मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Surya Gochar 2022: चंद्राच्या राशीत सूर्यदेव करतायत प्रवेश; या राशीच्या लोकांसाठी महिना आहे झकास

Surya Gochar 2022: चंद्राच्या राशीत सूर्यदेव करतायत प्रवेश; या राशीच्या लोकांसाठी महिना आहे झकास

पुढील एक महिना सूर्य कर्क राशीत राहील. या काळात काही राशींच्या लोकांना जोरदार लाभही मिळतील. कर्क राशीत सूर्याचा प्रवेश कोणत्या राशीच्या लोकांसाठी भाग्याची दारे उघडेल या विषयी जाणून (Surya Rashi Parivartan 2022) घेऊया.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 जुलै : सूर्य दर महिन्याला राशी बदलत असतो. अशा प्रकारे सूर्य संपूर्ण वर्षभर सर्व 12 राशींमध्ये भ्रमण करतो. आज सूर्य राशी बदलत आहे. पुढील एक महिना सूर्य कर्क राशीत राहील. चंद्राच्या कर्क राशीत सूर्याचा प्रवेश सर्व राशींवर मोठा प्रभाव टाकेल. या काळात काही राशींच्या लोकांना जोरदार लाभही मिळतील. कर्क राशीत सूर्याचा प्रवेश कोणत्या राशीच्या लोकांसाठी भाग्याची दारे उघडेल या विषयी जाणून (Surya Rashi Parivartan 2022) घेऊया. याबाबत झी न्यूजने माहिती दिली आहे.

4 राशींसाठी सूर्य संक्रमण खूप शुभ -

मिथुन : सूर्याच्या राशीतील बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते. जे सरकारी नोकरीत आहेत किंवा सरकारी क्षेत्राशी संबंधित काम करतात, त्यांना मोठा लाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे मिळतील.

सिंह : कर्क राशीत सूर्याचा प्रवेश सिंह राशीच्या लोकांसाठीही शुभ आहे. विशेषत: या काळात व्यापारी प्रचंड नफा कमवू शकतात. तुम्ही प्रवासाला जाऊ शकता आणि या सहलींचा मोठा फायदाही होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

तूळ : तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमणही शुभ आहे. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. ज्यांना नोकरी बदलायची आहे, त्यांना नवीन नोकऱ्या मिळतील. तुमची प्रशंसाही होईल आणि पैसाही वाढेल. कुटुंबाचाही पाठिंबा मिळेल. मालमत्ता खरेदीसाठी चांगला काळ आहे.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांना सूर्य परिवर्तनानंतर महिनाभर भरपूर लाभ मिळतील. तुम्ही नोकरी बदलू शकता. चांगल्या नोकरीच्या ऑफरही मिळतील. हा काळ अनेक बाबतीत शुभ राहील. कामात यश मिळेल. व्यावसायिकांना फायदा होईल. आदर वाढेल.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark