मेष (Aries)
गोंधळाच्या परीस्थितीतून ब्रेक म्हणून प्रवासाचा बेत आखाल. रोजच्या कंटाळवाण्या दिनचर्येत अडकल्यासारखे वाटत असेल, तर त्यातून लवकरच सुटका होईल. आठवड्याभरात पैशांचे प्रश्न मार्गी लागतील. घरी एखादा पाळीव प्राणी आणण्याचा विचार कराल. ओळखीच्या लोकांसोबत भेटीगाठी, गप्पाटप्पा केल्याने फ्रेश वाटेल.
LUCKY SIGN – An Open Gate
वृषभ (Taurus)
तुम्हाला मिळणाऱ्या सर्व संधींचा योग्य वापर करून घ्या. सध्या ज्या बाबतीत तुमची बोलणी सुरू आहेत, त्याला गती मिळेल. तुम्ही स्वतःसाठी काही कडक बेंचमार्क ठरवून ठेवले आहेत. कुटुंबीयांना अधिक वेळ द्या. दिनचर्येत व्यायाम किंवा तत्सम आरोग्यदायी सवयींचा समावेश केल्यास मानसिक आरोग्यालाही फायदा होईल.
LUCKY SIGN – A rose petal
मिथुन (Gemini)
घराचं रिनोव्हेशन करण्याची इच्छा होईल. उत्पन्नाचा नवीन स्रोत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अर्थात, यासाठी तुम्हाला तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही गुंतवावे लागतील. तुमच्यात नवा आत्मविश्वास निर्माण होईल. सकारात्मक उर्जा राहील. भूतकाळातील त्रासदायक आणि नकारात्मक गोष्टी बाजूला होतील.
LUCKY SIGN – A Buddha statue
कर्क (Cancer)
सध्या तुम्हाला एक ब्रेक घेण्याची गरज आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये आतातरी ‘वेट अँड वॉच’ ही भूमिका योग्य ठरेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न काही व्यक्ती करू शकतात. कामाच्या ठिकाणी बदलत असलेल्या वातावरणाबाबत खबरदारी बाळगा. हा बदल तुमच्यासाठी प्रतिकूल ठरू शकतो. घरी वातावरण शांत राहील, कुटुंबीयांवर अवलंबून राहू शकता.
LUCKY SIGN – A Portrait
सिंह (Leo)
येत्या काही दिवसांमध्येच एका नवीन प्रवासाची सुरूवात होईल. प्रगतीसाठी सध्या आक्रमकपणे काम करणं फायद्याचं ठरेल. तुमच्यात असलेला नैसर्गिक आकर्षकपणा वापरून ओळखी वाढवाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वामुळे लोक तुमचे मत विचारात घेतील. घरामध्ये थोडेफार वाद होण्याची शक्यता आहे. एखादे छोटेसे गेट-टुगेदर तुम्हाला रिफ्रेश करेल.
LUCKY SIGN – A box of sweets
कन्या (Virgo)
घराजवळ रहायला आलेली एखादी नवीन व्यक्ती चर्चेचा भाग होईल. सध्या ट्रेंडिग होत असलेली एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न कराल. एखादं गुपित तुमच्याजवळच ठेवणं अवघड वाटेल. जर सकाळी लवकर उठून व्यायाम करणे शक्य होत नसेल, तर थोडी उशिराची वेळ निवडा. बिझनेस आणि नातेसंबंध या गोष्टी वेगवेगळ्या ठेवण्याचा प्रयत्न करा.
LUCKY SIGN – A tag
तूळ (Libra)
सध्या सर्व काही थांबल्यासारखं वाटेल. नवीन काहीच घडत नाहीये, किंवा कोणतीच गोष्ट मार्गी लागत नाहीये असं वाटण्याचा सध्याचा काळ आहे. मात्र ही परिस्थिती अधिक काळ टिकणार नाही हे लक्षात घ्या. तुमच्या प्रमोशनची चर्चा पुन्हा एकदा सुरू होईल. या वेळी मात्र ही चर्चा फळाला जाण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN – A walking stick
वृश्चिक (Scorpio)
चांगल्या व्यक्तींसोबत नेहमी चांगलंच होतं, हे लक्षात घ्या. तुम्ही आतापर्यंत प्रामाणिकपणे ज्या गोष्टी करत आला आहात, त्यांचा तुमच्या प्रगतीसाठी फायदा होईल. तुमच्याकडे कामाला असलेल्या एखाद्या व्यक्तीला तब्येतीची समस्या जाणवेल. शक्य झाल्यास त्या व्यक्तीला नक्की मदत करा. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी कराल. एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी आणखी शोध घेणं गरजेचं आहे.
LUCKY SIGN – A wooden box
धनू(Sagittarius)
मित्र-मैत्रिणींसोबत वेळ व्यतीत करणे फायद्याचे ठरेल. गार्डनिंगचा छंद जोपासाल, ज्यामधून कदाचित एखादी बिझनेस आयडिया मिळू शकेल. तुमच्या कामाच्या गतीबाबत काही समस्या निर्माण होऊ शकते. चांगले परिणाम साध्य करण्यासाठी कामात थोडेफार बदल करावे लागतील. दिनचर्येतून विश्रांतीसाठी दुसऱ्या शहरात एखादी सहल आयोजित कराल.
LUCKY SIGN – Pink flowers
मकर (Capricorn)
कुटुंबीयांसोबत एखाद्या समारंभाला उपस्थित रहावे लागेल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर महिना अखेरीपर्यंत चांगला पर्याय मिळेल. तुमच्या जवळच्या नातेवाईकांवर सर्वांसमोर टीका करणे टाळा. गोष्टींचे योग्य नियोजन करण्याचे कौशल्य तुमच्यात आहे, त्यामुळे तुमची उर्जा एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी खर्च करा.
LUCKY SIGN – A brand new coin
कुंभ (Aquarius)
तुमच्या एखाद्या मित्राला सध्या तुमच्या मदतीची गरज आहे, त्याला टाळू नका. काही वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टी त्याच पॅटर्नमध्ये पुन्हा होताना दिसतील. तुम्हाला नवनवीन प्रयोग करण्याची आवड आहे, मात्र पुरेसा रिसर्च केला नसल्याने हे प्रयोग फसतात. विवाह पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. तुम्ही मनापासून ज्या व्यक्तीची प्रशंसा, कौतुक करता तिला भेटण्याची इच्छा पूर्ण होईल. सध्या भागीदारी टाळणं उत्तम.
LUCKY SIGN – An aquarium
हे वाचा - नोकरी, व्यवसायासाठी शुभकाळ; सूर्याचं राशीपरिवर्तन या राशींना देईल 'छप्पर फाडके'
मीन (Pisces)
तुमच्या कामाच्या तुलनेत नेमका किती मोबदला मिळाला हे समजणे अवघड जाईल, त्यामुळे चिडचिड वाढेल. वैयक्तिक आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी गोष्टी सुरळीत करण्याची तुमची इच्छा आहे. जुन्या ओळखीच्या व्यक्तींमुळे एकटेपणा दूर होईल. हवामानातील बदलामुळे तुमचे प्रवासाचे बेत विस्कळीत होतील. ऑनलाईन फ्रॉडपासून सावध रहा. तुमच्या अडचणींवरील उपाय तुमच्या जोडीदाराकडे असू शकतो, तेव्हा मोकळेपणाने चर्चा करा.
LUCKY SIGN – Tangerine Plates
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark, Religion