दिल्ली, 9 जून : 10 जूनला वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण (Solar Eclipse) होत आहे. खगोलशास्त्राच्या (Astronomy) माध्यमातून या गृहणाला जसं महत्त्व असतं तसंच, ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) देखील गृहणाला महत्त्व आहे. सूर्य ग्रहणाचा प्रभाव 12 राशींवर (12 Zodiac Signs) पडणार आहे. सूर्यग्रहण मिथुन राशीमध्ये होत आहे. त्यानंतर 15 जूनपासून राशींवर परिणाम दिसेल. सूर्य वृषभ राशीमध्ये येणार आहे. त्यानंतर बारा राशींचं आयुष्य बदलून जाणार आहे. पाहुयात कोणत्या राशीवर काय परिणाम होणार आहे
मेष रास
मेष राशीच्या तिसऱ्या चरणामध्ये सूर्य जाणार आहे. यादरम्यान मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. सूर्य परिवर्तनाच्याच दिवशी एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल. या राशीच्या व्यक्तींना बुद्धीचा वापर करून यश मिळवावं लागेल. प्रवासादरम्यान धनलाभाची शक्यता आहे.
वृषभ रास
वृषभ राशीमध्ये चौथ्या स्थानामध्ये सूर्य विराजमान होणार आहे. या राशीच्या लोकांना सांसारिक सुख मिळणार असून चांगले परिणाम पाहायला मिळतील. प्रॉपर्टीचा लाभ होईल. मानसन्मान वाढेल.
मिथुन राशी
मिथुन राशीमध्ये सूर्य परिवर्तन होणार आहे. त्यामुळे या लोकांचा आत्मविश्वास वाढेल मात्र, आरोग्यावर परिणाम दिसेल डोळ्यासंबंधी काही त्रास होऊ शकतात. धनलाभाचे योग येण्याची शक्यता आहे.
कर्क रास
कर्क राशीच्या बाराव्या घरामध्ये सूर्य विराजमान होणार आहे. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल मात्र, कौटुंबिक वादांची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी आरोग्याचीही काळजी घ्यावी.
(सोडा पिवळा, गुलाबी; घरात लावा जांभळा रंग आयुष्य होईल Luxury)
सिंह रास
सिंह राशीच्या अकराव्या घरात सूर्य विराजमान होईल. या राशीचे लोक अनेक महत्त्वाची कामं हातावेगळी करतील. धनलाभ होईल, मान-सन्मान वाढेल आणि प्रवासाचा योग येण्याची शक्यता आहे.
कन्या रास
कन्या राशीच्या दहाव्या स्थानात सूर्य जाणार आहे. या राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रवासावर खर्च होईल. मात्र, सरकारी क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. भाग्योदय होण्याची शक्यता आहे.
तुळ रास
तुळ राशीसाठी सूर्य परिवर्तन सगळ्यात लाभदायक आहे. राशीसाठी राजयोग बनतो आहे. पैशाची आवक वाढेल. अडकलेली कामं मार्गी लागतील. मात्र वाद-विवादांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातोय. वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल.
वृश्चिक रास
सूर्य परिवर्तन या राशीची हिंमत वाढवणार आहे. मात्र, कार्यक्षेत्रात काही अडचणी येऊ शकतात. पैसे येण्यात अडचण येईल. जोडीदाराबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे.
(Chanakya Niti : यशस्वी होण्यासाठी करा ‘हे’ काम; संपतील सगळ्या अडचणी)
धनु रास
सूर्याचं राशीपरिवर्तन धनु राशीसाठी चांगलं फळ देणार आहे. नोकरीमध्ये प्रमोशन होईल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. नवीन संधी मिळतील मात्र, जोडीदाराबरोबर काही मतभेद होऊ शकतात.
मकर रास
सूर्य या राशीच्या सहाव्या घरात जाणार आहे. त्यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागेल. शिक्षणामध्ये काही अडचण येतील. मुलांची काळजी घ्यावी लागेल. मात्र सरतेशेवटी मेहनतीचं फळ मिळेल मिळेल.
कुंभ रास
कुंभ राशीचा पाचव्या घरात सूर्याचं आगमन होणार आहे. त्यामुळे बुद्धीचा वापर करून केलेल्या कामांमध्ये यश मिळेल. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटेल. भाग्याची साथ मिळाल्यामुळे वाहन आणि स्थावर मालमत्तेचं सुख मिळेल.
मीन रास
मीन राशीच्या लोकांनी सध्याच्या काळामध्ये कोणतेही व्यवहार करू नयेत. मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. आईची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे .कौटुंबिक सुखांवरदेखील परिणाम दिसेल.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.