मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

प्रवास योग आहे पण प्रकृतीला जपा; तुमचा आजचा दिवस कसा, पाहा राशिभविष्य

प्रवास योग आहे पण प्रकृतीला जपा; तुमचा आजचा दिवस कसा, पाहा राशिभविष्य

राशिभविष्य (सौजन्य- Canva)

राशिभविष्य (सौजन्य- Canva)

आज मार्गशीर्ष शुक्ल द्वादशी. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

आज दिनांक 05 डिसेंबर 2022. वार सोमवार. आज मार्गशीर्ष शुक्ल द्वादशी. चंद्र आज मेष राशीत भ्रमण करीत असून चंद्र राहू योग बनत आहे. पाहूया आजचे राशी भविष्य.

मेष

राशी स्थानात आलेला चंद्र अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण करेल. गृहसौख्य मिळेल. मेहनत करून यश प्राप्त होईल. भाग्यातील शुक्र आज विशेष खरेदीचे योग आणणार आहे. बरा दिवस.

वृषभ

व्यय स्थानात आलेला राहू चंद्र शरीर कष्ट देणारा असून राशीतील मंगळ अनेक खर्च व अडचणी देईल. स्वभावात तेज येईल. व्यवसायात त्रास होईल. मात्र गुरूचे पाठबळ मिळेल. दिवस मध्यम.

मिथुन

गुरू दशम स्थानात असून कार्य सिद्धी करण्यास मदत करेल. प्रवास, भेटीगाठी होतील. चंद्र लाभ स्थानात आहे. अचानक घरामध्ये काम वाढेल. आर्थिक व्यय होण्याचे संकेत आहेत. प्रकृती जपा. दिवस चांगला.

कर्क

चंद्र दशम स्थानात सप्तम शनी जपून राहा असे संकेत देत आहे. आर्थिक नुकसान व कार्यालयात विशेष घटना घडतील. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. दिवस उत्तम आहे.

सिंह

राशीच्या व्यक्तींचा अधिकारी व्यक्तीसोबत मतभेद होण्याचे संकेत आहेत. जपून रहा. मित्र मंडळीपासून अनेक लाभ होतील. प्रकृती जपा. भाग्य चंद्र, रवी बुध अधिकार प्राप्ती करून देतील. दिवस उत्तम.

कन्या

पंचम शनी आणि अष्टम चंद्र राहू एकूण मध्यम फळ देतील. संतती चिंता वाटेल. आर्थिक नुकसान संभवते. डोळ्यांची काळजी घ्या. एकूण थोडी निराशा वाटेल. पण फारसा त्रास करून घेऊ नका. दिवस मध्यम.

तूळ

आज चंद्र राहू सप्तम स्थानात असून भाग्य साथ देईल. अचानक कुठून तरी चांगली बातमी मिळेल. खर्च होईल व्यवसाय आणि वैवाहिक जीवनासाठी मध्यम दिवस आहे.

वृश्चिक

आज दिवस मध्यम आहे. गृह सौख्य, जोडीदार, संतती याबाबत मिश्र फळ देईल. मित्र भेट घडवेल. प्रकृतीची काळजी घ्या. आर्थिक गणित बिघडू शकते. दिवस मध्यम आहे.

धनु

द्वितीय स्थानात शनि कुटुंबात मतभेद घडवून आणेल. लांबचे प्रवास योग येतील . साहसी स्वभाव होईल. संतती चिंता लागून राहिल. संयम बाळगा. दिवस मध्यम.

मकर

आता जरा शांतता आणि स्थैर्य मिळेल. राहू चंद्र मेष राशीत असून घरामध्ये काही काळजी राहील. कौटुंबिक समारंभ होतील. वैवाहिक सुख मिळेल. दिवस उत्तम.

कुंभ

व्यय स्थाना मध्ये शनी आहे. अचानक स्वभावात बदल होईल. प्रवास योग येतील. कार्य करण्याची इच्छा होईल. रवी बुध कार्य घडवून आणेल. आर्थिक घडामोडी होतील. दिवस मध्यम आहे.

मीन

द्वितीय स्थानात चंद्र राहू आणि राशीतील गुरू अशी ग्रहस्थिती कौटुंबिक गैरसमज दाखवत आहे. आज घरात शांत रहा. जास्तीची काम येतील. आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs