मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /भूतकाळातल्या गोष्टींचा त्रास आज एका सल्ल्यानं होईल गायब; असा असेल 8 फेब्रुवारीचा दिवस?

भूतकाळातल्या गोष्टींचा त्रास आज एका सल्ल्यानं होईल गायब; असा असेल 8 फेब्रुवारीचा दिवस?

आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 8 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मेष (Aries) 

आज घरगुती गोष्टींकडे लक्ष देण्याचा दिवस आहे. भविष्यातल्या काही योजनांबाबत चर्चा करा. काही गोष्टी तुम्ही पुढे पुढे ढकलत आहात; मात्र त्यांच्याकडे तुम्हाला लवकरच लक्ष द्यावं लागेल. जुन्या ओळखीतील एखादी व्यक्ती भेटेल.

LUCKY SIGN – A Marigold

वृषभ (Taurus)

आज जबाबदारीची, गांभीर्याची जाणीव होईल. वरिष्ठ काय सांगत आहेत याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आज उत्तम दिवस आहे.

LUCKY SIGN – A Butterfly

मिथुन (Gemini) 

तुमच्या कौशल्यांचे तुम्हाला हवे त्यापेक्षा अधिक चांगले परिणाम दिसून येतील. भूतकाळातल्या काही गोष्टींचा त्रास होत असेल, तर तुम्हाला एखादा खास सल्लागार भेटेल. विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल.

LUCKY SIGN – A Spider Web

कर्क (Cancer) 

एखादी ओळखीची व्यक्ती आर्थिक अडचणीत असेल, ती तुमच्याकडे मदत मागू शकते. तुमचा व्यवसाय असेल तर मोठा आर्थिक फायदा संभवतो. जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर तो पुढे ढकला.

LUCKY SIGN – Rising Sun

सिंह (Leo) 

आज तुम्हाला बऱ्याच गोष्टी विचारात पाडतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या ओळखीचा वापर व्हावा, अशी अपेक्षा केली जात आहे. हरवलेली एखादी अमूल्य वस्तू परत मिळेल. आजचा दिवस भरपूर तणावाचा राहील.

LUCKY SIGN – A Mountain view

कन्या (Virgo)

गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता, ती आता होईल. कामाच्या ठिकाणी एखादी चांगली बातमी मिळाल्याने आनंदी असाल. तुमच्या खासगी गोष्टींमध्ये लुडबूड झाल्यामुळे दिनचर्येवर परिणाम होईल.

LUCKY SIGN – An Artifact

तूळ (Libra) 

लवकरच सेलिब्रेशन्स होतील. एखादी गोष्ट तुम्ही ठरवल्याप्रमाणे होत नसली तरी तिला काही तरी चंदेरी किनार असेल. महत्त्वाचे निर्णय घाईघाईत घेऊ नका. त्याचे पडसाद उमटू शकतात.

LUCKY SIGN – A Platinum ring

वृश्चिक (Scorpio)

तुमचं अती व्यावहारिक वागणं एखाद्याला दुखावू शकतं. तुमच्या व्यक्त होण्याच्या कौशल्यावर काम करणं गरजेचं आहे. तुमच्या मनात जे आहे ते सर्व तुम्हाला समोरच्याला सांगता येईलच असं नाही. एखाद्या गोष्टीचा उत्साह थोडा मागे ठेवा.

LUCKY SIGN – Golden dust

धनू (Sagittarius) 

आजचा दिवस तुम्हाला हवा तसाच राहील. कामाच्या बाबतीत जास्त ताण घेऊ नका. आज आराम करण्याचा मूड राहील. तुमची एनर्जी रिफ्रेश करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

LUCKY SIGN – A Cherished memory

मकर (Capricorn) 

एखाद्या माहिती नसलेल्या ठिकाणी जात असाल, तर तो प्रवास उपयुक्त ठरेल. एखाद्या चुलत भावंडाला वा नातेवाईकाला तुमची आठवण येईल. शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी चांगला दिवस.

LUCKY SIGN – A pigeon

हे वाचा - तुमच्याही नावाची सुरुवात V या अक्षराने होते का ? मग हे नक्की वाचा

कुंभ (Aquarius) 

तुमच्या एखाद्या निर्णयावर ठाम न राहण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. एखादी अतिरिक्त जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते. तिचा तुम्हाला भविष्यात फायदाच होईल. मतं स्पष्टपणे व्यक्त करा.

LUCKY SIGN – Three pigeons

मीन (Pisces) 

आजचा दिवस भविष्याबाबत नियोजन करण्याचा आहे. विस्तारीकरणासाठी नवं कौशल्य शिकण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. बॉसला तुमच्याकडून काही पुन्हा खात्री हवी असेल. तुम्ही ध्येयाच्या जवळ येत असल्याचं जाणवेल.

LUCKY SIGN – Shades of Lilac

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Rashibhavishya