मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /सरकारी नोकरी, व्यवसायासाठी शुभकाळ; सूर्याचं राशीपरिवर्तन या राशींना देईल 'छप्पर फाडके'

सरकारी नोकरी, व्यवसायासाठी शुभकाळ; सूर्याचं राशीपरिवर्तन या राशींना देईल 'छप्पर फाडके'

सूर्याचे राशीपरिवर्तन

सूर्याचे राशीपरिवर्तन

सूर्य देव 13 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत कुंभ राशीत राहतील. 15 मार्च रोजी सकाळी 06.47 वाजता सूर्य कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीतील सूर्याचे संक्रमण सर्व 12 राशींवर परिणाम करेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 03 फेब्रुवारी : ग्रहांचा राजा सूर्य 13 फेब्रुवारीला आपली राशी बदलणार आहे. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 09.57 वाजता सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ ही शनिदेवाची राशी आहे आणि शनीही कुंभ राशीत आहे. कुंभमध्ये सूर्य आणि शनीची युती होईल. ज्यावेळी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल, त्या वेळी सूर्याची कुंभ-संक्रांती होईल. काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट सांगतात की, सूर्य देव 13 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत कुंभ राशीत राहतील. 15 मार्च रोजी सकाळी 06.47 वाजता सूर्य कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीतील सूर्याचे संक्रमण सर्व 12 राशींवर परिणाम करेल. याचा विशेषत: वृषभ, कन्या आणि धनु या तीन राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल. त्यांचे भाग्य जणू सूर्यासारखे चमकेल.

सूर्य गोचर 2023 -

वृषभ : सूर्याचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी जीवन बदलणारा अनुभव असू शकतो. तुमचे नशीब जोमात असल्यानं तुम्हाला नवीन घर मिळू शकेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी नवीन घर किंवा फ्लॅट खरेदी करू शकता.

जे लोक खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात होते किंवा नवीन नोकरीची संधी मिळवू इच्छित होते, त्यांच्यासाठी देखील वेळ अनुकूल आहे. तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमची कीर्ती आणि संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. जे लोक व्यवसायात गुंतलेले आहेत, त्यांना 13 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान मोठा फायदा होण्याचे संकेत आहेत.

कन्या : सूर्याच्या राशी बदलामुळे कन्या राशीच्या लोकांचा पराक्रम वाढेल. तुम्ही तुमच्या शत्रूंवर आणि विरोधकांवर वर्चस्व गाजवाल. नोकरदार लोकांनाही सूर्याच्या प्रभावाने लाभ होईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आनंददायी फळ मिळेल आणि तुमच्या स्थितीत वाढ होऊ शकते. ज्यांचे इतर देशांतून आयात-निर्यातीचे काम आहे, त्यांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे नेटवर्क मजबूत होईल, ज्याचा भविष्यात फायदा होईल.

धनु : कुंभ राशीतील सूर्याचे संक्रमण धनु राशीच्या लोकांचे भाग्य मजबूत करेल. भाग्य तुमच्यावर कृपा करेल. 13 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान तुम्ही कोणतेही महत्त्वाचे काम कराल, त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्यासाठी सरकारी नोकरीचीही शक्यता निर्माण झाली आहे. सर्व मेहनत घेऊन तयारी करा. चांगली बातमी मिळू शकते. काळ अनुकूल होत आहे.

हे वाचा - माघ पौर्णिमेला करा हे 5 उपाय; संपत्ती वाढेल, मिळेल लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद

दररोज स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. सूर्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे सुखद परिणाम मिळू शकतात. ज्यांना आपला नवीन व्यवसाय किंवा कोणताही व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी आपल्या वडिलांकडून सूचना घ्याव्यात. त्यांच्या मदतीने तुम्ही यशस्वी व्हाल.

First published:

Tags: Horoscope, Rashibhavishya, Rashichark