मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत; पाहुयात आजचे बारा राशींचे भविष्य

आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत; पाहुयात आजचे बारा राशींचे भविष्य

 आज मार्गशीर्ष मास कृष्ण द्वितीया

आज मार्गशीर्ष मास कृष्ण द्वितीया

आज मार्गशीर्ष मास कृष्ण द्वितीया

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक १० डिसेंबर २०२२. शनिवार . आज मार्गशीर्ष मास कृष्ण द्वितीया असून आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज चंद्र तृतीय स्थानात असून मानसिक अस्थिरता निर्माण होईल. तृतीय स्थानातील चंद्र प्रवासात काळजी घ्या असे सुचवीत आहे. आर्थिक लाभ होतील. शुभ दिवस.

वृषभ

द्वितीय स्थानात चंद्र आज शुभ वार्ता देईल. थोडी दगदग होईल. गृह सौख्य मिळेल .मित्र मैत्रीणीना भेटण्याचा, सामाजिक जीवनात जोडीदाराच्या सोबत आनंद घेण्याचा उत्तम दिवस आहे.

मिथुन

कार्यक्षेत्रातील वाढती जबाबदारी तुम्हाला फलदायी ठरेल .जोडीदाराशी संबंध सुधारतील. आर्थिक घडामोडी होतील. आज काही महत्वाच्या भेटी होण्याची शक्यता आहे . दिवस शुभ.

कर्क

व्यय स्थानात चंद्र असून कौटुंबिक गोष्टीत मन रमेल .संतती संबंधी शुभ काळ. लाभ स्थानात मंगळ आहे , काहीसा तणाव वाटेल. प्रवास होतील. आर्थिक लाभ होतील. एकूण दिवस समाधानात जाईल.

सिंह

आज चंद्राचा दिवसावर अनुकूल प्रभाव पडेल .फार ताण घेऊ नका. कार्यालयात जास्तीचे काम पडेल. कुटुंबीय भेटतील . आर्थिक दृष्ट्या दिवस उत्तम जाईल.

कन्या

दशम स्थानातील चंद्र कामात वाढ करेल. खरेदी साठी बाहेर जाण्याचं ठरेल. खर्च होईल. प्रवास योग येईल. घरगुती कार्यक्रम होईल. आनंद आणि उत्साहात दिवस पार पडेल.

तूळ

आज चंद्र उत्तम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. ,शिक्षण आणि कार्य क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आर्थिक लाभ होतील. संततीसाठी भाग्य दायक योग. दिवस चांगला.

वृश्चिक

जोडीदारा साठी काही तरी विशेष करण्याचा दिवस आहे. सामाजिक जीवनात यश मिळेल. भाग्य उदयास येईल. आर्थिक लाभ होतील . व्यावसायिक शिक्षणासाठी काही खर्च होईल. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस.

धनु

आज कार्यक्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. सप्तम स्थानातील चंद्र घरगुती बाबीत ,जोडीदार रा करता खर्च देईल. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. वैवाहिक जीवनात विशेष काळजी घ्या. दिवस शुभ.

मकर

घरामध्ये काही नवीन घटना, महत्वाचे फोन असा हा दिवस आहे. आर्थिक व्यय होतील. संतती सोबत मजेत एकत्र दिवस घालवा. मार्गी शनि स्थैर्य देईल .दिवस मध्यम.

कुंभ

आर्थिक लाभ करून देणारा दिवस आहे. चंद्र भ्रमण सर्व बाजूने मदत करेल. काही कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. संततीला वेळ द्या. कार्यक्षेत्रात यश. प्रकृती जपा. दिवस शुभ.

मीन

चतुर्थ स्थानातील चंद्र मनःस्वास्थ्य देईल .शुभ घटना घडतील. मात्र दिवस एकूण खूप गडबडीत जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. प्रवास होतील. उत्तम असा दिवस आहे.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion