मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : आज अमावस्या, सांभाळूनच राहा! कुणी काय काळजी घ्यावी राशीनुसार पाहा

दैनंदिन राशिभविष्य : आज अमावस्या, सांभाळूनच राहा! कुणी काय काळजी घ्यावी राशीनुसार पाहा

23 नोव्हेंबर 2022 रोजीचं राशिभविष्य.

23 नोव्हेंबर 2022 रोजीचं राशिभविष्य.

6 वाजून 53 मिनिटांनी अमावस्या आरंभ होईल. उत्तररात्री अमावस्या संपेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

आज दिनांक 23 नोव्हेंबर 2022. वार बुधवार. कार्तिक कृष्ण चतुर्दशी /अमावस्या. 6 वाजून 53 मिनिटांनी अमावस्या आरंभ होईल. उत्तररात्री अमावस्या संपेल. आज चंद्र विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. पाहूया आजचे राशी भविष्य.

मेष

सप्तम स्थानात चंद्राची उपस्थिती जोडीदाराची काळजी घ्या असं सुचवत आहे. मन संभ्रमित राहील. अमावस्या काहीशी नकारात्मक घटना घडवील. आर्थिक व्यवहार जपून करा. दिवस मध्यम.

वृषभ

घरामध्ये विशिष्ट घटना घडतील. नवीन खरेदीचे योग आहेत. कार्यालयीन कामकाज सुरळीत राहील. घरामध्ये जास्ती जबाबदारी वाढेल. प्रकृती जपा. अमावस्या काळजी पूर्वक घालवा.

मिथुन

अष्टम शनी आणि अमावस्या काहीशा त्रासदायक घटना घडवेल. गुरू बल निभावून नेईल. राशीत मंगळ आहे. तपासण्या कराव्या लागतील. नवीन वास्तू, वाहन सुख मिळेल. धार्मिक बाबीत रुची निर्माण होईल. दिवस शुभ.

कर्क

चंद्र आणि राशी समोरील शनी सावधगिरीने वागण्याचे संकेत देत आहे. मानसिकदृष्ट्या थोडी उभारी देणारा दिवस आहे. प्रकृती जपा. शांत राहून ईश्वराची उपासना करा. दिवस बरा आहे.

सिंह

वृश्चिक राशीत ग्रहांची गर्दी विशेष घडामोडींची सूचक आहे. कुटुंबासाठी खरेदी होईल. संतती खुश राहील. अमावस्या गृह चिंता निर्माण करेल. दिवस मध्यम आहे.

कन्या

तृतीय स्थानातील ग्रहांचे आधिक्य मानसिक आणि आर्थिक जीवनात यश आणि प्रतिष्ठा मिळवून देतील. अष्टम राहू चंद्र आहे. प्रकृतीकडे लक्ष द्या. प्रवास टाळा. जास्त दगदग करू नका. दिवस बरा.

तूळ

नवम मंगळ आणि राशीतील केतू योग करीत आहेत. एक प्रकारच्या मानसिक वैराग्याची अनुभूती येईल. जोडीदार आनंदी राहील. लाभ होतील. अमावस्या आर्थिकदृष्ट्या सावध राहण्याची. दिवस मध्यम.

वृश्चिक

चंद्र कार्यालयीन मित्र मंडळींशी गाठभेट घडवून आणेल. षष्ठ स्थानातील राहू प्रकृतिविषयी चिंता देईल. जोडीदाराशी मतभेद कमी होतील. अमावस्येचा नकारात्मक प्रभाव जाणवेल. घरात दिवस शांततेत घालवा.

धनु

आज व्यय चंद्र प्रवासाचे योग आणेल. जपून रहा. संपर्क आणि सामाजिक जीवनात यश मिळेल. सप्तम स्थानातील मंगळ शत्रूंचा बीमोड करेल. जोडीदाराशी प्रेमाने वागा. दिवस मध्यम आहे.

मकर

राशीच्या लाभ स्थानात चंद्र मित्र भेट करेल. शनी मानसिक ताण निर्माण करेल. लाभ स्थानातील शुक्र नवीन संधी मिळवून देईल. फायदा घ्या. दिवस उत्तम.

कुंभ

तृतीय राहू आणि व्यय शनी जपून राहण्याचे संकेत देत आहे. भाग्यातील ग्रहांचे आधिक्य प्रवास आणि प्रकृती स्वास्थ्य असे फळ देईल. प्रवासात जपा. दिवस शुभ.

मीन

अष्टम स्थानातील चंद्र आणि राहु आर्थिक घडामोडी करतील. शुक्र जोडीदारा साठी खरेदी विशेष खर्च दाखवीत आहे. प्रकृती जपून रहा. राशीतील गुरू अध्यात्मिक उन्नती देईल. दिवस उत्तम आहे.

शुभम भवतू !!

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs