मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

अनुराधा नक्षत्रात जुळलाय दुर्मीळ ग्रहयोग; या तीन राशींचं नशीब पालटणार

अनुराधा नक्षत्रात जुळलाय दुर्मीळ ग्रहयोग; या तीन राशींचं नशीब पालटणार

राशीचक्र अपडेट

राशीचक्र अपडेट

मंगळ स्वामी असलेल्या वृश्चिक राशीतील अनुराधा हे नक्षत्र विशेष मानलं जातं. पृथ्वी तत्त्वाच्या अनुराधा नक्षत्राचा स्वामी शनी आहे. त्यामुळे या नक्षत्रात होणाऱ्या रवी, शुक्र आणि बुध या तीन ग्रहांच्या युतीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 नोव्हेंबर : ज्योतिषशास्त्रात भविष्य कथनावेळी नवग्रह, राशी आणि नक्षत्र हे तिन्ही घटक विचारात घेतले जातात. सर्वसाधारणपणे एका राशीत अडीच नक्षत्रांचा समावेश होतो. 27 नक्षत्रांचं स्वामित्त्व नवग्रहांना दिलं आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रहाच्या अधिपत्याखाली तीन नक्षत्रं येतात. ज्योतिषशास्त्रात शनिला विशेष स्थान आहे. सध्या शनी मकर या स्वराशीत मार्गी झाला आहे. त्याचवेळी रवी, बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह मंगळाच्या वृश्चिक राशीतून गोचर करत आहेत. वृश्चिक राशीतील अनुराधा नक्षत्रात या तीन ग्रहांची युती होत आहे. अनुराधा नक्षत्राचा स्वामी शनी असल्याने ही तीन ग्रहांची युती विशेष महत्त्वाची ठरणार आहे. ही युती विशेषतः तीन राशींसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या युतीमुळे कर्क, मकर आणि कुंभ राशीला खास शुभ लाभ मिळतील, असं ज्योतिषशास्त्राच्या जाणकारांनी सांगितलं आहे. आज तकने या विषयी माहिती दिली आहे.

सध्या रवी, शुक्र आणि बुध वृश्चिक राशीतून भ्रमण करत आहेत. मंगळ स्वामी असलेल्या वृश्चिक राशीतील अनुराधा हे नक्षत्र विशेष मानलं जातं. पृथ्वी तत्त्वाच्या अनुराधा नक्षत्राचा स्वामी शनी आहे. त्यामुळे या नक्षत्रात होणाऱ्या रवी, शुक्र आणि बुध या तीन ग्रहांच्या युतीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या युतीचा सर्व राशींवर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम दिसून येणार आहे. परंतु, तीन राशींसाठी ही युती खास लाभदायक ठरेल. अनुराधा नक्षत्रात होणारी ही युती हा एक दुर्मीळ योग मानला जात आहे. या दुर्मीळ योगाची शुभ फळं कर्क, मकर आणि कुंभ राशीच्या जातकांना मिळणार आहेत, असं ज्योतिष अभ्यासकांनी सांगितलं.

कर्क : ज्योतिष अभ्यासकांच्या मते, शनिच्या अनुराधा नक्षत्रात होणारी रवी, बुध आणि शुक्राची युती कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. यामुळे अडकलेले पैसे परत मिळतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. गुंतवणुकीतून दीर्घकाळ लाभ मिळेल. जमीन किंवा अन्य मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. सरकारी नोकरीसाठी दीर्घकाळापासून प्रयत्न करणाऱ्या किंवा यासाठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच शुभवार्ता समजेल.

हे वाचा - उत्साही, हजरजबाबी तर असतातच! मिथुन राशीच्या लोकांचे हे गुण गर्दीतही वेगळे दिसतात

मकर : अनुराधा नक्षत्रातील रवी, शुक्र आणि बुधाचा योग मकर राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकतो. या राशीच्या व्यापाऱ्यांना दुप्पट फायदा मिळू शकतो. नोकरीत प्रगती आणि उत्पन्नात वाढ होण्याचे योग आहेत. सकारात्मक विचारातून वाटचाल करणाऱ्यांना प्रत्येक कामात यश मिळेल. खर्च नियंत्रित राहतील आणि आरोग्य चांगले राहील. मित्र आणि नातेवाईकांचं सहकार्य मिळेल. दीर्घ काळापासून अडकलेली कामं वेगात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हे वाचा - प्रामाणिकपणा म्हटलं की वृषभ राशीचे लोक; त्यांचे हे गुण चारचौघात वेगळी छाप सोडतात

कुंभ : कुंभ ही शनिची रास आहे. त्यामुळे शनिच्या अनुराधा नक्षत्रातील रवी, शुक्र आणि बुधाच्या युती कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ फलदायी ठरेल. या कालावधीत तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. नोकरी आणि व्यापारी वर्गाला मनासारखं यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखद राहील. मुलांकडून लवकरच एखादी चांगली बातमी मिळू शकते.

First published:

Tags: Rashibhavishya, Rashichark