मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : या लोकांना जोडीदाराची घ्यावी लागेल जास्त काळजी; पाहा कसे आहे आजचे राशिभविष्य

दैनंदिन राशिभविष्य : या लोकांना जोडीदाराची घ्यावी लागेल जास्त काळजी; पाहा कसे आहे आजचे राशिभविष्य

चंद्र आज मीन राशीत भ्रमण करेल. शुक्र धनु राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

चंद्र आज मीन राशीत भ्रमण करेल. शुक्र धनु राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

चंद्र आज मीन राशीत भ्रमण करेल. शुक्र धनु राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक 4 डिसेंबर 2022 रविवार. आज मोक्षदा एकादशी. चंद्र आज मीन राशीत भ्रमण करेल. शुक्र धनु राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज चंद्र काही विशेष कामासाठी समाजात तुमचे महत्व वाढेल. काही महत्वाचे काम हातून घडेल. रवि अष्टमात आहे. डोळ्यांची काळजी घ्या. संतती साठी खर्च होईल. दिवस उत्तम.

वृषभ

आज दिवस उत्तम असून महत्वाचे निरोप मिळतील. मौल्यवान खरेदी होईल. गृह सौख्य मिळेल. वडीलधारी व्यक्ती मदत करेल. राशी स्थानात मंगळ आहे. तरी आर्थिक बाबतीत सावध रहा. दिवस शुभ.

मिथुन

सावध राहण्याचा दिवस. आर्थिक व्यय होईल. सप्तम स्थानात शुक्र आहे. खरेदी भरपूर होईल. घरात तणावाची स्थिती राहील. महत्वाचे निर्णय टाळा. जोडीदार आनंदी राहील. दिवस मध्यम.

कर्क

आज प्रकृती ठीक राहिल. व्यवसायात प्रगती होईल. जोडीदाराची काळजी घ्या. ईश्वराची उपासना सर्व संकटातून मार्ग काढेल. मानसिक स्वास्थ्य देईल. आर्थिक दृष्ट्या दिवस चांगला आहे.

सिंह

षष्ठात शनि आहे, शत्रू डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतील. चंद्र जोडीदाराला लाभ दाखवत आहे. आरोग्य चिंता वाटेल. काही कारणाने नातेवाईक भेटतील. दिवस उत्तम.

कन्या

संततीला नवीन संधी प्राप्त होतील. मानसिक चिंता वाटेल. आर्थिक व्यय होईल. शारीरिक व्याधी होतील. घरात काम वाढेल. मात्र कार्यक्षेत्रात नाव मिळेल. दिवस मध्यम.

तूळ

गृह, नवीन वाहन याचे योग येतील. कुठेही अनावश्यक धाडस करू नये. लाभ चंद्र विशेष घटना घडवील. प्रवास घडतील. आई वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दिवस मध्यम.

वृश्चिक

आज अचानक संतती संबंधी काळजी वाटेल. आर्थिक लाभ होतील. कार्यालयात जास्तीचे काम पडेल. पण भाग्य साथ देईल. वादविवाद टाळा. दिवस मध्यम.

धनु

आज अनेक ठिकाणाहून जबाबदाऱ्या येतील. आर्थिक चिंता दूर झाली तरी खर्च जपून करा. प्रवास योग आहे. भाग्य चंद्र आणि मंगळ उत्तम सुख देतील. दिवस उत्तम.

मकर

मंगळ षष्ठ आणि चंद्र तृतीय स्थानात अनेक संमिश्र फळ देणार आहेत. फार ताण घेऊ नका. डोकेदुखीचा त्रास होईल. संततीला कठीण काळ. आर्थिक प्राप्ती बरी राहील. दिवस उत्तम.

कुंभ

जपून रहा. फार महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा. आर्थिक कामं पूर्ण होतील. धार्मिक कार्यात वेळ जाईल. जोडीदार आनंदी राहील. देवदर्शन घडेल. दिवस उत्तम.

मीन

कुटुंबियांच्या समवेत दिवस जाईल. काही तरी विशेष करून दाखवाल. लोकांमध्ये तुमच्या नावाची चर्चा होईल कार्यालयात जास्त काम पडेल. आर्थिक दृष्ट्या चांगला दिवस आहे. दिवस मध्यम.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Religion, Zodiac signs