मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /जाणून घ्या कसा असेल दिवस? मिथुन आणि सिंहसाठी लाभदायक, वृषभ राशीने मात्र कामं पुढे ढकलावीत

जाणून घ्या कसा असेल दिवस? मिथुन आणि सिंहसाठी लाभदायक, वृषभ राशीने मात्र कामं पुढे ढकलावीत

नक्षत्रांच्या प्रभावामुळे काही राशींच्या अडचणी दूर होणार आहेत.

नक्षत्रांच्या प्रभावामुळे काही राशींच्या अडचणी दूर होणार आहेत.

Dainik Rashi Bhavishya: दैनिक राशी भविष्य पाहून आपला दिवस सुरू करा. कुणावर असेल ग्रहांची कृपा असेल? कोणाचं होणार नुकसान?

दिल्ली, 7 जून : आपला दिवस कसा जाणार ? जाणून घ्या. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे काही राशींच्या अडचणी दूर होणार आहेत. मिथुन आणि सिंह राशीला आजचा दिवस लाभदायक आहे. तर, वृषभ राशीने मात्र आपली कामं पुढे ढकलावीत.

राशिभविष्य

मेष

राशिस्थानी असलेला चंद्र आज द्विधा मनस्थिती करेल. राशी स्वामी मंगळाचे राश्यांतर कर्क राशीत झाले असुन माता, गृह या संदर्भात काळजी घ्यावी लाभ स्थानातील गुरु परिस्थिती नियंत्रणात ठेवेल  दिवस मध्यम असून 'ओम सोम सोमाय नम:'मंत्र  जप करावा.

वृषभ

राशीच्या  व्यय स्थानातील चंद्राचे भ्रमण आर्थिक किंवा स्वास्थ्य संबंधी अडचणी निर्माण करेल. खर्च सांभाळून करावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. राशिस्थानी असलेला राहु मन संभ्रमात टाकेल. दशमातील गुरु कार्य क्षेत्रात शुभ. दिवस साधारण  आहे.

मिथुन

राशीच्या लाभ स्थानातून होणारे चंद्र भ्रमण लाभदायक आहे. मंगळ नुकताच कर्क राशीत गेला आहे. त्यामुळे आर्थिक बाबी सांभाळा. भाग्यात गुरू शुभ असुन समस्या सोडविण्यासाठी मदत करेल .

दिवस शुभ आहे.

कर्क

आज चंद्राचे दशमातील भ्रमण कार्य क्षेत्रात कामाचा ताण वाढवेल. अष्टमात गुरू असल्याने प्रत्येक  काम काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. प्रकृती सांभाळा. ओम  अं.अंगारकाय नम: हा जप करावा. दिवस मध्यम आहे.

सिंह

आज चंद्र राशीच्या भाग्य स्थानात आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस  शुभ आहे. परंतु नुकतेच  व्यय स्थानात झालेले  मंगळाचे  भ्रमण काहीशी  शारीरिक, आर्थिक, अडचण  निर्माण करेल. सावधान असावे. गुरु च्या प्रभाव क्षेत्रात आहात. दिवस शुभ.

कन्या

चंद्राचे भ्रमण आज राशीच्या अष्टमात असुन मन अशांत, हुरहुर, प्रकृती  नाजुक राहिल.  कामात  अडथळे निर्माण होतील. फारशी महत्त्वाची कामे  आज टाळा. नामस्मरण करा . दिवस साधारण  आहे.

तुला

चंद्र आज राशीच्या सप्तम स्थानात विराजमान आहे. आपल्या  जोडीदाराच्या सोबत दिवस आनंदाने घालवा.जोडीने निर्णय  घ्या. दशमातील मंगल नवीन संधी देणारा आहे. काम  हीच पुजा. दिवस शुभ आहे.

वृश्चिक

आज षष्ठात असलेला चंद्र  प्रकृतीच्या  बारीक सारीक तक्रारी  निर्माण करेल.  सध्याचा काळ सांभाळून राहण्याचा आहे. मन शांत ठेवा. गुरू स्मरण करा. दिवस  फार अनुकूल नाही.

धनु

चंद्र आज राशीच्या पंचम स्थानात आहे. मुलांकडे आज खास लक्ष द्यावे लागेल. त्यांची प्रकृती, शिक्षण इकडे काही समस्या निर्माण  होऊ नये असे निर्णय घ्या. त्यांच्या सोबत  वेळ घालवा. अष्टमात झालेले मंगळाचे पदार्पण,पुढील काळ सावध असावे लागेल. दिवस शुभ आहे.

मकर

आज मकर राशीच्या लोकांनी स्वतः घराकडे विशेष लक्ष द्यावे. घरातील जास्तीची कामे  उरकून घ्यावी. राशीतील शनी महाराज मंगळा शी सम सप्तक योग करीत आहेत. जपुन रहा.शनी जप  सुरू ठेवा. दिवस  चांगला आहे.

कुंभ

चंद्र आज तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे. जवळच्या आप्त मित्रांचे फोन येतील. छोटासा  प्रवास  घडू शकतो. भाऊ  बहिणी भेटू शकतील. राशीतील  गुरू सहाय्य करेल.

दिवस अनुकूल  आहे.

मीन

राशीच्या धन स्थानातील चंद्राचे  भ्रमण शुभ आहे. आर्थिक घडामोडी  होतील. येणे वसुल होईल. मात्र गुरू जप करणे आवश्यक आहे. मुलांची काळजी घ्या. दिवस अनुकूल आहे.

हे होते आजचे बारा राशी  चे राशी भविष्य.

शुभम भवतु !

First published:

Tags: Rashibhavishya, Rashichark