मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

कार्तिक महिन्यातील आजच्या दिवसाला आहे विशेष महत्त्व; तुमच्यासाठी कसा जाईल पाहा राशिभविष्य

कार्तिक महिन्यातील आजच्या दिवसाला आहे विशेष महत्त्व; तुमच्यासाठी कसा जाईल पाहा राशिभविष्य

राशिभविष्य

राशिभविष्य

आज कार्तिक वद्य त्रयोदशी. कार्तिक महिन्यातील या दिवसाचे फार महत्त्व असून आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव साजरा होतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

आज दिनांक 22 नोव्हेंबर 2022. वार मंगळवार. आज कार्तिक वद्य त्रयोदशी. कार्तिक महिन्यातील या दिवसाचे फार महत्त्व असून आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव साजरा होतो. चंद्राचे भ्रमण आज तुला राशीत राहील. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज सप्तम चंद्र कौटुंबिक कामासाठी जोडीने प्रवास घडवून आणेल. शुभ गुरूचे गोचर आनंद देईल. आर्थिक लाभ संभवतो. संतती आनंदी राहील. कौटुंबिक समारंभ होतील. दिवस शुभ.

वृषभ

आज षष्ठ स्थानातील चंद्र कार्यालयात, कुटुंबासाठी काही विशेष घडामोडी घडवेल. धार्मिक समारंभात भाग घ्याल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक दृष्ट्या उत्तम दिवस.

मिथुन

राशीच्या पंचम स्थानातील चंद्र मंगळाशी नवपंचम योग करीत आहे. समृद्धी आणि सुखद अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. संतती साठी खर्च वाढेल. आनंददायी दिवस चांगला जाईल.

कर्क

चतुर्थ स्थानात चंद्र काही विशेष अनुभव देईल. आर्थिक बाजू उत्तम राहील. मन स्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. प्रकृती मध्यम राहील. घरामध्ये जबाबदारी वाढेल. दिवस चांगला जाईल.

सिंह

आज चंद्र मंगळ योग आहे. आर्थिक लाभ झाल्यामुळे आनंदी राहाल. तसेच कुटुंबसुख लाभेल. जोडीदाराला वेळ द्या. व्यवसायासाठी प्रवास घडेल. आर्थिक आणि कौटुंबिक दृष्ट्या दिवस शुभ.

कन्या

आज चंद्र धन स्थानात आहे. तुमच्यावर कुटुंबाच्या बाबत निर्णय घेण्याची वेळ येईल. सामाजिक जीवनात प्रसिद्धीच्या झोतात याल. गुरू जोडीदाराची मदत करेल. आर्थिक लाभ होतील. दिवस शुभ.

तूळ

आज राशीतील चंद्र उच्च फळ देण्यास सज्ज आहे. गृह आणि धार्मिक क्षेत्रात यश मिळेल. प्रकृती ठीक राहील. खर्च होतील. संततीसाठी दिवस शुभ.

वृश्चिक

आज घरात आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृतीसंबंधी चांगले फळ देईल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. खर्च होतील. भावंडं भेट होईल. दिवस शुभ आहे.

धनु

आज जीवनातील एक चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. अचानक आर्थिक लाभ होतील. मित्र भेट होईल. गुरू घरामध्ये शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल.

मकर

चंद्र दशम स्थानात आहे. काही प्रकृतीचे त्रास, आर्थिक चिंता असतील तर आज कमी होतील. आनंद निर्माण होईल. कुटुंबाकडे लक्ष द्या. कार्यालयीन कामकाज वाढेल. नातेवाईक भेट संभवते. उत्तम दिवस.

कुंभ

चंद्र मंगळ योग आज सांभाळून दिवस घालवा असे सुचवत आहे. संततीकडे लक्ष द्या. खर्च टाळा. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. घरामध्ये विशेष घटना घडतील. दिवस शुभ.

मीन

आज चंद्र आर्थिकदृष्ट्या घडामोडी घडवेल. व्यय होईल. घरामध्ये काही त्रासदायक घटना घडतील. प्रकृती जपा. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल. दिवस शुभ आहे.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya