मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

नियोजित कामात मिळेल का यश? कसा असेल तुमचा दिवस? पाहा राशिभविष्य

नियोजित कामात मिळेल का यश? कसा असेल तुमचा दिवस? पाहा राशिभविष्य

नियोजित कामात मिळेल का यश? कसा असेल तुमचा दिवस? पाहा राशिभविष्य

नियोजित कामात मिळेल का यश? कसा असेल तुमचा दिवस? पाहा राशिभविष्य

आज कार्तिक वद्य एकादशी. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक 20 नोव्हेंबर 2022. वार रविवार. आज चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल. आज कार्तिक वद्य एकादशी. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज चंद्र शष्ठ स्थानात आहे .राशीतील राहू चंद्र षडाष्टक योग निर्माण करील. वयाने मोठ्या भावंडापासून लाभ होतील. मित्र मंडळी भेटतील. मातुल घराण्याची साथ लाभेल. दिवस उत्तम.

वृषभ

आज ग्रह आनंदी मनस्थिती करतील. आता भाग्य साथ देत आहे. अडचणीतून मार्ग निघेल .प्रवास योग येतील. चंद्र पंचम स्थानात उत्तम आहे. जन संपर्क घडेल. दिवस शुभ.

मिथुन

चतुर्थ स्थानात चंद्र धार्मिक,कौटुंबिक कामात यश देईल .आर्थिक लाभ घडतील . कौटुंबिक समारंभ होतील . कार्य क्षेत्रात नाव मिळेल.राशीतील मंगळ ऊर्जा देईल. दिवस उत्तम.

कर्क

आज चंद्र प्रवास होईल असे सुचवीत आहे. .मन आनंदी राहील. आर्थिक दृष्टया दिवस उत्तम जाईल. बंधू भगिनी भेट होईल. संतती साठी खर्च होईल . दिवस उत्तम आहे.

सिंह

आठवा गुरू सध्या मानसिक , शारीरिक क्लेश देत आहे. जोडीदाराला जपून राहण्याचा काळ आहे. द्वितीय स्थानातील चंद्र आज अर्थ, व्यवसायात लाभ देईल. दिवस उत्तम आहे.

कन्या

मानसन्मान , आर्थिक घडामोडी असा सध्याचा काळ आहे. शुक्र घराचे नूतीकरणासाठी मदत करेल..भाग्य साथ देईल.दशमातील मंगळ नवीन संधी मिळवुन देईल. दिवस उत्तम आहे .

तुला

आज दिवस प्रवास,करमणुकी साठी वेळ द्या असे सांगत आहे. घरातील दुखणी, खर्च आता कमी होतील. चंद्र आर्थिक व्यय देईल. सामाजिक दृष्ट्या दिवस उत्तम.

वृश्चिक

भावंडांशी मतभेद, गैरसमज होऊ शकतात. व्यावसायिक संबंध सुद्धा तणावपूर्ण राहतील. आर्थिक लाभ होऊ शकतात. धार्मिक कार्य घडतील. दिवस बरा.

धनु

राहू पंचम स्थानात संभ्रम निर्माण करील. चंद्र नोकरीमध्ये जास्तीची जबाबदारी देईल. कुटुंब सुख कमी मिळेल. व्यवसाय उत्तम राहील.घरात काम भरपूर करावे लागेल.. दिवस मध्यम.

मकर

शनि सध्या तुमच्या राशीस्थानात आहे . चंद्र आर्थिक चिंता दूर करेल भाग्य चांगले राहील .घरात कलह होऊ शकतात . शांत रहा. वैवाहिक जीवन सुखी राहील. दिवस बरा.

कुंभ

आज घरामध्ये थोडा ताण जाणवेल. काही जास्तीच्या जबाबदाऱ्या,पाहुणे सुद्धा येऊ शकतात. अष्टम चंद्र मानसिक ,शारीरिक क्लेश देईल. दिवस उत्तम आहे.

मीन

छोटे मोठे प्रवास, खर्च असा हा दिवस आनंदात पार पडेल. चंद्र धार्मिक कारणांसाठी काही खर्च करेल. जोडीदाराला वेळ द्याल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. दिवस उत्तम.

शुभम भवतू !!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs