे घरामध्ये ताण निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात कलह टाळा. दिवस बरा.

धनू

घरामध्ये शुभ घटना, प्रवास, धार्मिक स्थळांना भेट असा हा दिवस आहे. तृतीय चंद्र आर्थिक व्यय तसेच प्रकृती नाजूक ठेवेल. भावंडांची काळजी घ्या. शुभ दिवस.

मकर

आज सर्व तऱ्हेने आनंदी राहण्याचा दिवस आहे. राशीतील शनी पुढे गेला असून लाभ चंद्राचा मानसिक स्थितीवर उत्तम परिणाम होईल. बुध-शुक्र व्यवसायात मदत करतील. पण एकूण सावध रहा. चांगला दिवस.

हे वाचा - जानेवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

कुंभ

व्ययस्थ रवि गोचरअनुसार काळजीचे वातावरण राहील.वैवाहिक जीवनात कुरबुरी असतील. मात्र, फारसे अवघड जाणार नाही. राशीतील शनी आणि गुरू मदत करील. व्यवसाय चांगला राहील. दिवस बरा.

मीन

प्रकृती आणि सामाजिक जीवनात कुरबुरी सुरू असतील तर आज जपून रहा. आर्थिक घडामोडी, निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा. भावंडाना त्रास होण्याचा काळ आहे. काळजी घ्या. दिवस मध्यम.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Horoscope, Rashibhavishya, Rashichark