आज दिनांक 03 डिसेंबर 2022. वार शनिवार. आज मार्गशीर्ष एकादशी. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीतून होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
कौटुंबिक जीवन थोडे तणाव पूर्ण राहिल. दिवसाचा काही काळ हा उपासनेत घालवाल. राशीतील राहू मानसिक अस्वास्थ्य देईल. आर्थिक आणि व्यवसाय वृद्धी संभवते. भाग्यकारक दिवस चांगला जाईल.
वृषभ
आर्थिक बाबतीतली गणित वादग्रस्त ठरतील. काही निर्णय घेण्याची गरज पडेल. घरामध्ये कामाची जबाबदारी वाटेल. लाभ स्थानातील चंद्र गृह सौख्य देईल. दिवस चांगला आहे.
मिथुन
चंद्राचे भ्रमण मित्र भेट आणि प्रवासात लाभ देईल. कार्यक्षेत्रात भरपूर काम राहिल. आर्थिक प्राप्ती होईल. संतती आनंदी राहिल. जोडीदाराला मानसिक ताण संभवतो. दिवस बरा.
कर्क
तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नसल्या तरी फारसे त्रास देणारे ग्रहमान नाही. कार्यालयात जबाबदारी निर्माण होईल. गुरूची साथ आहे. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम जाईल.
सिंह
भाग्य स्थानातील राहू, सप्तम चंद्र आणि गुरू अष्टमात ही ग्रहस्थिती तणाव निर्माण करेल. प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. मात्र सामाजिक क्षेत्रात लाभ देईल. दिवस चांगला.
कन्या
आज तुमच्यावर घरातील व्यक्तीना सांभाळण्याची जबाबदारी येईल. षष्ठ चंद्र खर्च करायला लावेल. मित्र भेट संभवते. व्यावसायिक दृष्ट्या बरा दिवस. प्रकृती बरी राहिल. दिवस उत्तम.
तूळ
काही लाभ घेऊनच आजचा दिवस उगवेल. जास्तीचे काम करण्याचा, प्रवास, भेटीगाठीचा दिवस आहे. धार्मिक स्थळांना भेट द्यावी, अशी इच्छा होईल. दिवस शुभ.
वृश्चिक
दिवस आज आनंदात घालवण्याचा आहे. आर्थिक लाभ संभवतात. जोडीदाराची काळजी घ्या. सहजीवन संथ राहिल. व्यवसाय धंद्यात प्रगती होईल. प्रवास टाळा. दिवस उत्तम आहे.
धनु
आज चंद्र कौटुंबिक सुखामध्ये गोडी निर्माण करेल. मानसिक ताण कमी होईल. घराकडे लक्ष द्या. कामाची गडबड राहिल. दिवस काही विशेष अनुभव देईल.
मकर
घरात काही अडचण असेल तर मदत करावी लागेल. कार्यालयात जास्तीचे काम येईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक लाभ, प्रवास होतील. तसंच हितशत्रूपासून सावध राहा. दिवस मध्यम.
कुंभ
कुटुंबासोबत आनंदाने घालवण्याचा दिवस आहे. वैवाहिक जीवनात भरघोस यश देईल. वाचनात मन रमेल. भाग्यकारक गुरू यशाचा मार्ग दाखवेल. आर्थिक लाभ होतील. दिवस शुभ.
मीन
आज घरातील कामे पार पाडून तुम्ही थकून जाल. आर्थिक लाभ, काही खरेदी असा हा दिवस आहे. नातेवाईक भेट संभवते. संतती आनंदी राहिल. दिवस मध्यम.
शुभम भवतू!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs