आज दिनांक 28 नोव्हेंबर 2022. वार सोमवार. आज आहे मार्गशीर्ष शुक्ल पंचमी. आज चंद्र मकर राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
राशीच्या दशम स्थानात चंद्र व्यावसायिक क्षेत्रात आस्था निर्माण करेल. कुटुंबात मतभेद होऊ देऊ नका. अष्टम स्थानात आलेला शुक्र बुध योग आर्थिक घडामोडी करेल. दिवस शुभ.
वृषभ
नवम स्थानात शनी कार्यक्षेत्रात एखाद्या व्यक्तीमुळे मनस्ताप दाखवत आहे. एक प्रकारचा अडथळा प्रत्येक कामात येईल. प्रवास योग येतील. चंद्र शनी गृहसौख्यात अडथळा आणेल. दिवस बरा.
मिथुन
मिथुन लग्न आणि रास असलेल्या व्यक्तींनी दशम गुरूचा उत्तम काळ अनुभवावा. मंगळ जोरदार कार्य शक्ती देईल. शुक्र मध्यम आहे. सूर्य शुक्र बुध योग दूर दृष्टी देईल. अष्टम चंद्र शनी मानसिक क्लेश देतील. दिवस उत्तम.
कर्क
राशीच्या सप्तमात शनी चंद्र वैवाहिक जीवनात कष्ट देईल. प्रकृती सांभाळा. कामाची जबाबदारी वाढेल. आर्थिक, सामाजिक लाभ मिळेल. दिवस चांगला.
सिंह
आजचे चंद्र भ्रमण षष्ठ स्थानात आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. काळ सावधगिरीने राहण्याचा आहे. आर्थिक भरभराट होईल. घराकडे विशेष लक्ष द्या. मध्यम दिवस.
कन्या
पंचम स्थानात होणारे चंद्र भ्रमण कौटुंबिक आणि सामाजिक लाभ असे संकेत देत आहे. अष्टमात राहू आहे. स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी. तृतीय स्थानात शुक्र शुभ घटनांची सुरुवात करेल. दिवस उत्तम.
तूळ
गृह कलह, घरात मोठ्या दुरुस्त्या, खर्च असा हा काळ आहे. आर्थिक व्यय होईल. जोडीदाराच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. व्यय शुक्र खर्च वाढ करेल. दिवस आनंदी राहिल.
वृश्चिक
संतती तुमच्यावर नाराज होइल. त्यांना काही समस्या येतील. भावंडांशी बोलण्यातून गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. प्रवास टाळा. आर्थिक नुकसान होतील. दिवस मध्यम.
धनु
चंद्र आज उत्कृष्ट फळ देईल. मात्र शनी आर्थिकदृष्ट्या सांभाळून राहावं असं सांगत आहे. नोकरीमध्ये बाढतीचे योग. कुटुंबात काही समस्या निर्माण होतील. सावध राहा. दिवस बरा.
मकर
सर्वार्थाने जागरूक राहण्याचा काळ आहे. मंगळ, चतुर्थ राहू कुठल्याही कामात अडथळे आणतील. भांडणतंटा होऊ नये म्हणून सावध रहा. प्रवास योग येतील. वैवाहिक जीवन बरे राहिल. दिवस मध्यम.
कुंभ
राशीच्या व्यय स्थानात चंद्र शनी म्हणजे परदेश गमन, खर्च, वैवाहिक जीवनात ताण राहिल. दवाखान्याची भेट संभवते. तृतीय राहू महत्त्वाचे निरोप आणेल. दिवस उत्तम.
मीन
शनी चंद्र नुकसानीपासून सावध रहा असं सांगत आहे. संतान चिंता वाटेल राशीतील गुरू अचानक आर्थिक लाभ देतील. मन धार्मिक क्षेत्राकडे झुकेल. दिवस शुभ.
शुभम भवतू.!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs