मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

या लोकांवर असते भगवान शंकराची कृपा; तुमच्याही तळहातावर ही चिन्ह आहेत का?

या लोकांवर असते भगवान शंकराची कृपा; तुमच्याही तळहातावर ही चिन्ह आहेत का?

ज्या व्यक्तींच्या हातावर अशी शुभचिन्हं असतात त्यांना करिअर, सुख, प्रेमात चांगलं यश मिळतं. मानसन्मान मिळतात. तसंच त्यांच्यावर भगवान शंकराची कृपा कायम राहते, असं हस्तसामुद्रिक शास्त्राच्या अभ्यासकांचं मत आहे.

नवी दिल्ली, 15 जुलै : जीवनात भरपूर यश, पैसा, प्रसिद्धी मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेक मार्गांनी प्रयत्न करून किंवा परिश्रम करूनही प्रत्येकाला या गोष्टी साध्य होतातच असं नाही. एखादी व्यक्ती जीवनात किती प्रमाणात यशस्वी होणार आहे, धनलाभ, प्रसिद्धीचे योग कसे आहेत, या गोष्टी हस्तसामुद्रिक शास्त्राच्या (Palmistry) माध्यमातून जाणून घेऊ शकतात. हातावरच्या रेषा, चेहरा, डोळे, कानाची ठेवण आणि तीळ या गोष्टींवरून भविष्यातल्या (Future) गोष्टींचा अंदाज घेता येतो, असं हस्तसामुद्रिक शास्त्राचे अभ्यासक सांगतात.

या शास्त्रानुसार, हातावर काही खास चिन्हं असणं भाग्यशाली (Lucky) मानलं जातं. ही चिन्हं असणाऱ्या व्यक्तीवर भगवान शंकराची विशेष कृपा असते. या चिन्हांमध्ये अर्धचंद्र, ध्वज, त्रिशूळ या चिन्हांचा समावेश आहे. ही चिन्हं हातावर असणं खूप शुभफलदायी मानलं गेलं आहे, असं हस्तसामुद्रिक शास्त्राचे जाणकार सांगतात. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

एखाद्या व्यक्तीच्या हातावर विशेष शुभ चिन्हं असतील, तर अशी व्यक्ती प्रत्येक संकटाचा धीरानं सामना करणारी, ध्येय साध्य करणारी असते. अशा व्यक्तीला जीवनात यश, प्रेम, मानसन्मान, प्रसिद्धी मिळते. विशेष म्हणजे हातावर शुभ चिन्हं असलेल्या व्यक्तीवर भगवान शंकराची (Lord Shiva) कृपादृष्टी असते.

हातावर त्रिशूळ (Trident) चिन्ह असणं खूप शुभदायी मानलं जातं. हातावरची मस्तिष्क रेषा किंवा भाग्य रेषेवर त्रिशूळ चिन्ह असलेल्या व्यक्ती जीवनात खूप यश, मानसन्मान मिळवतात. मोठं पद मिळवतात. भरपूर संपत्ती आणि सर्व प्रकारचं सुख या व्यक्तींना मिळतं. या व्यक्ती मोठे नेते किंवा प्रभावशाली व्यक्ती बनतात. या व्यक्तींवर आयुष्यभर भगवान शंकराची कृपादृष्टी राहते.

ज्या व्यक्तींच्या हातावर ध्वज (Flag) चिन्ह असतं, अशा व्यक्तींवर भगवान शंकराची विशेष कृपा असते. या व्यक्तींना जीवनात सुख आणि प्रसिद्धी मिळते. या व्यक्ती मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असतात. कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाहीत. प्रत्येक परिस्थितीचा धैर्यानं मुकाबला करतात.

ज्या व्यक्तींच्या हातावर अर्धचंद्राचं (Half Moon) चिन्ह असतं, त्यांच्यावर भगवान शंकर विशेष प्रसन्न असतात. शंकराच्या डोक्यावर चंद्र असतो. चंद्र मन आणि शीतलतेचा कारक आहे. यामुळे अशा व्यक्तींना जीवनात भरपूर प्रेम आणि वैवाहिक सुख चांगलं मिळतं. या व्यक्ती मानसिकदृष्ट्या मजबूत असतात.

ज्या व्यक्तींच्या हातावर अशी शुभचिन्हं असतात त्यांना करिअर, सुख, प्रेमात चांगलं यश मिळतं. मानसन्मान मिळतात. तसंच त्यांच्यावर भगवान शंकराची कृपा कायम राहते, असं हस्तसामुद्रिक शास्त्राच्या अभ्यासकांचं मत आहे.

First published: