आज दिनांक 2 डिसेंबर 2022. शुक्रवार तिथी कार्तिक वद्य अष्टमी. कालाष्टमी. आज चंद्र उत्तर भाद्रपद नक्षत्रातून भ्रमण करेल. सूर्य वृश्चिक राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
राशीतील राहू जपून आचरण करा असे सांगत आहेत. चंद्र लाभ स्थानात आहे. कार्यक्षेत्रात मोठी कामगिरी होईल. गुरू देखील व्ययात आहे. धार्मिक कामासाठी वेळ द्यावा लागेल. दिवस मध्यम.
वृषभ
दशम चंद्र तुम्हाला व जोडीदाराला भरभराट देईल. स्वतः वर खर्च कराल. घरासाठी चैनीच्या वस्तू खरेदी कराल. धार्मिक कामासाठी वेळ द्याल. प्रवास होतील. दिवस उत्तम आहे.
मिथुन
भाग्य स्थानात गुरू आर्थिक आणि मानसिक लाभ देईल. जोडीदाराशी काही तरी कुरबुर होईल. व्यवसाय वृद्धीचे संकेत आहेत. प्रकृती ठीक राहील. दिवस शुभ.
कर्क
आज दिवस कुटुंबीयांसोबत, संततीसोबत घालवा. जोडीदाराला वेळ द्या. काही आर्थिक प्रश्न सोडवावे लागतील. धार्मिक आस्था वाढीस लागेल. दिवस उत्तम आहे.
सिंह
चंद्र सामाजिक क्षेत्रात नाव करील. काही चिंता असेल तर ती दूर होईल. घरामध्ये समारंभ होतील. नोकरीसाठी उत्तम काल. जोडीदार आनंदी राहील. दिवस मध्यम.
कन्या
आज दिवस खूप काही नवीन घटना घेऊन येईल. थोडी हुरहूर मनात राहील. चंद्र कामाचा ताण देईल. घरामध्ये काही नवीन बदल कराल. जोडीदारसोबत खरेदी होईल. दिवस मध्यम आहे.
तूळ
आज दिवस संपर्क, प्रवास घडवून आणेल. घराचे सुख मिळेल. सूर्य बुध शुक्र काही विशेष अनुभव देईल. कार्यक्षेत्रात यश मिळेल. आर्थिक लाभ संभवतात. दिवस उत्तम.
वृश्चिक
आज घरगुती प्रश्नांचा निकाल लागेल. वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण होईल. प्रकृतीची काळजी घ्या. जास्त दगदग करू नका. आर्थिक लाभ होतील. प्रवास योग आहेत. दिवस चांगला.
धनु
आज तृतीय स्थानात चंद्र कुटुंबात ताण निर्माण करेल. आर्थिक देणे घेणे होईल. नातेवाईक भेट होण्याचे संकेत आहेत. प्रकृती जपा. वैवाहिक जीवनात कलह होईल. दिवस मध्यम.
मकर
आजचा दिवस हा घर आणि कुटुंब यांना वेळ देण्याचा आहे. बंधुभेट होईल. मग चंद्र प्रतियोग करीत आहेत. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शैक्षणिक बाजू ठिक राहिल. दिवस मध्यम आहे.
कुंभ
चंद्र घरात काही खास अनुभव देईल. आईवडील नाराज होणार नाहीत, याची काळजी घ्या. संतती नाखूष राहील. घरात जास्तीची कामं निघतील. आर्थिक घडामोडी घडतील. आनंदात दिवस जाईल.
मीन
आज कुठे तरी प्रवासाला जाण्याचा बेत ठरेल. संततीसाठी खर्च होईल. महत्त्वाचे निरोप मिळतील. राशीतील गुरू आणि मंगळ घराची प्राप्ती करून देतील. दिवस शुभ आहे.
शुभम भवतू!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya