मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : प्रकृतीला जपा! आरोग्यासाठी त्रासदायक ठरेल आजचा दिवस

दैनंदिन राशिभविष्य : प्रकृतीला जपा! आरोग्यासाठी त्रासदायक ठरेल आजचा दिवस

Horoscope 07 August 2022 : तुमच्या राशीनुसार आज तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

Horoscope 07 August 2022 : तुमच्या राशीनुसार आज तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

Horoscope 07 August 2022 : तुमच्या राशीनुसार आज तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

आज दिनांक 07 ऑगस्ट 2022 रविवार आज श्रावण शुक्ल दशमी. चंद्र आज वृश्चिक राशीत भ्रमण करेल. श्री गणरायाच्या चरणी वंदन करून पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य. मेष राशीच्या अष्टम स्थानात चंद्र असून प्रकृतीचे त्रास संभवतात. अनेक कष्ट होतील. घरात काही धार्मिक घटना घडतील. पाहुणे येतील. कामाच्या ठिकाणी नाव मिळेल. दिवस मध्यम. वृषभ आज सप्तम चंद्र मानसिक आणि आर्थिक स्थैर्य देईल. कुटुंबात तुमच्या मनासारख्या घटना घडतील. जोडीदारासोबत खरेदी होईल. प्रवास घडेल. मन आनंदी राहिल. दिवस उत्तम. मिथुन राशीच्या षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमण लाभ देणारे, कौटुंबिक सुखाचे राहिल. आर्थिक लाभ होतील. गुरू शुभ फळ देईल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस शुभ. कर्क आज पंचम स्थानातून होणारे चंद्र भ्रमण प्रतिष्ठा देणारे आहे. सप्तमात शनी कुरबुरी सुरू ठेवेल. खर्च करावा लागेल. रवी बुध मार्ग दाखवतील. दिवस मध्यम आहे. सिंह राशीच्या चतुर्थ स्थानातून होणारे चंद्र भ्रमण आर्थिक, मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. जोडीदार आनंदी राहिल. खरेदी कराल. शुक्र लाभ देईल. दिवस उत्तम. कन्या आज तृतीय स्थानातील चंद्र भ्रमण शुभ असून बंधू भेट होईल. जास्तीचे काम पडेल. खर्च होण्याचे संकेत. प्रवास योग, संपर्क होतील. प्रकृती सांभाळा. दिवस मध्यम आहे. तूळ  कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या घटना घडतील. जास्त जबाबदारी घेऊ नका. घरामध्ये संततीशी काही विषयात मतभेद असतील. आर्थिक व्यय होण्याची शक्यता आहे. दिवस मध्यम आहे. वृश्चिक राशी स्थानातील चंद्र सुखद अनुभव देईल. फार दिवसांनी तुमची प्रकृती ठिक असेल. खर्च होईल पण आर्थिक लाभ देखील उत्तम राहिल. दिवस बरा आहे. धनु आज चंद्र भ्रमण आणि शनी प्रवासाचे संकेत देत आहेत. वाहन योग येईल. आर्थिकदृष्ट्या काळ बरा आहे. जोडीदार आनंदी राहिल. दिवस मध्यम. मकर आजचा दिवस तुमच्या कुटुंबीयासमवेत शांतपणे घालवा. त्यांना वेळ द्या. आर्थिक लाभ होतील. कार्यक्षेत्रात काळजी घ्या. खर्च जपून करा. दिवस उत्तम. कुंभ आज आरोग्यास त्रासदायक दिवस राहणार आहे. मंगळ तृतीय स्थानात असून प्रकृती नाजूक, आर्थिकदृष्ट्या जपून राहण्याचा काळ आहे. प्रवास कराल. दिवस मध्यम जाईल. मीन आज कौटुंबिक जीवन आणि संतती याला महत्त्व असेल. गुरू धार्मिक कारणांसाठी खर्च करेल. आज दिवस मध्यम असून गुरूची उपासना करावी. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या