मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

चंद्र आज कन्या राशीत; कसा असेल तुमचा दिवस पाहा राशिभविष्य

चंद्र आज कन्या राशीत; कसा असेल तुमचा दिवस पाहा राशिभविष्य

चंद्र आज कन्या राशीत; कसा असेल तुमचा दिवस पाहा राशिभविष्य

चंद्र आज कन्या राशीत; कसा असेल तुमचा दिवस पाहा राशिभविष्य

चंद्र आज कन्या राशीत असेल. तिथे तो गुरूसोबत सम सप्तक योग करेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

आज दिनांक २१नोव्हेंबर २०२२. वार सोमवार. आज कार्तिक कृष्ण द्वादशी. सोमप्रदोष . चंद्र आज कन्या राशीत असेल. तिथे तो गुरूसोबत सम सप्तक योग करेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

दिवस आनंद निर्माण करणारा आहे . गुरूचंद्र कुटुंबात काही शुभ घटना घडवेल. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. घरात जबाबदारी वाढेल. आर्थिक व्यय होतील. दिवस उत्तम आहे.

वृषभ

आज जवळपासचे प्रवास संभवतात काही महत्वाचे निर्णय होतील. प्रयत्न करा. धैर्य खचू देऊ नका. गुरूचंद्र योग लाभ देईल .धन मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहे . दिवस उत्तम.

मिथुन

आर्थिक लाभ झाला तरी खर्चाचे वाढते प्रमाण त्रास देईल. राशीतील मंगळ वैवाहिक जीवनात अचानक काही समस्या निर्माण करेल. गुरुबळ उत्तम आहे. दशम चंद्र गुरू योग शुभ आहे . दिवस उत्तम.

कर्क

आज दिवस भाग्य दायक आहे. मंगळ सावधगिरीने वागण्याचा संकेत देत आहे. कलह टाळा. प्रकृती जपा. प्रवास योग येतील . नवीन घडामोडी होतील. शुभ दिवस .

सिंह

चंद्र गुरू प्रतियोग अधिक काम, घरात जास्तीची जबाबदारी असे परिणाम देईल. भावंडं सुख लाभेल. शुक्र शुभ आहे .प्राप्ती होईल . वाहन सुख लाभेल. दिवस शुभ.

कन्या

मन आशंकित राहील. जवळच्या व्यक्तीची किंवा जोडीदाराची चिंता सतावेल. घाबरु नका. चंद्र अनुकूल आहे.जोडीदार आनंदी राहील. लाभ होतील. संततीची काळजी घ्या. दिवस शुभ.

तुला

व्यय चंद्र आहे. जास्तीचे काम, प्रवास जवळपास जाण्याचे बेत केले जातील. आर्थिक स्थिती ठीक राहील. नातेवाईक भेट होईल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी वाटेल. दिवस चांगला .

वृश्चिक

लाभ स्थानातील चंद्र गुरू प्रतियोग सुखद अनुभव देईल. तुम्ही स्वयंपूर्ण राहाल. धार्मिक कामात रस घ्याल. तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील . प्रवास, संपर्क असा हा दिवस उत्तम जाईल.

धनु

आज दिवस आनंदात राहण्याचा आहे. दशम स्थानातील चंद्र व्यावसायीक भेट घडवेल. मंगल सप्तम स्थानात आहे. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस उत्तम जाईल

मकर

राशीच्या तृतीय आणि भाग्य स्थानातील चंद्र गुरू योग काही घडामोडी घडवेल. आनंददायक दिवस. राशी स्थानातील शनि कष्टदायक परिणाम देईल. जोडीदार सोबत प्रवास योग येतील. दिवस उत्तम आहे.

कुंभ

गुरूमहाराज शनिवर अंकुश ठेवतील . मातृ पितृ भेट होऊ शकते. मोठ्या व्यक्तीशी संपर्क होईल . भाग्य साथ देइल. आर्थिक लाभ संभवतात. गृहसौख्य मिळेल. दिवस उत्तम.

मीन

आज राशीतील चंद्रगुरू प्रतियोग सर्व दृष्टया उत्तम आहे. सामाजिक जीवनात यशस्वी होणार आहात. संततीची भरभराट होईल. प्रकृती उत्तम राहील. वैवाहिक जीवन ठीक . दिवस उत्तम.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya