मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Chanakya Niti: 'या' स्त्रियांना आपला पतीच वाटतो आपला शत्रू; सुखी वैवाहिक आयुष्यासाठी अवलंबा 'ही' चाणक्य नीती

Chanakya Niti: 'या' स्त्रियांना आपला पतीच वाटतो आपला शत्रू; सुखी वैवाहिक आयुष्यासाठी अवलंबा 'ही' चाणक्य नीती

थोर नीतीशास्त्रज्ञ चाणक्यानं (Chanakya niti) आयुष्याच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात अत्यंत उपयुक्त पडतील अशा गोष्टी सांगितल्या आहेत. अगदी राजकारणापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत चाणक्य नीति लागू पडते. अशाच पती-पत्नीच्या नात्याबद्दलही चाणक्यानं युक्तीच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 2 जुलै-   थोर नीतीशास्त्रज्ञ चाणक्यानं (Chanakya niti) आयुष्याच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात अत्यंत उपयुक्त पडतील अशा गोष्टी सांगितल्या आहेत. अगदी राजकारणापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत चाणक्य नीति लागू पडते. अशाच पती-पत्नीच्या नात्याबद्दलही चाणक्यानं युक्तीच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. याबद्दलच टीव्ही 9 भारतवर्षच्या वेबसाईटवर अधिक माहिती देण्यात आली आहे. पती-पत्नीचं नातं कसं असावं, कशावर आधारलेलं असावं, हे नातं टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल चाणक्यनं महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

1. पती-पत्नीच्या नात्यामध्ये (Husband-Wife Relation) दोघेही चारित्र्यवान असणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं चाणक्याचं म्हणणं आहे. यापैकी एकाचंही चारित्र्य वाईट असेल तर त्या नात्यात काहीही चांगलं उरत नाही. असं नातं पती-पत्नी दोघांसाठीही संपलेलं असतं. या नात्यात एकदा का विश्वासाला तडा गेला की, पुन्हा ते नातं पहिल्यासारखं कधीच होत नाही. अशा नात्यात कडवटपणा येतोच.

झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाच्या यशाचा पाया त्याच्या तारुण्यातच घातला जातो. या काळात जर त्याने चांगले आचरण, मेहनत आणि प्रामाणिकपणाने काम केलं तर आयुष्यभर यश त्याच्या पायांशी लोटांगण घेतं. तो खूप नाव कमावतो आणि अफाट संपत्तीचा मालक बनतो. तर तारुण्यात झालेल्या काही चुका त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. तो त्याच्या आयुष्यात काहीच करू शकत नाही आणि मग फक्त पश्चाताप त्याच्या हातात राहतो.

2. पत्नीचं चारित्र्य जर चांगलं नसेल आणि तिचे जर दुसऱ्या पुरुषासोबत संबंध असतील तर अशा पत्नीला आपलं लग्न एक ओझं वाटू लागतं. तिला तिचा पती आवडेनासा होतो. त्याची प्रत्येक गोष्ट तिला खटकू लागते. ती आपल्या नवऱ्यालाच शत्रू मानायला लागते. अशा नात्यावर वेळ खर्च करण्यात काहीही अर्थ नसतो. अशी पत्नी कधीही योग्य नसते, असं चाणक्याचं म्हणणं आहे.

(हे वाचा:Daily Horoscope : या राशीच्या व्यक्तींनी आर्थिक हानीपासून जपावे, मात्र तरीही काळजी नसावी! )

3. पती असो किंवा पत्नी कोणालाही एखादी वाईट सवय, व्यसन असेल किंवा वाईट संगतीत असेल तर त्याचे परिणाम दोघांवरही होतात. म्हणजेच पतीच्या चुकीची शिक्षा पत्नीला भोगावी लागते आणि पत्नीच्या चुकीचा परिणाम पतीला भोगावाच लागतो. त्यामुळे सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नी दोघांनीही आपल्या वाईट सवयी सोडणं गरजेचं आहे असं चाणक्य सांगतो.

4. पती-पत्नींमधील खासगी गोष्टी त्यांच्यापुरत्याच मर्यादित राहणं आवश्यक आहे. या गोष्टी दोघांनीही कोणाही तिसऱ्या व्यक्तीला सांगू नयेत. असं केल्यानं दोघांचा एकमेकांबद्दलचा विश्वास कमी होतो आणि दोघांमधली भांडणं वाढतात, अनेकदा ते अपमानाचंही कारण बनतं, असं चाणक्यचं म्हणणं आहे.

(हे वाचा:दैनंदिन राशिभविष्य : 'या' राशींच्या व्यक्तींनी जपून राहा; आज शनी त्रास देईल )

5. पती-पत्नी एकमेकांशी खोटं बोलत असतील तर हळूहळू त्यांचं नातं पोकळ होऊ लागतं. एकमेकांवरचा विश्वास संपला, एकमेकांपासून सत्य लपवू लागले तर पती-पत्नीच्या नात्यात मग काहीच उरत नाही. त्यामुळेच आपल्या जोडीदाराप्रति प्रामणिक असणं अत्यंत आवश्यक आहे, असं चाणक्यनं सांगितलं आहे.

आर्य चाणक्याने सांगितलेल्या गोष्टी सांभाळून संसार केला तर तो नक्कीच चांगला होऊ शकतो. बंधनं पाळणं हेच संसाराच्या यशस्वीतेचं रहस्य आहे त्यामुळे ती पती आणि पत्नी दोघांनीही पाळायला हवीत.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle