आज दिनांक 29 नोव्हेंबर 2022. आज मंगळवार. मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी. आज चंपाषष्ठी आहे. चंद्र आज मकर राशीत भ्रमण करेल. चंद्र शनी योग बनेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
राशीच्या दशम स्थानात चंद्र शनी असून गडबडीचा दिवस आहे. अनेक आर्थिक लाभ होतील. घरात काही आनंदी घटना घडतील. पाहुणे येतील. प्रवास घडतील. दिवस शुभ.
वृषभ
आज चंद्र मानसिक आणि आर्थिक स्थैर्य देईल. कुटुंबात तुमच्या मनासारख्या घटना घडतील. जोडीदारासोबत खरेदी होईल. प्रवास घडेल. मन आनंदी राहिल. दिवस उत्तम.
मिथुन
अष्टम स्थानातील चंद्र भ्रमण काहीसे खर्चिक पण कौटुंबिक सुखाचे राहिल. गुरू शुभ फळ देईल. संततीकडे विशेष लक्ष द्या. जोडीदाराला शुभ काळ. दिवस शुभ.
कर्क
आज सप्तम स्थानातून होणारे चंद्र भ्रमण प्रतिष्ठा देणारे आहे. सप्तमात शनी कुरबुरी सुरू ठेवेल. खर्च करावा लागेल. रवी बुध प्रवास योग आणतील. दिवस शुभ आहे.
सिंह
षष्ठ स्थानातून होणारे चंद्र भ्रमण आर्थिक, मानसिक आरोग्यासाठी मध्यम आहे. जोडीदाराला कष्ट राहील. खरेदी कराल. शुक्र लाभ देईल. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम.
कन्या
आज पंचम स्थानातील चंद्र भ्रमण शुभ असून मित्र भेट होईल. जास्तीचे काम पडेल. खर्च होण्याचे संकेत. प्रवास योग, संपर्क होतील. प्रकृती सांभाळा. दिवस चांगला आहे.
तूळ
कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या घटना घडतील. जास्त जबाबदारी घेऊ नका. घरामध्ये संततीशी काही विषयात मतभेद असतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे.
वृश्चिक
दुपारनंतर तृतीय स्थानातील चंद्र त्रासदायक अनुभव देईल. तुमची प्रकृती ठिक नसेल. खर्च होईल पण आर्थिक लाभ देखील उत्तम राहिल. दिवस बरा आहे.
धनु
आज चंद्र भ्रमण आणि शनी प्रवासाचे संकेत देत आहेत. वाहन योग येईल. आर्थिकदृष्ट्या काळ बरा आहे. जोडीदार आनंदी राहिल. प्रकृती जपावी. दिवस मध्यम.
मकर
आजचा दिवस कुटुंबीयांसोबत शांतपणे घालवा. त्यांना वेळ द्या. आर्थिक लाभ होतील. मात्र राशीत शनी चंद्र आहे. कार्यक्षेत्रात काळजी घ्या. खर्च जपून करा. दिवस उत्तम.
कुंभ
आज आरोग्यास त्रासदायक दिवस राहणार आहे. चंद्र पंचम स्थानात असून जोडीदाराची प्रकृती नाजूक, आर्थिकदृष्ट्या जपून राहण्याचा काळ आहे. प्रवास कराल. दिवस मध्यम जाईल.
मीन
आज कौटुंबिक जीवन आणि संतती याला महत्त्व असेल. गुरू धार्मिक कारणांसाठी खर्च करेल. प्रवास योग येतील. भावंडं भेट होईल. आज दिवस शुभ असून गुरूची उपासना करावी.
शुभम भवतू!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs