Home /News /astrology /

Surya grahan 2022 दिवशी 3 राशींनी सांभाळून राहावं; Solar eclipse चा होणार नकारात्मक परिणाम

Surya grahan 2022 दिवशी 3 राशींनी सांभाळून राहावं; Solar eclipse चा होणार नकारात्मक परिणाम

Surya grahan 2022 : 30 एप्रिल 2022 रोजी या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण (Solar Eclipse 2022) होत आहे. त्या दिवशी शनिचरी अमावास्या आहे.

मुंबई, 29 एप्रिल : या महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच 30 एप्रिल 2022 रोजी या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण (Surya grahan 2022) होत आहे. हे सूर्यग्रहण शनिवारी होत आहे (Solar Eclipse 2022). त्या दिवशी शनिचरी अमावास्या आहे. तसंच, या ग्रहणाच्या एक दिवस आधी शनी राशिपरिवर्तन (Saturn Transit) करत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वांच्या जीवनावर याचा परिणाम होणार आहे. खासकरून तीन राशींच्या व्यक्तींना या काळात सावध राहण्याचा सल्ला ज्योतिषतज्ज्ञांनी दिला आहे. त्याबद्दल जाणून घेऊ या. 30 एप्रिल रोजी होणारं सूर्यग्रहण मेष राशीत लागत आहे. त्याचसोबत या दिवशी मेष राशीत सूर्य, चंद्र आणि राहू यांची युती असेल. हे ग्रहण मध्यरात्री 12.15 वाजता सुरू होऊन पहाटे 4.08 वाजेपर्यंत असेल. ही स्थिती कर्क, वृश्चिक आणि मेष या तीन राशींसाठी चांगली नसेल. कर्क (Cancer) राशीचा स्वामी चंद्र आहे. तो मेष राशीत राहूसह उपस्थित असेल. ही स्थिती त्या राशीच्या व्यक्तींसाठी चांगली नाही. यामुळे या राशीच्या व्यक्तींना मानसिक ताणाला सामोरं जावं लागू शकतं. नकारात्मकता वाढू शकते, खर्च वाढू शकतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी हा काळ धीराने व्यतीत करावा. हे वाचा - Daily Horoscope : कामाच्या ठिकाणी नवा बदल तुमच्या फायद्याचा ठरणार; मोकळा होणार प्रगतीचा मार्ग वृश्चिक (Scorpio) राशीच्या व्यक्तींना या काळात मानहानीला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी विचारपूर्वक बोलावं आणि वादविवाद टाळावेत. या काळात शत्रू नुकसान करण्याचे प्रयत्न करू शकतात. खर्च वाढू शकतात. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी. हे सूर्यग्रहण मेष (Aries) राशीतच लागत आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर त्याचा सर्वाधिक परिणाम होईल. त्यांना मानसिक ताणाला सामोरं जावं लागू शकतं. शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. दुर्घटना घडू शकते. त्यामुळे घाई-गडबड करू नये. ग्रहण काळात प्रवास करणं टाळावं, असा सल्ला ज्योतिषतज्ज्ञांनी दिला आहे. हे वाचा - मे महिन्यात शुभ मुहूर्तांची आहे रेलचेल; लग्न, गृहप्रवेश, खरेदीसाठी मुहूर्तांची येथे पाहा संपूर्ण यादी ग्रहणाच्या नकारात्मक परिणामांपासून वाचण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी काही उपाय केले पाहिजेत, असं तज्ज्ञ सांगतात. सूर्यग्रहणाच्या अशुभ परिणामांपासून वाचण्यासाठी गायत्री मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला जातो. तसंच, ग्रहण काळात काहीही खाऊ नये, प्रकृतीची काळजी घ्यावी. या काळात आपले विचार सकारात्मक ठेवावेत. आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करावं. ग्रहणानंतर दानधर्म जरूर करावा. चांगलं, मृदू बोलणं सोडू नये, असं सांगितलं जातं. (सूचना - हा लेख ज्योतिषशास्त्राच्या सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही.)
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या